मार्गदर्शक कसा असावा,माकडाला सापडलेला नारळ,नुसतं शिक्षण किंवा ज्ञान महत्वाचं नाही,पहारा चालु आहे,जिथे चुकले तिथेच जोडणे,जावे त्याच्या वंशा,जिसकी उसकी टेक सबकी निशाणी एक,महाराष्ट्राचा अभिमान,राळेगणसिध्दी व मा.अण्णा हजारे,दांडेकर मामांचे कीर्तन अशे व त्यपेक्षाही अधिक गाजलेले संत श्रीपाद बाबांचे दृष्टांत या वेबसाईटद्वारे वाचकांच्या समोर ठेवले आहेत.
पुढे वाचासच्चिदानंद श्रीपाद बाबा व रामदास बाबांचे पदस्पर्श सावरगांवला सन 1988 साली झाला.वास्तविक पहाता बाबा म्हणजे कोणीतरी एखादा कीर्तनकार असेल त्याप्रमाणे आम्ही समजायचे.कलीयुगामध्ये जीवास सन्मार्ग दाखिवणारे व उध्दार करणारे फक्त संत महात्मेच आहेत.संतावीण प्राप्ती नाही । ऐसे वेद देती ग्वाही ॥ परंतु या जगात संत असणारे वेगळे व दिसणारे वेगळे. यामुळे अनेक भाविक जीवांची दिशाभूल होऊन ते चाचपडताना दिसतात.
पुढे वाचामहाराष्ट्रातील राहूरी कृषीविद्यापीठ,जिल्हा अहमदनगर या ठिकाणी भक्तीप्रेमाचा आनंद लुटता यावा यासाठी भव्य वैष्णव मेळावा साधकांनी आयोजीत केला होता.त्यामध्ये जन्ममरणाच्या फे-यातून सुटता यावे व अत्यंतीक दु:खाची निवृत्ती व्हावी यासाठी कीर्तनाद्वारे संत श्रीपाद बाबा यांनी दिलेला अमोलीक संदेश व मार्गदर्शन.
पुढे वाचा
जगाची माऊली यांनी या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय मधील या ओव्यांद्वारे आपल्या अंत:करणातील भगवंता विषयी वर्णन केले आहे. हा जो ग्रंथ आहे तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या षड्गुण ऐश्वर्य भगवान यांच्या मुखातील हे बोल आहेत. जसा भगवंताचे षड्गुण आहेत तसा याही ग्रंथाला सहा अंग आहेत. वक्ता,श्रोता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत, सिद्धांत ही सहा अंग आहे.
पुढे वाचा