तुम्ही संत मायबाप कृपावंत

भागवत धर्माचा संताच्या कार्याचा वारसा चालवणारा एक मुकुटमणी विसाव्या शतकात महाराष्ट्रातील नाशिक,जिल्हा,कळवण तालुक्यात,खर्डे(वाजगांव)गांवात श्री.दोधुजी मल्हारी चव्हाण व त्यांची सुशील पत्नी सौ.गवजुबाई यांच्या पोटी कार्तीकी शुध्द बिज (भाऊबीज) दिनांक १२.११.१९२० रोजी श्री.श्रीपती यांचा जन्म झाला. त्यांनी बाल्य अवस्थेतुन तारुण्य अवस्थेत येताच गांवातील वडिलधा-या व्यक्तींमध्ये आपल्या कर्तुत्वाने आदरभाव व मानाचे स्थान मिळवले. देश पारतंत्र्यात होता, स्वातंत्र्य पुर्व काळ असल्याने स्वातंत्र्य मिळ्वण्यासाठी गावोगांवी जनजागृती करण्याचे काम जोरात चालु होते. त्यामध्ये सामाजिक नेते,विविध संप्रदायाचे व पंथाचे अनुयायी,इ.अनेकजन सहभागी झाले होते. त्यात श्रीपतराव व त्यांचे कुटुंबही सहभागी होते. श्रीपतराव यांचे कुटुंबात गुरु करण्याची परंपरा होती. त्या दरम्यान स्वातंत्र्याचे महत्व पटवुन देणे व भक्तिमार्ग प्रसार करणारे मु.पोस्ट-झापेवाडी,ता.जिल्हा-बीड या गांवातील प्रवर्तक संत श्री.केरोबाबाबा शिंदे हे गावोगांवी भक्तीकार्याचा प्रसार करत करत नाशिक जिल्हातील कळवन तालुक्यातील खर्डे (वांजगाव)या गांवी आले.भक्तिमार्ग म्हणजे अनादी कालचे तत्वज्ञान सर्वसामान्यांना कळावे म्हणून ज्ञानेश्वरी,भागवत,संताचे अभंग यावर प्रवचन, किर्तन याद्वारे प्रब्रोधन करत.खर्डे गावांतील व्यक्तिंनी त्यांनी सांगीतलेल्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवुन त्यांचे शिष्यत्व पत्करले. भक्तीरप्रेमाचा आनंद मिळून ते सुखी समाधानी झाले. शास्त्रामधील अष्ट्सात्विक भावांची अनुभूती त्यांना आली. या भक्ति प्रवाहात अनेक अबालवृध्द सामील झाले. गांवातील टवाळखोर व्यक्तींना हे सहन झाले नाही.त्यांनी विरोधी कटाची युक्ती करुन युवकांचे नेतृत्व करणारे गांवातील श्रीपतराव यांना सांगितले की,तू जर या नंदिवाल्याला (केरोबा बाबांना)गांवातुन हुसकले तर तुला ५०१ रुपये बक्षीस देऊ. नंदीवाले म्हणजेच केरोबा बाबा हे प्रवासासाठी बैलगाडीचा वापर करत म्हणुन त्यांना त्याकाळात नंदीवाले म्हणत. त्यांना गावातून हाकलून देण्याचा विडा श्रीपतरावांनी उचलला.

अवतार तुम्हां धराया कारण । उध्दवराया जन जड जीवा ॥

गांवातील श्रीदत्त मंदिरात चातुर्मासानिमीत्त दररोज एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथावर संत केरोबा बाबा(मालिकेतील ११ वे सदपुरुष) यांचे प्रवचन सुरु होते. एके दिवशी ठरल्याप्रमाणे श्रीपतराव संत केरोबा बाबा यांचा समाचार घेण्याच्या उद्देशाने गेले. तेथे प्रवचनात प्रल्हादाला नामाची अनुभूती आल्यावर त्यास अष्टसात्वीक भाव कसे झाले व नृसिंहाचा अवतार प्रकट झाल्यावर त्यास प्रेमाचे भरते कसे आले हा दृष्टांत समजाउन देत होते. प्रवचन ऐकण्यास बसलेले श्रीपतराव यांना अंतःकरणातून त्यांचा बोध पटला व त्यांना संत केरोबा बाबांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी दिलेले भगवंताचे नाम कानावर पडताच त्यांचे चिंतन होऊन अगोदर अंतःकरण शुध्द असल्यांने तात्काळ त्यांचे अष्टसात्वीक भाव जागृत झाले व स्वरुप समाधी लागली. श्रीपतराव यांना खरा भक्तिमार्ग मिळाल्याचा अत्यंत आनंद झाला व चित्त प्रसन्न झाले. त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. संत केरोबा बाबांनी श्रीपतरावांना भक्तिमार्गाची पुढील पध्दत म्हजणजेच प्रबोध दिला.मिळालेले ज्ञान हे अनादिकालीन व संप्रदायपुर्वक असुन हा भगवंताच्या नामाचे दान देणारे संप्रदाय आहे.
आनंद संप्रदाय परंपरा - संत श्रीपाद बाबांनी व रामदास बाबा यांनी हंस-ब्रह्मा-अत्री-दत्तात्रय-नारायण-लक्ष्मण-बलभीम-सखयानंद-शांतामाई-बंडोबा-केरोबा यांच्यामार्फत चालवलेल्या अनादीकालीन नामाची संप्रदाय परंपरा जोपासली.

धर्म कार्याचा विस्तार

संसाराचे नांवे घालोनीया शुन्य। वाढता हा पुण्य धर्म केला ॥

"घोटी" हे गांव नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळ ती बाबांची कर्मभूमी घोटीला आम्ही अकरावा खंड समजतो. नवखंड पृथ्वी,दहावा खंड काशी तर अकरावा खंड घोटी. प्रतिपाद ज्ञानयोगाचे, आचरण कर्मयोगाचे दान भक्तीयोगाचे,भक्तीक्षेत्राच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमि. वयाच्या २३ ते ७८ वर्षापर्यंत पांडूरंगाचे बिजनाम वाढवण्याचे कार्य या महात्म्याने केले. जनता जनार्दनाचे सेवेसाठी घरातील भांडी गहाण ठेवण्याचा प्रसंग आला. वयाची ७० वर्षे ओलांडली, खिशात दमडी नसतानाही कैक किलोमीटर साधकरुपी पांडूरंगाच्या भेटीसाठी पायी चालत जावे. त्यांना धर्ममार्तंडांचे अघात निंदा व द्वेष स्विकारावे लागले. अवघ्या अल्पावधीतच हा लोकोत्तीर महानायक महाराष्ट्राचा प्राण बनला. महाविष्णुपासून आलेल्या आनंद संप्रदायाचा हा बारावा महापुरुष वारकरी संप्रदायाला अनमोल देणगी देऊन गेला. गुरुवर्य ह.भ.प.मामासाहेब दांडेकर,ह.भ.प.जोग महाराज,ह.भ.प.बंकटस्वालमी,ह.भ.प. धुंडा महाराज देगलूरकर, ह.भ.प.रंगनाथ महाराज परभणीकर,ह.भ.प.कोंडाजीबाबा डेरे, इ. थोर महात्यांचे काळात व नंतरच्या काळात साधकानां देवाचे नामाने आत्मसाक्षात्कार आणून देण्यांत साधुसंताचे महानकार्य यांनी केले. वरील महाराजांनी वेदांत सांगीतला,परंतु मात्रा श्रीपाद व रामदास बाबांनी तो वेदांत अतीसुलभ करुन अनुभवास आणून दिला.

इये मराठीचीये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखची वरी । होऊ दे या जगा ॥

धर्मकार्याचा विस्तार व प्रसार लक्षात घेऊन महाराष्टातील साधक भाविकांना नामाच्या माध्यामातून भक्ती प्रेमाचा आनंद लुटता यावा म्हणून हा नामरुपी वारसा विभागवार जवळ जवळ ८२ अधिका-यांच्या मागदर्शनाखाली आजतागायत सुरु आहे. अधिका-यांच्या नावांची नोंद त्यांच्या वैयक्तींक नोंदवहीत स्वतःच्या हस्ताक्षरात असून नांवे पुढील प्रमाणे आहेत.आनंद संप्रदाय मालीकेचा अनादिकालीन महावाक्याचा वारसा चालवण्यांचा अधिकार श्रीपाद बाबांनी त्या काळात ज्यांना दिला त्यांची माहिती पुढील प्रमाणे.

संप्रदायीक कार्याचे सिंहावलोकन

श्रीपादबाबा यांच्या कुटुंबाची शेती उद्योगातून पुर्तता होत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी सरकारी गोडावून गुल-जांभूळपाडा तालुका- सुरगाना,जिल्हा- नाशिक या ठिकाणी गोडावून किपर म्हूणून नोकरी स्विकारली. त्यानंतर मालेगांव तालुक्यातील दाभाडी, नंतर इगतपुरी, तालुका-घोटी येथे बदली झाली. घोटी या ठिकाणच्या बदलीमुळे खऱ्या अर्थाने भक्तीमार्गाची सुरवात झाली. संत केरोबा बाबा यांनी भक्तिमार्ग जोपासण्याचे म्हणजेच महावाक्याचा उपदेश करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे श्रीपतरावांचे नांव “श्रीपादबाबा” म्हणून संबोधले. त्यांनी घोटी व घोटीच्या परीसरात भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचे काम सुरू केले. घोटीच्या पुर्वेला उंबरकोन गांवातील पहिले साधक श्री.ह.भ.प तुळशीराम बाबा शिंदे हे होते. याप्रमाणे अनेक साधक तयार होऊन आनंद संप्रदायाचे कार्य वाढू लागले. हे बघुन या कार्याला घोटीगांव व परिसरातील संप्रदायीक मंडळींनी वारकरी सांप्रदायाचे त्यावेळचे जेष्ठ प्रवर्तक ह.भ.प मामासाहेब दांडेकर यांचेकडे तक्रार केली. ज्यावेळेस मामासाहेब दांडेकर घोटीस आले त्यावेळी श्रीपाद बाबांची प्रत्यक्ष भेट झाली. अनेक भाविकांकडून संप्रदायाबाबतच्या तक्रारीचा विचार करुन त्यांनी विशेष करुन एकमेकांत झालेल्या भक्ती ज्ञानाच्या संवादातुन श्रीपादबाबांचा अधिकार मामांनी ओळखला. आनंद संप्रदायाच्या भक्तीचा ध्वज उंच उंच जावो असा अभिप्रायरुपी आशिर्वादही दिला. आनंद संप्रदायाची पताका घोटीत यशस्वी रोवली त्यात सद्गगुरू केरोबा बाबा व बंडोबा बाबा यांनी मोलाचे योगदान दिले व त्रिवेणी संगमातून अनेक साधकांना आत्मानुभुतीचा अनुभव आला. संत केरोबा बाबा यांचे महानिर्वान पौष वद्य ७ सन १९७५ साली झाले. त्यामुळे जशी माऊली शिवाय बालक अनाथ होते त्या प्रमाणे श्रीपाद बाबांची अवस्था झाली. आपल्या कर्तव्याची जाणीव सदगुरुने करुन दिल्याने त्यांमुळे खचून न जाता त्यांनी

सुखी संतोषा न यावे । दुखी विषादा न भजावे । आणि लाभालाभ न धरावे । मना माजी ॥

याप्रमाणे आपले जीवन व्यतीत केले. त्यानंतरश्रीपादबाबांनी त्यांचेवर सोपवलेली भक्तीकार्याची जबाबदारी सदैवपणे पार पाडली.

संत रामदास बाबांचा आनंद संप्रदायात प्रवेश

संत रामदास बाबांचा आनंद संप्रदायात प्रवेश श्रीपाद बाबांच्या मार्गदर्शनातून श्री.रामदास शेठ बुधवारे यांच्या् अंतःकरणावर परिणाम झाला. ते शरण जाऊन भागवतधर्माचे रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा त्यांना लागली. श्रीपाद बाबांनी त्यांना संत केरोबा बाबा यांचेकडून अनुग्रह घेण्यासाठी प्रबोधीत केले. ज्यापप्रमाणे ज्ञानाबरोबर नामाची जोडी होती, तोच नामा शिंप्यांच्या कुळात पुन्हा ज्ञानाला साथ करण्यासाठी रामदास शेठ बुधवारे बाबांच्या रुपात अवतरला. अपरोक्षानुभुतीसाठी हा महात्मा केरोबा बाबांना शरण गेला. मग सुरु झाली अखंड भक्ती ची घोडदौड या जोडीने भक्तीचा मळा फुलवला. संत रामदास बाबा यांनी ह.भ.प मामासाहेब दांडेकर आणि ह.भ.प.जोग महाराज यांचे सहवासात वारकरी संप्रदायाचा अभ्यास आत्मसात केलेला असल्याने कार्याला अत्यंत शीघ्रतेने गती आली.आपला चरीतार्थ करताना नोकरी-धंद्याचे निमीत्ताने श्रीपाद बाबा सन १९७५ साली कल्याण व डोंबिवली जिल्हा-ठाणे येथे आले. तेथे त्यांचे एक शिष्य वै.ब्रम्हलीन ह.भ.प.काशिनाथ महाराज नाठे हे नोकरीसाठी होते. त्यांना मार्गदर्शनासाठी श्रीपाद बाबांचे ठाणे व मुंबई विभागात जाणे येणे सुरु झाले. वै.काशिनाथ नाठे यांचे बरोबर काम करणारे महाड जिल्हां रायगड येथील वै.ब्रम्हलीन ह.भ.प. नारायणबाबा गायकवाड यांना श्रीपाद बाबांनी अनुग्रह दिला व त्यांची प्रचारक म्हणून निवड केली.त्यांच्या माध्यमातून ह.भ.प.विष्णुपंत भांडवलकर, त्यांच्या माध्यमातून ह.भ.प.गोविंद महाराज गाडगे (साकोरी पुणे), ह.भ.प रामचंद्र उर्फ आबा महाराज देशमुख(सातारा), वै.नथुराम साळेकर, वै.मधुकर निकम, वै.लक्ष्मण कुलवडे, ह.भ.प छबुनाना पाटील, ह.भ.प शंकर महादेव महाजन अशी साधकमंडळी घडली व त्यांचा अनुभव व निष्ठा पाहून या अधिका-यांकडे भक्तीमार्ग जोपासण्याचे म्हणजे महावाक्य उपदेश करण्याचा ‍अधिकार दिला.काम-धंदा संभाळून त्यांनी ठाणे व मुंबई विभागात संप्रदाय कार्यास सुरवात केली. एक असो किंवा अनेक त्यांचे हीत व्हावे हेच उद्दीष्टं समोर ठेउन त्यांनी प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी,भागवत,संताचे अभंग यात असणारे गुह्यज्ञान प्रवचन कीर्तनाद्वारे विविध द्रुष्टांतातुन सुलभ करुन देत. श्रीपादबाबा पूर्वी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या पध्दातीने कीर्तन करत असत. परंतु डोंबिवली येथील कार्यक्रमाचे निमीत्ताने गोविंदबाबा गाडगे व ज्ञानेश्वर महाराज झणझणे यांनी विनंती केल्यावर बाबांनी वारकरी संप्रदायाच्या प्रणालीनुसार कीर्तन प्रवचनाद्वारे भक्तीचा प्रसार करु लागले.

संप्रदायिक कार्याचा श्रीगणेशा

श्रीपाद बाबांच्या काळात गावो गावी वाडया वस्त्या डग वर जरी अखंड हरीनाम सप्ताह चालु होते पण सर्व परोक्ष ज्ञानच ते रुढी म्हणून करायचे नामाचा अनुभव शुन्य, समाज परीवर्तन नाही, माळ घालायची हा समज पक्का रुढ झाला. माळ घातल्यावर चिंतन केल्यावर देव भेटतो असे म्हणणा-यांना लोक बावळट समजत होते. श्रीपादबाबांचे साधक नोकरी धंदा करणारे होते, भक्तीमार्गाचा प्रचार व प्रसार वाढू लागल्याने साधकांपर्यंत जाण्यास वेळ कमी पडू लागला. सांत दिवस सप्ताह करायला वेळ मिळणार नाही व भक्तीमार्गाचा प्रचार व प्रसार झालाच पाहीजे म्हणून काही ठिकाणी अखंड हरीनाम सप्ताह व काही ठिकाणी अडीच दिवसाचे वैष्णव मेळावे चालू केले. त्यामुळे अनेकांना थोड्या वेळेत परमार्थ समजू लागला व अनेक कार्यकर्ते याद्वारे घडू लागले. तसेच चिंतनाद्वारे आत्मनुभूतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने असंख़्य साधक बाबांच्या मुख़ातील तत्वज्ञान श्रवणासाठी वेडेपिसे होत. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यानी सुलभ पध्दतीने तत्वज्ञानाचा विषय समजावून दिला. सद्भभक्ती जिर्णोध्दार कार्याची पताका हातात घेऊन त्यांच्या निस्पृह निस्वार्थी कार्यातून भक्ती धर्माचा प्रसार संतांनी केलेल्या संप्रदायीक कार्याप्रमाणे झाला.

ईवलेसे रोप लावियले द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी ।
मोगरा फुलला मोगरा फुलला । फुले वेचीताची बहरु कळियासी आला ।

त्यानंतर सिध्देश्वर निवास वसंत वाडी, डों‍बिवली पूर्व येथे गुरु पोर्णीमा, बंडोबा बाबा पुण्यतिथी, संत केरोबा बाबा पुण्यतिथी असे संयुक्त कार्यक्रम संत श्रीपाद व संत रामदास बाबांनी सुरु केले. गुरुवर्य ह.भ.प गोविंद बाबा गाडगे यांच्या मार्गदर्शनाने सन १९८४ साली आनंदवाडी, तालुका-जुन्नर, जिल्हा-पुणे येथे आनंद संप्रदायाचा अखंड हरीनाम सप्ताह सुरु केला. गुरुवर्य ह.भ.प आबा महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने कारगांव,खोपोली येथे अखंड हरीनाम सप्ताह सुरु झाला. गुरुवर्य ह.भ.प.पोपट महाराज चकवे यांची जन्मभूमी क्षेत्र मढ-पारगांव, ता-जुन्नुर, जिल्हा-पुणे येथे अखंड हरीनाम सप्ताह सुरु झाला. त्यातूनच महाराष्ट्रभर गांवोगांवी भागवत धर्माचा प्रचार होऊ लागला. त्यामुळे सर्व साधकांस डोंबिवली येथे येणे शक्य नव्हते म्हणून संत केरोबा बाबा यांची पुण्यतिथी व वैष्णव मेळावा असा संयुक्त कार्यक्रम अहमदनगर जिल्हा यातील राहूरी कृषी विद्यापीठ ज्ञानेश्वर नगर, येथे सुरु केला. वैष्णव मेळाव्यामध्ये चक्री कीर्तन, प्रवचनाद्वारे अनेक साधकांकडून समाज प्रबोधनाचे कार्य बाबांनी करून घेतले रात्री श्रीपाद व रामदास बाबा तसेच बाबांचे गुरुबंधू गुरुवर्य ह.भ.प बापू गुरुजी मालुंजेकर हे काल्याच्या कीर्तनाद्वारे सर्व साधकांना आध्यात्मिक प्रबोधन करत. त्याचप्रमाणे पुढेही पंढरपूर, आनंदाश्रम आळंदी देवाची व संपूर्ण महाराष्ट्रभर वैष्णव मेळावे सुरु झाले त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही भक्तीनामाचा प्रचार होऊन साधकांना परमार्थाचा अनुभव येऊ लागला. संत नामदेवांप्रमाणेच संप्रदायाची पताका श्रीपाद बाबांनी पंजाबच नव्हे तर इतर राज्यातही नेली. महाराष्ट्रात भागवत धर्माचे पालन, पाखंडयांचे खंडन याप्रमाणे समाजाला सत्यं भक्तीचा संताचा अद्वेत मार्ग सुलभ केला. श्रीपाद बाबांनी साधकांच्या अत्यंतीक दुःखाची निवृत्ती व परम सुखाच्या प्राप्तीसाठी कष्ट घेतले. वारकरी संप्रदायात महिलांना किर्तन प्रवचन करण्याचा अधिकार नव्ह्ता. श्रीक्षेत्र देहू येथील मंदिरात संत श्रीपाद बाबा यांचे कीर्तन सुरु होते. मंदिरात समोर लावलेल्या "येथे स्त्रीयांनी कीर्तन करू नये" या फलकाकडे निर्देश करत बाबा जाहीरपणे म्हणाले कि हे आकाशातून पडले कि जमिनीतून उगवले हे भूईफोड ! बाबांच्या या निर्भीड वक्तव्याची दखल घेऊन तेंव्हापासून तो फलक काढण्यात आला. पुढे त्यांनी नारदाची गादी व व्यासांचे व्यासपीठ स्त्रियांसाठी खुले केले. शेकडो महीला कीर्तनकार व अधिकारी तयार केले. महाराष्ट्रातील परोक्ष ज्ञानी व कर्मठ यांच्या उरात धडकी भरवणारे व्यक्तीमत्व म्हणजे श्रीपाद बाबा श्रोत्रीय, ब्रम्हनिष्ठ व दयाळू. त्यांच्यापासून मिळालेला वारसा म्हणजे नामापासून निर्माण होणारे अष्टीसात्वी्क भाव व आत्मानुभूती या ब्रम्हास्राने त्यांनी असंख्यांचा उध्दार केला.

आनंदवाडी कारगांव पारगांव इतर अनेक गांव भक्तीप्रेमाने पावन

आनंदवाडी :-

गुरुवर्य ह.भ.प.गोविंदबाबा गाडगे व ज्ञानेश्वर महाराज झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८४ साली नंदवाडी,तालुका-जुन्नर,जिल्हा-पुणे येथे आनंद संप्रदायाचा अखंड हरीनाम सप्ताह प्रतीवर्षाप्रमाणॆ पौष शुध्द षष्ठी रोजी सुरु झाला.छोटयाशा गांवात/वाडीतील भोळे भाविकांचे शुध्द अंतःकरण,अत्यंतीक विश्वास व निष्ठा यामुळे तेथील भाविक संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या प्रेमाने व प्रबोधनाने अत्यंत मोहीत होऊन भक्तिरसामध्ये अक्षरक्षः नाहून निघत. त्या ठिकाणचे कुलदैवत श्री खंडेश्वर यावर तेथील भाविकांची नितांत श्रध्दा आहे. वारक-यांची आळंदी व पंढरपूरच्या वारीप्रमाणेच आनंदवाडीतील भाविक किंवा श्री खंडोबाचे भक्त प्रतीवर्षी चैत्र पोर्णीमेला श्रीची काठी व पालखी घेऊन भजनाचा आनंद लुटत जेजुरीची वारी करतात. तेथील भाविक श्री खंडोबा हे कुलदैवत व पंढरपूरचा विठ्ठल वेगळा नसल्याचे अद्वेत ज्ञान अनुभवल्याने अखंड भक्तीसुखाचा आनंद लुटतात. कुलदैवत श्री खंडेश्वर दैवाचे यात्रेत रुढी परंपरेनुसार असलेल्या अनेक निरपराध बक-यांचे बळी देऊन त्यांच्या देहाने एकवेळचा प्रसाद लोकांना वाटत असे. हया शास्त्र विरहीत रुढीपरंपरा व चालीरीती बदलण्यासाठी संताचे अवतार कार्य असते. त्यायोगे आनंद संप्रदायाचे बीज ह.भ.प.गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे यांचे सहकार्याने व सोपान महाराज आनंदे यांच्या मार्फत आनदंवाडीत रोवले गेले.संतांच्या बोधावर विश्वास ठेवून या अनिष्ट पारंपारीक रुढी बंद करण्यालसाठी प्रयत्न केले.ग्रामस्थांच्या सहकार्याने ती प्रथा पुर्णतः बंद झाली. आनंदवाडी येथे पुर्वीच्या यात्रेत बदली करुन आता अखंड हरिनाम यज्ञ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरु झाले. नामाने साधकांमध्ये अष्टसात्वीक भाव उमटत. हा भक्ती‍चा अनुभव नसलेले कीर्तनकार या अष्ट‍सात्वीक भावास नांव ठेवत.त्यावर टीका करत त्यांचे ऐकून गांवातील काही कार्यकर्ते यास विरोध करु लागले. तब्बल ११ वर्षे हा विरोध होता.

निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म । निर्धार हे वर्म चुको नये ॥

परंतु संताचे कार्य शास्त्रानुसार संताच्या परंपरेनुसार असल्याने बाबांच्या कीर्तन व प्रवचन या कार्यावर प्रखर विरोध करु लागले. कीर्तन होण्यास विरोध होऊ लागला परंतु काही निष्ठावान नामधारक साधकांनी तिकडे दुर्लक्ष केले, हे सत्य भक्तीकार्य असल्याने सत्य उशीराने समजते हा विश्वास मनात बाळगून विरोधाकडे दुर्लक्ष करुन संताचे हे कार्य सुरु आहे.बघता बघता 12 वर्षे बाबा आनंदवाडीतील या सप्ताहास हजर राहून अनेकांचा उध्दार झाला तपपूर्ती सोहळा पार पडला व संपूर्ण विरोध मावळून भक्तीमार्ग उजळून निघाला. त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी पावन झाली.

उजळाया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥

देवाचे कृपेने संताचे आशिर्वादाने व गुरुवर्य ह.भ.प.गोविंदबाबा गाडगे व ज्ञानेश्वर महाराज झणझणे यांचे मार्गदर्शन व प्रेरणेने हया यज्ञाचे सन 2008 या वर्षी रौप्य महोत्‍सवी वर्ष संपन्ने झाले आहे.

याच जन्मी विचार थोर । हेतू धरुनी काळ सार ॥
ज्या‍ने जानुनी सारीला । आनंद लाभासी जडला ॥ :-संत शांतामाई ॥

संताचे अनुभव व महिमा अगाध आहेत, आनंदवाडीतील आम्ही पाहिलेला एक अनुभव अदभुत म्हणजे सत्य घटनाच. तेथील एक कुत्रा श्रीपाद बाबांचा आनंदवाडी प्रवेश होताच दोन्ही पाय बाबांच्या गळयांत घालून त्याच्या डोळयातून घळघळ अश्रु वाहत ते मोठ्याने अक्रोश करत बाबांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवताच ते शांत होत व बाबांचे पाय चाटत.बाबांचे कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सुरु असताना तो कुत्रा व्याठसपीठाचे बाजूला येऊन शांत बसत,मध्येच जर इतर कुत्र्यांनी गलबलाट केला तर तो कुत्रा तात्काळ गोंगाट करणा-या कुत्र्यांकडे जाऊन त्यांना शांत करत व पुन्हा कार्यक्रमस्थळी येऊन बसत,तो कर्माने कुत्र्याचे योनीत आला होता. वेळ आल्यावर जीवाचा उध्दार होतो हे फक्त पुराणात वाचले व ऐकले होते पण या ठीकाणी आम्ही् प्रत्यक्ष एका पशुयोनीतील जीवाचा उध्दार संताचे कृपने झाल्याचे अनुभवले.मग मनुष्याचा उध्दाय का होणार नाही? हा साधुसंताचा कृपाप्रसादच आहे.

कारगांव :-

ह.भ.प आबा उर्फ रामचंद्र महाराज देशमुख,बिबवी, सातारा यांच्या मागदर्शनाने व प्रेरणेने खोपोली,तालुका खालापूर जिल्हा-रायगड येथे होळीचे नि‍मत्‍त अखंड हरीनाम सप्ताह सुरु झाला.आज त्या ठिकाणी अडीच दिवसांचा वैष्णव मेळावा भाविकांच्या प्रेमाने व सहकार्याने संपन्न होत आहे.

पारगांव :-

गुरुवर्य ह.भ.प.पोपट महाराज चकवे यांची जन्मभूमी क्षेत्र मढ-पारगांव,ता- जुन्नंर,जिल्हा-पुणे,या ठीकाणी संत श्रीपादबाबा व संत रामदास बाबा यांच्या आशिर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह सन १९८६ साठी महाशिवरात्रि ‍निमीत्त सुरु झाला.संताचे महावाक्य नामाने साधकांमध्ये अष्टहसात्वीक भाव जागृत होत, अनेक लोक व वारकरी संप्रदायीक मंडळ त्यास विरोध करत.पारगांव येथील साधक भक्तीमय वातावरणातून ब्रम्हानंदाचा सुकाळच झाला.त्याचप्रमाणे ज्ञानयोग वारकरी मंडळ,मुंबई यांच्या सहयोगाने तसेंच गुरुवर्य ह.भ.प.पोपट महाराज चकवे यांच्या अनमोल प्रयत्नातून पारगांवमध्ये संत श्रीपादबाबा व संत रामदास बाबा यांचे भव्य असे स्मारक उभे आहे.या सप्ताहाचे सन २०११ हे वर्ष रौप्यद महोत्सवी वर्ष आनंदाने व उत्सांहात संपन्न. झाले. या प्रसंगी श्रीमद भागवत कथेचे आयोजन मंडळाने करुन गुरुवर्य ह.भ.प.पोपट महाराज चकवे यांनी या कथेचे निरुपन केले.ही साधुसंताची कृपा आहे.

संत श्रीपाद व संत रामदास आनंदाश्रम आळंदी देवाची

आळंदी देवाची येथे आध्यात्मिक ज्ञानप्रसार कीर्तन प्रवचन परंपरा टिकवणे,नामाचे द्वारे भागवत धर्माचे पालन,पाखंडयांचे खंडन व समाजाला संतानी अद्वेत भक्तीमार्ग सुलभ व्हावा या हेतूने आनंद आश्रमाची स्थापना झाली.अत्यंतीक दु:खाची निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती व्हावी यासाठी अतोनात कष्टस घेतले. महाराष्टांतील परोक्ष ज्ञानी व कर्मठ यांच्या उरात धडकी भरवणारे व्यक्तीमत्व म्हणजे श्रीपाद बाबा श्रोत्रीय,ब्रहृनिष्‍ठ व दयाळू अशा संताचा वारसा म्हणजे नामापासून निर्माण होणारे अष्टमसात्वीक भाव व आत्मानुभूतीने त्यांनी अनेकांचा उध्दार केला.
वारकरी सांप्रदायात महिलांना किर्तन प्रवचन करण्यास प्राधान्य दिले जात नव्हीते परंतु श्रीपाद बाबांनी ही नारदाची गादी व व्यासांचे व्यासपीठ स्त्रियांसाठी खुले केले.या त्यांच्या क्रांतीकारी कार्यामुळे शेकडो महिला किर्तनकार व अधिकारी तयार झाले.याच उद्येशाने संत ज्ञानेश्वरांची पावन भूमी आळंदी देवाची या ठिकाणी श्रीपाद व रामदास बाबांनी आनंद आश्रम साधकांच्यासाठी खुला केला.मात्र त्याचा कोणताही अधिकार स्वत:कडे काहीच ठेवला नाही.हया आश्रमात संत ज्ञानेश्वरांचा समाधीसोहळा असंख्य भाविकांच्यात उपस्थितीने व भक्तींप्रेमाने आत्मोन्नती विश्वशांती भारतीय श्रीगुरु स्वानंद प्रेमळ मंडळ,हया ट्रस्टीच्या माध्यंमातून संपन्नं होत आहे.कार्तिक शुध्द त्रयोदशीला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील अनेक कीर्तन व प्रवचन करणा-या कार्यकर्त्याना या ठीकाणी संधी देऊन धर्मकार्याचे ज्ञानकडू त्यांना दिले जाते.
संत श्रीपाद व संत रामदास ह्यांनी साधकाच्या आत्यंतिक दुखाची निवृत्ती व परम सुखाची प्राप्ती त्यासाठी कष्ट घेतले.एक असो,हजार असोत तेच सांगणे,तीच तळमळ त्यानी ज्ञानेश्वरी भागवताच्या प्रवचन चिंतन,अभंगाद्वारे व कीर्तन ह्या माध्यमातून धर्म प्रचार घरोघरी व गावोगावी जाउन केला व साधकांना देवाची ओळख करून दिली.

माझे सुख मज दावियले डोळां । दीधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥

संत श्रीपाद बाबांचे महानिर्वाण

कलीयुगात जडजीवासाठी अवतार गेऊन संत त्यांना सन्मार्गाला लावणे व भक्तीगमार्गाची जोपासणा करतात.

संतांच्या विभूती । धर्मालागी अवतरती ॥

कार्य संपल्यावर अनंतात विलीन होतात.याचप्रमाणे भाऊसाहेब चव्हान उर्फ श्रीपाद बाबां ही विभूती प्रगट झाली, समाजाने बहिष्कृंत केलेले,ज्यांचे समाजातील अस्तित्वंच संपलेले,अशा कित्येक वाल्ह्याकोळी व अजामेळासारखे परमपावन व उच्च स्थितीला प्राप्त झाले.महात्मे आपले अवतार कार्य संपल्यावार पाण्याप्रमाणे ज्या ठिकाणाहून आले त्या ठिकाणी जातात. दिनांक १० जानेवारी १९९८ रोजी संत माऊलींनी ज्या तिथीला समाधी घेऊन अनंतात विलीन झाले त्यांच तिथीला म्हणजे पौष शुध्द त्रयोदशीला आपले अवतार कार्य संपवले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र अनाथ झाला.महानिर्वाण प्रसंगी साधकांचे अंत:करण द्रवीभूत झाले होते.त्यांच्या जाण्याने वियोग भक्ताना सहन होत नसल्याने संपूर्ण घोटी क्षेत्र त्या‍वेळी शोकाकुल अवस्थेत होती.हा अवतारी महात्मा आमच्या घोटी गावात होता व तो आम्हाला अद्यापही समजला नाही याची मला खंत वाटते असे घोटी गांवचे सरपंच यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पन करताना व्यक्त केली. कारण हा महात्मा अलौकी होता, तुका म्हंणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुध्द ॥ याप्रमाणे संपूर्ण आयुष्य परमार्थात घालवले आणि त्याचेमुळे असंख्य साधकांना भक्ती धर्माचे रहस्य समजले. बाबांच्या पश्चात मातोश्री जाईबाई चव्हाण, मुली शकुंतला व मीराबाई आणि मुले गोपाल,यशवंतभाऊ व बाळासाहेब असा परिवार आहे.ह.भ.प.यशवंत, बाळासाहेब यांना बाबांनी महावाक्याचा उपदेश देऊन धर्म प्रसार करण्याचा वारसा दिला असून त्यांच्यामार्फत धर्मप्रसाराचे कार्य चालू आहे.

संत रामदास बाबांचे महानिर्वाण

भक्ती मार्गाचा वसा घेऊन अव्याहतपणे शरण आलेल्या साधकांना प्रेमाचा आनंद कसा मिळेल एवढा अट्टाहास सदैव उराशी बाळगून अखंड महाराष्ट्रामध्ये भक्तीधर्माचा प्रसार केले.

धर्मरक्षणासाठी बहु केली आटाआटी । श्रीपादाशी साथ करुनी हिंडला गिरी कपाटी ॥

श्रीपादबाबांच्या खांद्याला खांदा देऊन उभा महाराष्ट्र ढवळून काढला.त्यांच्या प्रत्येक क्षणाचा विचार केला तर सांधकांना भेटण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे.गोकुळात भगवान श्रीकृष्णाने गाई गोपाळांना भरभरुन प्रेम दिले त्याचप्रमाणे असंख्य साधकांना आपल्या गोड मधुन वाणीतून असंख्यं साधकांना ब्रहमरसात नाहून काढले.त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रेमाने भाविकांची मांदीयाळी जमवली. श्रीपादबाबांच्या महानिर्वानाची बातमी समजली त्यावेळी रामदास बाबांनी जीवनातील माझे सर्वस्व हरपले आता राहाणे नाही असा ध्यास श्रीपादांच बाबांचे वियोगातून त्यांनी घेतला.शेवटी भगवंताचे चिंतन करत करत आपला देह दिनांक २४ एप्रिल १९९९ रोजी ठेवला व चैतन्यात विलीन केला. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी ह.भ.प.रज्जूताई बुधवारे यांना बाबांनी कृपाप्रसाद दिल्याने ते संप्रदाय कार्यांत सहभागी आहेत.

संत श्रीपाद व संत रामदास बाबा पालखी सोहळा( रजी.)

साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज,संत एकनाथ, इत्यादी अनेक संतांचे पालखी सोहळे महाराष्टांतील वारकरी भक्तीभावाने पंढरपूरला विठठलाचे नामगजरात घेऊन जातात. त्याचप्रमाणे गुरुवर्य ह.भ.प.गोविदबाबा गाडगे व ह.भ.दादामहाराज शिंदे यांनी संत श्रीपाद व रामदास बाबांच्या पादुका पालखीतून आळंदी ते पंढरपूर अशा पायी वारीने न्यायचे ठरवले त्यास ह.भ.प.रामचंद्र महाराज इंगवले शालिक महाराज खंदारे यांनी साथ केली.बघता बघता अवघ्या दोन वर्षातच पायी पालखी ऐवजी रथ करुन रथातून सन १९९९ या वर्षी पालखी सोहळा सुरु झाला. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा या महात्यांची कीर्ती वाढवावी व साधकांना पायी वारीचे माध्यमातून भक्ती प्रेमाचा आनंद लुटता यावा, नाचत नाचत विठुरायाच्या दर्शनाला जावे हा आठाहास धरुन गुरुवर्य ह.भ.प. गोविंद बाबा गाडगे,साकोरी,ता.-जुन्नर,जिल्हा पुणे यांच्या अध्यक्षते खाली पालखी सोहळा सुरु करण्यांत आला. या सोहळयाला अनेकांनी विरोध केला,पण साधुसंताचे कार्य निस्वार्थीपणे केल्यास ते निर्वीघ्नपणे पार पडते हा साक्षात अनुभव अनेक साधकांनी अनुभवला.
गुरुवर्य गोविंदबाबा गाडगे यांच्या सत्वशील,प्रेमळ व मन मिळावू स्वभाने प्रतिवर्षी सोहळा वाढत आहे.काही साधकांनी महात्म्यांच्या रथासाठी रु.५०००/- प्रमाणे मदत केली.अनेक साधकांनी आळदी ते पंढरपूर पायी वारीसाठी अन्नदान पंगती व आवश्यक साहित्यासाठी उत्ततम प्रतीसाद दिला.गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज झणझणे-ओतुर व गुरुवर्य गोविदबाबा गाडगे साकोरी यां दोन्ही जोडीने मुंबई विभाग व इतर ठिकाणाहून साधकांच्या घरोघरी जाऊन झोळी पसरली व फार मोठी आर्थीक मदत उभी केली.ज्याप्रमाणे आळंदी येथे संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांचा आश्रम उभा करण्यासाठी त्यांनी अट्टाहास घेतला तसाच अट्टाहास घेऊन त्यांनी ठरवीले. गुरुवर्य गाडगे बाबा व झणझणे बाबा यांनी महाराष्ट्रातील साधकांना जागेच्या खरेदीसाठी केलेल्या आव्हानास मोठा प्रतिसाद मिळाला व अल्पावधीतच साधकांच्या सहकार्यातून आज पालखी सोहळा मंडळाचे प्रयत्नाने पंढरपूर क्षेत्री श्रीपाद व रामदास बाबा यांचा आश्रम उभा झाला आहे. पालखी सोहळयाचे खंदे सहकारी ह.भ.प.दादा महाराज शिंदे, वैकुंठवासी लक्ष्मण कुलवडे, रामचंद्र महाराज इंगोले,शालीक महाराज खंदारे,हनुमंत शिंदे, देवराम महाराज गांडाळ,शांताराम कुलवडे, गवते महाराज, गवते ताई, राक्षे काका, रमेश कदम, गोते अन्ना, पाटील (शिरसवडी) व इतरही पालखी सोहळयाचे सदस्यांनी सोहळयाच्या प्रगतीसाठी फार मोठे योगदान दिले, सोहळयाचा तपपूर्ती सोहळा सन २०१० मध्ये झाला. संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळा तपपूर्तीनंतरही पांडुरंग व संतांच्या कृपेने निर्विघ्नपणे सुरु आहे.