संत ज्ञानेश्‍वरांचे समाधी अभंग

पुसताती संत सांगा देवा मातं । पूर्वी येथे होते कोण क्षेत्र ॥१॥
देव म्‍हणे स्‍थळ सिध्‍द हे अनादी । येथेच समाधी ज्ञानदेवा ॥२॥
अष्‍टोत्‍तरशे वेळां साधिली समाधी । ऐसे हे अनादि ठाव असे ॥३॥
नामा म्‍हणे देवा सांगितले उत्‍तम । ज्ञानांजन सुगम देखो डोळा ॥४॥

मंगलमूर्ति सुखधामा । भक्‍ताचिया कल्‍पद्रुमा ।
निवृत्‍तीया पुरुषोत्‍तमा । नमो तुज ॥१॥
विद्यासागरा वैरागरा । संकटी माऊली ज्ञानेश्‍वरा ।
भरीत दाटले अंबरा । तो तू योगेश्‍वरा मोक्षदायी ॥२॥
मति चालविली रसाळ । संत श्रोतयां केला सुकाळ ।
दिधले पुरुषार्थाचे बळ । ते तूं केवळ संजीवन ॥३॥
अमृतानुभव आनंदलहरी । ग्रंथ सिध्‍द केला ज्ञानेश्‍वरी ।
संस्‍कृत प्राकृत वैखरी । वदविली माझी ॥४॥
आता मोक्षाचिया वाटा । पाहिला षडचक्र चोहटा ।
आज्ञा द्यावी वैकुंठा । ज्ञानदेव म्‍हणे ॥५॥

पुढे वाचा अष्‍टोत्‍तरशे वेळ समाधी निश्‍चळ । पूर्वी तुझो स्‍थळ वहनाखाली ॥१॥
उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२॥
आसन आणि धुनी मृगछालावर । पाहती ऋषीश्‍वर वोसंडोनी ॥३॥
बा माझया समाधी पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गहयगौप्‍य ॥४॥
नामा म्‍हणे देवा पुरातन स्‍थान । ऐसे नारायणे दावियेले ॥५॥

हस्‍त ठेविला माथया । ज्ञानदेव लागे पायां ।
विठोजी म्‍हणे लवलाहया । समाधीस बैसले ॥१॥
इंद्र चंद्र देव येती । ब्रह्मदिक गीते गाती ।
यम वरुण बृहस्‍पती । विमाने दाटती अंतरिक्षी ॥२॥
तंव पातले गरुडदेव । रुक्मिणी सत्‍यभामा भाव (माय) ।
राही माता गोपी सर्व । समाधि ज्ञानदेव पहावया ॥३॥
ब्रह्मा इंद्र प्रजापति । सर्व अंतरिक्षी पहाती ।
अलंकापुरी येत श्रीपती । हरुष चित्‍ती ज्ञानदेवा ॥४॥
ऋषिमुनी गणगंधर्व । पिशाच्‍च गहयक सर्व ।
ध्रुव अंबऋषि माधव । चित्‍तीं भाव पहावया ॥५॥
ऐसी दाटली विमाने । संत जाणताती ज्ञाने ।
ज्ञानदेव ब्रह्म होणे । हे विंदान विठ्ठलाचें ॥६॥
जय जय शब्‍दे ध्‍वनि गर्जे । तेणे स्‍वर्ग मृत्‍यु पाताळ गाजे ।
पाताळी शेष म्‍हणे भुंजे । प्रेमे फुंजे न समाये ॥७॥
नामा म्‍हणे शिवादिकां । सिध्‍देश्‍वरी मिळाले सकळिकां ।
पाहती विठ्ठल कौतुका । ज्ञानदेव समाधीचें ॥८॥

तव तेथे लवल वर्तले । आकाश असे विमानी दाटली ।
म्‍हणती मुळपीठ वैकुंठ देखील ॥ पुंडलिका सकट ॥१॥
पंढरीहूनी आले कैसे । पुंडलिक देव सरसे ।
ज्ञानदेवा सवे नामा असे । आणि विष्‍णुभक्‍त अपार ॥२॥
राही रखुमाई सत्‍यभामा । गाई गोपाळ मेघ:शामा ।
म्‍हणती पहा हो महिमा । या विष्‍णुभक्‍ताचा ॥३॥
सवे ध्रुवप्रल्‍हाद अंबऋषी । रुक्‍मांगद सुर्यवंशी ।
आणि ऋषीमुणी तापसी । ऐसे सहित वनमाळी ॥४॥
बळी भीष्‍म नारद । उध्‍दव अक्रुर विदगद ।
आणि बिभीषण सुबुध्‍द । हनुमंतादि करुनी ॥५॥
हाहा हूहू गंधर्व गाती । रुणु झुणु रुणु झुण विणे वाजती ।
देवांगना आरती ओवाळती । देवभक्‍तांसहित ॥६॥
ऐसा शुभ काळ समयो । झाला भाग्‍याचा उदयो ।
ज्ञानदेव नामदेव पहावो । धन्‍य धन्‍य धरातळीं ॥७॥
नामा नुघडी दृष्‍टीसी । ह्र्दय ध्‍यातसे ऋषीकेशी ।
ज्ञानदेवो निजमानसी । विष्‍णुमूर्तीशी लीन झाला ॥८॥

महाउस्‍त्‍सव त्रयोदशीं । केला त्‍या ज्ञानदेवासी ।
मग नामा म्‍हणे विठोबासी । चरण धरुनियां ॥१॥
समाधिसुख दिधले देवा । ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा ।
अजानवृक्षी बीज वोल्‍हावा । या भक्‍तजनांसी ॥२॥
कृपा आली विठठलासी । म्‍हणे ज्ञानदेव परियेसी ।
तीर्थ भागीरथी अहर्निशी । तुज नित्‍य स्‍नानासी दिधली ॥३॥
इंद्रायणी दक्षिण वाहिनी । भागिरथी मणिकर्णिका दोन्‍ही ।
इया मिळालिया त्रिसंगमीं । पूण्‍यभूमी तुझिये ॥४॥
येथे जरी नित्‍य स्‍थान घडे । तरी नित्‍य वैकुंठवास जोडे ।
तुज नाही कुवाडे । मी कोडे उभा असे ॥५॥
जेथे हरिकथा नाम वाचे । जो उच्‍चरील विठठलाचे ।
तयांसी पेणे वैकुंठीचें । दिधले साचे अक्षयी ॥६॥
आणिक ऐके रे ज्ञानराजा । जो या सिध्‍देश्‍वरी करी पूजा ।
तो अंतरंग भक्‍त पै माझा । मुक्‍ती सहजा जाहली त्‍यासी ॥७॥
नामा म्‍हणे ऐसे अंतरंग । कैसा ओळला पांडुरंग ।
ज्ञानदेवी समाधि सांग । हरे पांग कीर्तने ॥८॥

गगनपंथे शुभ्र विमानें । देव लक्षिती अधोवदनें ।
तंव अलंकमापुरी कीर्तने । टाळ मृदुंग झणत्‍कार ॥१॥
जयजयकार क्षिती होत । महादोषा संहार घात ।
नामा असे नाचत । पांडुरंगे म्‍हणितलें ॥३॥
ज्ञानदेव बैसले समाधी । पुढे अजानवृक्ष निधी ।
वामभागीं पिंपळ क्षिती सुवर्णाचा शोभत ॥४॥
निवृत्‍ती सोपान खेचर । ज्ञानदेव मुक्‍ताई निरंतर ।
करुनि अंत:करणा स्थिर । उत्‍तरद्वारी बैसले ॥५॥
देव म्‍हणे ज्ञानेश्‍वरा । चंद्रसूर्य जंव दिनकरा ।
तंव तुझा समाधि स्थिर । राहो रे निरंतर ॥६॥
जंववरी हे क्षिति मंडळ । जंववरी हे समुद्रजळ ।
मग कल्‍पक्षयीं यथाकाळ । माझ्या हृदयी ठसावे ॥७॥
आणिक एक सोपारें । ज्ञानदेव ही चारी अक्षरें ।
जो जप करील निर्धारे । त्‍यासी ज्ञान होईल ॥८॥
ऐसा दिधला आशीर्वादा । संतासी बोले गोविंद ।
ज्ञानदेवा ऐसा उदबोध । दुजा न । देखो दृष्‍टीसी ॥९॥
नामा म्‍हणे स्‍वामी माझा । अगीकार केला वोजा ।
पावला भक्‍ताचिया काजा । गरुडारुढ होऊनी ॥१०॥

ब्रह्मादिक तेथे करिताती पूजा । घालिताती सेजा समाधीसी ॥१॥
चिद्रत्‍न आसन उन्‍मनीची धुनी । समाधि सज्‍जनी पाहियेली ॥२॥
धुवट वस्‍त्राची घडी ते अमोल । तुळशी आणि बेल आंथरिले ॥३।१
दुर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे । पुष्‍पे तरु सकळ समर्पिली ॥४॥
नामा म्‍हणे छाया निरंतर । सुखी ज्ञानेश्‍वर सुखावला ॥५॥

लावियेला दीप निरंजन ज्‍योती । प्रकाशल्‍या दीप्‍ती तन्‍मयाच्‍या ॥१॥
पजुनी समाधि निघाले बाहेर । प्रेमे ज्ञानेश्‍वर डुल्‍लतसे ॥२॥
अनुमानिले स्‍थळ सभोवती सारें । धन्‍य ज्ञानेश्‍वर कृपा केली ॥३॥
देव आणि नामा रुक्‍माई । राही स्‍फुंदती ठायी ठायी संतजन ॥४॥

वोसंडोनि निवृत्ति आलिंगो लागली । आणिकांच्‍या डोळां अश्रु येती ॥१॥
अमर्यादा कधी केली नाही येणे । शिष्‍य गुरुपण सिध्दि नेलें ॥२॥
गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा । गुह्य गौप्‍यमाळा लेवविल्‍या ॥३॥
फेडिली डोळ्यांची अत्‍यंत पारणी । आतां ऐसे कोणी सखे नाही ॥४॥
काढोनियां गुह्य देवे केले फोल । आठवती बोल मनामाजी ॥५॥
नामा म्‍हणे संत कासावीस सारे । लाविती पदर डोळियांसीं ॥६॥

पुढे ज्ञानेश्‍वर जोडोनियां कर । बोलतो उत्तर स्‍वामीसंगे ॥१॥
पाळीले पोसिले चालविला लळा । बा माझ्या कृपाळा निवृत्तिराजा ॥२॥
स्‍वामीचियां योगे झालो स्‍वरुपाकार । उतरलो पार मायानदी ॥३॥
निवृत्‍तीने हात उतरिला वदना । त्‍यागिले निधाना आम्‍हांलागीं ॥४॥
नामा म्‍हणे देवा देखवेना मज । ब्रह्मी ज्ञानराज मिळविला ॥५॥

निवृत्तिदेव म्‍हणे करितां समाधान । कांही केल्‍या मन राहात नाही ॥१॥
बांधल्‍या तळ्याचा फुटलासे पाट । ओघ बारा वाटा मुरडताती ॥२॥
बांधल्‍या पेंढीचा सुटलासे आळा । तृण रानोमाळा पांगलेसे ॥३॥
हरिणीविण खोपी पडियेली वोस । दशदिशा पांडस भ्रमताती ॥४॥
मायबापे आम्‍हां त्‍यागियेले जेव्‍हां । ऐसे संकट तेव्‍हां झाले नाही ॥५॥
नामा म्‍हणे देवा पेटला हुताशन । करा समाधान निवृत्‍तीचे ॥६॥

सर्व स्‍वस्तिक्षेम वैष्‍णव मंडळी । बैसलेती पाळी समाधीच्‍या ॥१॥
पताकांची छाया दुणावली फार । सिध्‍द ज्ञानेश्‍वर तेंव्‍हा झाले ॥२॥
अजानवृक्ष दंड आरोग्‍य अपार । समाधीसमोर स्‍थापियेला ॥३॥
कोरडया काष्‍ठा फुटियेला पाला । तेव्‍हां अवंघियाला नमस्‍कारी ॥४॥
नामा म्‍हणे देवा घार गेली उडोन । बाळे दानादान पडियेली ॥५॥

साडेतीन पाउले टाकिली निश्‍चळ । नेमियले स्‍थळ उत्‍तरायणीं ॥१॥
देव म्‍हणे ज्ञाना होई सावधान । माग वरदान मज कांही ॥२॥
ज्ञानदेव म्‍हणे शुध्‍द कार्तिक मासीं । व्रत एकादशी स्‍वामीकडे ॥३॥
कृष्‍णपक्षी व्रत हरिदिन परिपूर्ण । मागितला मान ज्ञानदेवें ॥४॥
नामा म्‍हणे देवा आवडीने देता । जोडले हे संता पीयूष जैसें ॥५॥

देव निवृत्ति यांनी धरिले दोन्‍ही कर । जातो ज्ञानेश्‍वर बैसावया ॥१॥
नदीचिया माशा घातले माजवण । तैसे जनवन कालवले ॥२॥
दाही दिशा धुंद उदयास्‍तावीण । तैसेचि गगन कालवले ॥३॥
जाऊनि ज्ञानेश्‍वर बैसले आसनावरी । पुढे ज्ञानेश्‍वरी ठेवियेली ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा । पादपदमी ठेवा निरंतर ॥५॥
तीनवेळा तेव्‍हा जेव्‍हा जोडिले करकमळ । झांकियले डोळे ज्ञानदेवे ॥६॥
भीममुद्रा डोळां निरंजन मैदान । झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव ॥७॥
नामा म्‍हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्‍वर समाधिस्‍थ ॥८॥

निवृत्‍तीने बाहेर आणिले गोपाळा । घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्‍ताई सांदिली शरीरा । म्‍हणती धरा धरा निवृत्‍तीसी ॥२॥
आणिकांची तेथे उद्विग्‍न ती मनें । घालिताती सुमने समाधीसी ॥३॥
नामदेवे भावे केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्‍यापुरुषा ॥४॥

देव म्‍हणे रुक्‍मणी । हा ऐकची योगी देखिला नयनीं ।
हेचि ज्ञान संजीवनी । जाण त्रैलो क्‍यासी ॥१॥
धन्‍य धन्‍य धरातळी । जो याते दृष्‍टी न्‍याहाळी ।
तो वहात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ॥२॥
जो करील याची यात्रा । तो तारील सकळ गोत्रा ।
सकळही कुळें पवित्रा । याचेनि दर्शने होती ॥३॥
अलंकापुरी हे शिवपीठ । पूर्वी येथे होते नीलकंठ ।
ब्रह्मादिकी तप वरिष्‍ठ । येथेचि पैं केलेंडर ॥४॥
इंद्र येऊनियां भूमीसी । याग संपादिले अहनीशी ।
इंद्रायणी इंदोरिसी । पंचक्रोशी यापासुनीं ॥५॥
येथे त्रीवेणी गुप्‍त असें । भैरवापासुनी भागीरथीं वसे ।
पूर्व वटी जे माया दिसे । ते प्रत्‍यक्ष जाण पार्वती ॥६॥
भोवती वन वल्‍ली वृक्षी । येथे देव येऊनी होती पक्षी ।
हे असे नित्‍य साक्षी । अस्‍थी नासती उदकी ॥७॥
पंढरीहूनि हे सोपे । जनांची हरावया पापे ।
कळिकाळ कोपलिया कांपे । न चले चि अलंकापुरासी ॥८॥
ऐसे सांगतां हरीसी । प्रेम आसेंडले रुक्मीणीसी ।
म्‍हणे धन्‍य धन्‍य जयाचे कुशी । ज्ञानदेव जन्‍मलें ॥९॥
नामा म्‍हणे माझा स्‍वामीं । वसे संत समागमी ।
ऐसे संगीतले ग्रामी । अलंकापुरासी ॥१०॥

समाधि परिपूर्ण बैसले ज्ञानेश्‍वर । उठविले भार वैष्‍णवांचे ॥१॥
अलंकापुरी सव्‍य घेतली ते संती । दिली भागीरथी ज्ञानालागी ॥२॥
भैरवापासूनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थ गंगा ॥३॥
सैंध इंद्रायणी वाहती मिळोनी । अखंड ते क्षणीं ओघ जाती ॥४॥
चालिले विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण झाली म्‍हणती ॥५॥
तीर्थ महोत्‍सह झाला म्‍हणती सारासार । देव ऋषीश्‍वर परतले ॥६॥
वैष्‍णवांचे भार निघाले बाहेरी । केला जयजयकार सर्वत्रांनी ॥७॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्‍वार देव झाले ॥८॥
नामा म्‍हणे ऐसा सुखी ज्ञानेश्‍वर । झाला असे स्थिर ब्रह्मबोधें ॥९॥

ऐसियांचे जो चरित्र आवडी ऐके । तो या भक्‍तांबरोबरी तुके ।
भोगी वैकुंठ निजसुखे । देव स्‍वयंमुखे बोलिलें ॥१॥
धन्‍य धन्‍य तो पुंडलिक भक्‍त । जया कारणे हरि तिष्‍ठत ।
ऐसे पोवाडे गर्जतात । जग तारीत नामे करुनि ॥२॥
जन्‍मोजन्‍मी सभाग्‍य होती । तयांलागी निजपद प्राप्ति ।
करा काळी पुनरावृत्ति । न येती मागुती संसारी ॥३॥
नामा म्‍हणे नामस्‍करणे । तुटती प्रपंचधरण बंधनें ।
ते सुख पावती निधान । समचरण देखलियां ॥४॥


संत सोपानदेव समाधी अभंग

देव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठा । जावे सासवडा उत्सवासी ॥१॥
सोपानासी आम्ही दिधले वचन । चला अवघेजन समुदाय ॥२॥
अलंकापुरीची यात्रा केली असे सांग । मग पाडुरंग सिदध झाले ॥३॥
दुरोनी पातका दिसती मनोहर । उठावले भार वैष्‍णवांचे ॥४॥
निवृत्ति मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कर्हेतरी ॥५॥
नामा म्हणे देव गंधर्व सुगरण । चालिले सोपान समाधीसी ॥६॥

कळ्वळी मन नाही देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे झाले ॥१॥
संत साधुजन होती कासावीसी । आले समाधीपाशी तांतडीने ॥२॥
समाधी भोवते कुंकमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी कळ्वळी मन नाही देहभान । वटेश्वर सोपान सोंवळे झाले ॥१॥
संत साधुजन होती कासावीसी । आले समाधीपाशी तांतडीने ॥२॥
समाधी भोवते कुंकमाचे सडे । पाहाती निवाडे अवघे जन ॥३॥
वरी मृगछाला दिसताती लाल । दर्भ आणि फुले समर्पिली ॥४॥
दुर्वा आणि बेल टाकिले मोकळे । साहित्य सकळ समर्पिले ॥५॥
निवृत्ति पांडुरंग बैसले येउन । नमन सोपान करीतसे ॥६॥

सोपानदेवे ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तीच्या ॥१॥
सवे मुक्ताबाई सदगुरु निवृत्ती । लक्ष्मीचा पती घेतलीया ॥२॥
जयजयकार ध्वनि होताती अपार । जाती योगेश्वर समाधीसी ॥३॥
राही रखुमाबाई नीळकंठ जवळी । समाधीच्या पाळी अवघेजन ॥४॥
समाधी पायरीवरी वटेंश्वर सोपान । मागितला मान पाडुंरंग ॥५॥
प्रतीवषी भेटी देउ उभयता । अलंकापुरी जाती उत्सवासी ॥६॥
नामा म्हणे देवा क्रुपा केली फार । दिधला की वर भक्तराजा ॥७।।

धुप आणि दीप उजळिल्या ज्योती । तेव्हा ओसंडती अवघे जन ।।१॥
सोपान वटेश्वर केला नमस्कार । उतरले पार भवसिंधु ॥२॥
घेतियले तीर्थ तंव झाले विकळ । झांकियले डोळे ब्रह्म-बोधे ॥३॥
निवृत्ति मुक्ताई राहिली बाहेरी । आंता तुम्ही हरि सांभाळावे ॥४॥
देव त्रषीश्वर निघाले बाहेर । केला नमस्कार नामदेवे ॥५॥

जयजयकार टाळी पिटली सकळी । घातियेली शीळा समाधीसी ।।१॥
निवृत्ति मुक्ताईने घातयेली घोण । करितो समाधान पांडुरंग ॥२॥
सोपान वटवेश्वर सुखधामी शेजा । करिताती पूजा समाधीची ॥३॥
खेद दु:ख झाले अवघ्या साधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी शेजा ॥४॥
निवृत्ति मुक्ताईने वंदिली समाधी । देहभान शुध्दि हारपली ॥५॥
नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करु आचमन भोगावती ॥६॥

जाती ब्रह्मादिक जाती चराचर। मायीक व्यवहार ऐशा परी ॥१॥
प्रक्रुती पुरुषाचा मांडियेला खेळ । जाईल सकळ नाशिवंत ॥२॥
चंद्रसुर्य जाईल, मृगज़ळ । जाती तिन्ही ताळ शून्यपोटी ॥३॥
होईल निरामय अवघे चराचर । ब्रह्मीचा विस्तार होईल ब्रह्मी ॥४॥
नामा म्हणॆ स्वामी जाताती सकळ । ब्रह्मी माया मुळ झाली कैसी ॥५॥

पुढे वाचा