अष्ठप्रहरामध्ये प्रथम प्रहर साधु संताच्या साधनेचा असून या वेळ प्रसन्न असल्याने देवाची केलेली साधन फलद्रुप होते. ही संध साधुन सर्वसामान्यांनाही भगवत भक्तीचे महत्व कळावे व भक्तीचा आनंद लुटता यावा याकरिता संतांनी प्रार्थनेद्वारे अनेक रुपकातून भगवंताची करुणा भाकली. ही साधना पहाटेच्यावेळी असल्याने या भजनाला काकडा भजन संबोधले जाते.
पुढे वाचासामान्य माणसे संसारात त्रस्त झाली व व्यवहारीक उपाययोजनेने ते दु:ख दुर होत नाही असे दिसले म्हणजे मग देवाकडे धाव घेतात व म्हणूनच दु:ख हरण करणारा हा देवाचा धर्म ज्यात सांगीतला आहे ते नाम हरीपाठ रुपाने चटकन डोळयासमोर येते व वारंवार उच्चारले जाते. देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मुळीचे संचले जैसे तैसे ॥
पुढे वाचापुसताती संत सांगा देवा मातं ।
पूर्वी येथे होते कोण क्षेत्र ॥१॥
देव म्हणे स्थळ सिध्द हे अनादी।
येथेच समाधी ज्ञानदेवा ॥२॥
अष्टोत्तरशे वेळां साधिली समाधी।
ऐसे हे अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्हणे देवा सांगितले उत्तम।
ज्ञानांजन सुगम देखो डोळा ॥४॥
ज्याची त्याला पदवी इतरां न साजे ।
संताला उमजे आत्मसूख ॥१॥
आत्मसूख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी ।
याविण चावटी करु नका ॥२॥
करु नका काही संतसंग धरा ।
पूर्विचा जो दोहरा उगवेल ॥३॥
उगवेल प्रारब्ध संतसंगे करुनी ।
प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले ॥४॥