अनंत जन्मांच्या दुःखाची निवृत्ती व परमात्म सुखाची प्राप्ती जीवाला व्हावी यासाठीच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, समर्थ रामदास आदि आदि संतानी देह व जीवनाची तमा न बाळगता जगाला भक्तिमार्ग सिध्द केला.या संताप्रमानेच संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांनीही नामाने साधकांना देवाचा साक्षात्कार(अनुभव) आणुन देण्यासाठी आपले आयुष्य वेचले.
पुढे वाचाज्या ग्रंथात परमात्म तत्वाचा स्पर्श असतो ते वाःग्मय अनादिकालीन ज्ञानाची परंपराचे जपणारे संताचे अनुभव शास्त्र असते. ते ग्रंथ संत श्रीपाद बाबांनी अनुभवानुसार सांगीतले आहे की, भागवत धर्माचे-ज्ञानेश्वरी,भागवत,सकल संत गाथा हे तीन पिनल कोड असुन हे ग्रंथ १.दृष्टांत-सिध्दांत २.वक्ता-श्रोता ३.प्रश्न-उत्तर या तीन अंगानी परिपूर्ण आहेत त्याबाबत संत वाःग्मयाचा विशेषरुपाने सिंहावलोकन होणे गरजेचे आहे.
पुढे वाचा