संत तुकाराम महाराजांनी अभंग वाणीतून पुण्यवान भारत देशाचे महत्व विशद केले आहे. या पवित्र भूमीत भगवतांनी व ऋषीमुनी,संतमहात्म्यांनी धर्माचे रक्षण व भक्तांचे पालन करण्यासाठी अवतार घेतले.
:-गुरुवर्य. ह. भ. प. गोविंदबाबा गाडगे (साकोरी ता.जुन्नर, जि.पुणे.)
धर्मावर ग्लानी येते व पृथ्वीवर अधर्म माजतो तेंव्हा देव स्वत: अवतार घेतात व संतही अवताराला येतात. भगवंताने कृत, त्रेता, द्वापार व कली या चौयुगामध्ये विविध अवतार घेऊन दुष्टांचे निर्दळन, भक्तांचे पालन व धर्माचे रक्षण केले.
:-गुरुवर्य ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज झणझणे. (ओतुर,ता.जुन्नर, जि.पुणे.)
तुम्ही संत मायबाप कृपावंत-भागवत धर्माचा संताच्या कार्याचा वारसा चालवणारा एक मुकुटमणी विसाव्या शतकात महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा,कळवण तालुक्यात,खर्डे(वाजगांव)गांवात श्री.दोधुजी मल्हारी चव्हाण व त्यांची सुशील पत्नी सौ.गवजुबाई यांच्या पोटी कार्तीकी शुध्द बिज (भाऊबीज) दिनांक १२.११.१९२० रोजी श्री.श्रीपती यांचा जन्म झाला.
पुढे वाचा