राजघराण्यात जन्माला येऊनही विरक्त भावाने कृष्णभक्तीत रमलेली आणि अतोनात छळ आनंदाने सोसून कृष्णातच विलीन झालेली थोर संत मीराबाईंची प्रस्तावना. पतीला वीरगती प्राप्त झाल्यावर तपस्विनीचे जीवन अनुसरणे
मीराबाई ही मेवाड येथील रजपूत राजा रतनसिंह यांची मुलगी. तिचा जन्म इ.स. १४९९ मध्ये झाला. बालपणापासून ती कृष्णभक्तच होती. तिला एका साधूने बालपणीच श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती. नंतर मीराबाईच्या जीवनात महात्मा रैदास हे सद्गुरुरूपाने आले.
कालांतराने चितोडचा राजा राणा संग याचा थोरला राजपुत्र भोज याच्याशी तिचा विवाह झाला. पुढे भोजराजाला एका संग्रामात वीरगती प्राप्त झाली आणि त्या वेळेपासून मीराबाई एखाद्या तपस्विनीसारखी राहू लागली. ती रात्रंदिवस श्रीकृष्णाच्या चिंतनात निमग्न रहात असे. मीराबाईची कृष्णभक्ती न रुचल्याने राजाने तिचा अतोनात छळ आरंभणे
भोजराजाच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ सिंहासनी विराजमान झाला. अंतःपुरवासिनी (पडदानशीन) राजपत्नीने असे वागणे तत्कालीन लोकांना रुचले नाही. त्यामुळे त्याने बहीण उदाबाई हिच्याद्वारे पेटार्यातून एक साप मीराबाईकडे पाठवला. नंतर मीराबाईने पेटारा उघडून तो साप हसत हसत स्वतःच्या गळ्यात घातला. त्याच क्षणी श्रीकृष्णाच्या कृपेने त्या सापाचे पुष्पहारात रूपांतर झाले, हे वृत्त ऐकताच तिचा दीर असलेला तो राजा अतिशय चिडला.
राजाने पाठवलेल्या विषाचा श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवल्याने ते अमृताप्रमाणे गोड लागणे; परंतु कृष्णमूर्ती हिरवी होणे त्या राजासह सर्व लोकांनी मीराबाईचा अतोनात छळ केला. काही दिवसांनी मीराबाईसाठी राजाने उदाबाईच्या समवेत विषाचा प्याला पाठवला. मीराबाईने श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर त्या विषाचा नैवेद्य दाखवून ते प्राशन केले. तेव्हा भगवद्भावामुळे मीराबाईला ते विष अमृताप्रमाणे गोड लागले; परंतु श्रीकृष्णाची मूर्ती विषाच्या प्रभावाने हिरवी दिसू लागली. शेवटी अतिशय तगमग झालेल्या स्थितीत मीराबाईने श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘हे कालियामर्दना श्रीकृष्णा, मी विष प्राशन केल्यावर तुझा रंग का पालटला ? या विषाचा तुझ्यावर परिणाम झाला, हे पाहून मला अतिशय दुःख होत आहे. माझी ही तगमग तू लवकर पूर्ववत होऊन दूर कर.’ तत्क्षणीच ती कृष्णमूर्ती पूर्ववत दिसू लागली.
संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रममाण करणारी बहुविध पदे रचणे
त्या राजाने मीराबाईला ठार मारण्याचे अनेकविध प्रयत्न केले; परंतु सर्वशक्तीमान श्रीकृष्णापुढे त्याचे काही चालले नाही. श्रीकृष्णावाचून कशातही तिचे मन रमत नव्हते. तिला श्रीकृष्णाविना रहाता येत नव्हते. पुढे संत मीराबाईने वृंदावनात जाऊन अनेकांना श्रीकृष्णाच्या भक्तीसाधनेत रममाण करणारी बहुविध पदे रचिली. तिला अनेक साधू-संतांचा सहवास लाभला.
राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात संत श्रीकृष्णाच्या द्वारकेत गेली आणि १५४६ मध्ये ती श्रीकृष्णरूपात विलीन झाली.
नैना निपट बंकट छबि अटके।
देखत रूप मदनमोहन को, पियत पियूख न मटके।
बारिज भवाँ अलक टेढी मनौ, अति सुगंध रस अटके॥
टेढी कटि, टेढी कर मुरली, टेढी पाग लट लटके।
मीरा प्रभु के रूप लुभानी, गिरिधर नागर नट के॥
हरि तुम हरो जन की भीर।
द्रोपदी की लाज राखी, तुम बढायो चीर॥
भक्त कारण रूप नरहरि, धरयो आप शरीर।
हिरणकश्यपु मार दीन्हों, धरयो नाहिंन धीर॥
बूडते गजराज राखे, कियो बाहर नीर।
दासि 'मीरा लाल गिरिधर, दु:ख जहाँ तहँ पीर॥
दरस बिन दूखण लागे नैन।जबसे तुम बिछुडे प्रभु मोरे कबहुँ न पायो चैन॥
सबद सुणत मेरी छतियाँ काँपै मीठे लागे बैन।बिरह कथा कासूँ क सजनी बह गई करवत ऐन॥
कल न परत पल-पल मग जोवत भई छमासी रैन।'मीरा के प्रभु कब रे मिलोगे दु:ख मेटण सुख दैन॥
मन रे परस हरि के चरन
सुभग सीतल कमल कोमल, त्रिबिध ज्वाला हरन।
जे चरन प्रहलाद परसे, इंद्र पदवी धरन॥
जिन चरन ध्रुव अटल कीन्हों, राखि अपने सरन।
जिन चरन ब्रह्माण्ड भेंटयो, नख सिखौ श्री भरन॥
जिन चरन प्रभु परसि लीने, तरी गौतम घरन।
जिन चरन कालीहिं नाथ्यो, गोप लीला करन॥
जिन चरन धारयो गोबर्धन, गरब मघवा हरन।
दासि 'मीरा लाल गिरिधर, अगम तारन तरन॥
पग घुँघुरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहिं हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
बिषका प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
'मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई।
जाके सिर मोर मुकट मेरो पति सोई।
तात मात भ्रात बंधु आपनो न कोई॥
छाँडि दई कुल की कानि कहा करिहै कोई।
संतन ढिंग बैठि-बैठि लोक लाज खोई।
चुनरी के किये टूक ओढ लीन्हीं लोई।
मोती मूँगे उतार बनमाला पोई॥
ऍंसुवन जल सींचि सींचि प्रेम बेलि बोई।
अब तो बेल फैल गई आणँद फल होई॥
दूध की मथनिया बडे प्रेम से बिलोई।
माखन जब काढि लियो छाछ पिये कोई॥
भगत देखि राजी हुई जगत देखि रोई।
दासी 'मीरा लाल गिरिधर तारो अब मोही॥
पायो जी म्हें तो राम रतन धन पायो॥
वस्तु अमोलक दी म्हारे सतगुरु, किरपा करि अपनायो॥
जनम-जनम की पूँजी पाई, जग में सभी खोवायो।
खरच न खूटै चोर न लूटै, दिन-दिन बढत सवायो॥
सत की नाव खेवटिया सतगुरु, भवसागर तर आयो।
'मीरा के प्रभु गिरधर नागर, हरख-हरख जस गायो॥
बसौ मोरे नैनन में नंदलाल।
मोहनि मूरति, सांवरी सूरति, नैना बने बिसाल।
मोर मुकुट, मकराकृत कुंडल, अस्र्ण तिलक दिये भाल।
अधर सुधारस मुरली राजति, उर बैजंती माल।
छुद्र घंटिका कटि तट सोभित, नूपुर सबद रसाल।
मीरां प्रभु संतन सुखदाई, भगत बछल गोपाल।
नहिं ऐसो जनम बारंबार।
का जानू कछु पुण्य प्रगटे, मानुसा अवतार।
बढ़त पल पल, घटत छिन छिन, जात न लागै बार।
बिरछ के ज्यों पात टूटे, बहुरि न लागै डार।
भौ सागर अति ज़ोर कहिए, अनंत ऊंडी धार।
राम नाम का बांध बेड़ा, उतर परले पार।
ज्ञान चौसर मंडी चोहटे, सरत पासा सार।
या दुनिया में रची बाज़ी, जीत भावें हार।
साधु, संत, महंत, ज्ञानी, चलत करत पुकार।
दास मीरां लाल गिरिधर, जींवणा दिन च्यार।
मेरे तो गिरिधर गोपाल दूसरौ न कोई।जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई।।
छांड़ि दई कुल की कानि कहा करै कोई।संतन ढिग बैठि बैठि लोक लाज खोई।
अंसुवन जल सींचि सींचि प्रेम बेलि बोई।दधि मथि घृत काढ़ि लियौ डारि दई छोई।
भगत देखि राजी भइ, जगत देखि रोई।दासी मीरा लाल गिरिधर तारो अब मोई।
भज मन चरण-कंवल अबिनासी।
जेताइ दीसै धरण-गगन बिच, तेताइ सब उठ जासी।
इस देही का गरब न करणा, माटी में मिल जासी।
यो संसार चहर की बाजी, सांझ पडयां, उठ जासी।
कहा भयो तीरथ ब्रत कीने, कहां लिए करवत कासी?
कहा भयो है भगवा पह्रयाँ, घर तज भये सन्यासी?
जोगी होइ जुगत नहि जाणी, उलट जनम फिर आसी।
अरज करौं अबला कर जोरे, स्याम तुम्हारी दासी।
'मीरां' के प्रभु गिरधर नागर, काटो जम की फाँसी।
या ब्रज में कछु देख्यो री टोना।लै मटुकी सिर चली गुजरिया,
आगे मिले बाबा नंदजी के छोना।दधि को नाम बिसरि गयो प्यारी,
लैलेहु री कोई स्याम सलोना।वृंदावन की कुंज गलिन में,
नेह लगाइ गयो मनमोहना।मीरा के प्रभु गिरिधर नागर,
सुंदर स्याम सुघर रस लोना।