महर्षी नारदांनी नारद भक्तिसुत्रात प्रेमरुप भक्तिचे माहात्म्य वर्णन करुन इतर साधनापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. सुत्रांमद्ये आधी भक्ती प्रेमात रंगलेला भक्ताचा आचार व अनुभव आणि नंतर त्यावरुन भक्ति विषयक तत्वे ठरविली गेली आहेत. साधक भक्ताने जीवनात भक्तीची लक्षणे पूर्णतः बाणून भक्तीशास्त्रातील अनुभव घेण्यासाठी मार्गदर्शन वरील नारद भक्तीसुत्र हा ग्रंथ अत्यंत लाभदायक ठरेल.
पुढे वाचाग्रंथराज ज्ञानेश्वरीत नरदेहाचे महत्व जाणून कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग याचे विस्त्रुत ज्ञान महाभारतातील एकादश स्कंदाचा मागोवा घेउन भगवंताने अर्जुनाच्या माध्यमातुन जगाला भक्ती-ज्ञान भांडार खुले केले. याद्वारे भक्तीची पूर्णताः भगवत प्रेमात असल्याचे विशेषत्वाने विविध लक्षणांनी संत ज्ञानेश्वरांनी प्रमाणसिध्द विषद केले आहे. चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथीची तेथ । आपादकंचुकीत । रोमांच आले ॥
पुढे वाचाभक्ति शिकवणारे भक्ति शास्त्रं म्हणजे श्रीमदभागवत होय.भक्तिच्या सर्व तात्वीक अंगाचा विचार यामध्ये आढळून येतो.भक्त व देव यांच्यातील परस्पर प्रेमाचे आनंदमय दर्शन व अंतःकरणात भक्तिचा प्रवेश भागवतात घडून येतो. ऐकाजी तुम्ही भक्ता भागवत । कराल ते हित सत्य करा ॥
पुढे वाचाआध्यात्मशास्त्रातील प्रभु रामचंद्राच्या जीवन चरीत्रातावर आधारील माणवी जीवनाला भक्तीमार्गाची दिशा देणारा व मार्गदर्शन ठरणारा भावार्थ रामायण हा महान ग्रंथ संत एकनाथ महाराजांनी आत्मीयतेने व प्रेमभावाने जगाचे कल्यासाठी साकारलेला आहे.साधकाला श्रोत्रीय, ब्रहमनिष्ठ व दयाळू सद्गुरुंचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर त्याच्या जीवनात साधना करताना देवाविषयी प्रेमभाव अर्थात अष्टसात्वीकभाव निर्माण होतात.
पुढे वाचासंताचे किंवा सद्गुरुच्या बोधाने भक्त नामस्मरणाचे योगे आत्मसाक्षात्कार पावलेल्या भक्तांच्या व देवाच्या लिलांचे वर्णन श्रवण करताना भगवद्भक्तीमध्ये वेड्या झालेल्या भक्ताची अवस्था कशी होते याबाबते विवरण श्रीहरिविजय या ग्रंथात केले आहे.या ग्रंथातील भावावस्था व प्रेमाचे वर्णन खालील अध्यायात केले आहे.
पुढे वाचारुक्मीणी स्वयंवर या ग्रंथातील आत्मज्ञानाचे अनुभूतीचे अष्टसात्वीक भावाचे विवरण खालीलप्रमाणे करण्यांत आलेले आहे. कृष्णरुपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी । -हदयी आर्विर्भवली मूर्ती । बाहयस्फुर्ती मावळली ॥ आंग जाहले रोमांचित । कंठी बाष्प पै दाटत । शरीर चळचळा कापत । पडे मूर्छित धरणीये ॥
पुढे वाचाश्रीमद् गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखकांनी नमुद केल्याप्रमाणे ज्या ज्या भक्तांनी श्रीगुरुंना शरण जाऊन भग्वद्भक्तीला सुरवात केली त्यांच्या जीवनामध्ये भगवद्भावाचे आलेले अनुभव या ग्रंथात सविस्तर, उत्कृष्ट व स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचा साधकाने आत्मीयतने अभ्यास केल्यास अष्टसात्वीकभावा प्रमाणे अनुभुती आली तरच ही भक्ती शास्त्राप्रमाणे होय, अन्यथा साधकांने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पुढे वाचापरमार्थाची तळमळ असणा-या साधकांसाठी भगवत भक्तीची परमोच्च स्थिती भक्ती प्रेमाची अनुभुती चंद्रादेवी,गदाधर,मथुरबाबु,श्रीरामकृष्णत,विवेकानंद यांची परमार्थातील व्याकुळता,विरह अवस्था याचे स्पुष्टपणे दर्शन यामध्ये करण्यांत आले आहे.
पुढे वाचासंत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत बोधला महाराज, संत चोखा महाराज, संत सोयराबाई, संत भानुदास महाराज, संत कान्होबा, संत निळोबाराय,संत एकनाथ महाराज, संत नामदेव, निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान, संत तुकाराम महाराज या सर्वांना आलेले भक्तिमार्गातील अवस्थेचे अनुभव ओवी रूपामध्ये मांडले आहेत.
पुढे वाचाविवेक सिंधु या ग्रंथात शिष्य श्रीसद्गुरुंना अनन्य भावाने शरण जाऊन अनुग्रह अर्थात दिक्षा घेतल्यानंतर श्रीगुरु त्याला कसे कृतार्थ करतात त्याची अनुभूती या ग्रंथात यथार्थपणे आहे. याचे साधकाला किंवा भक्ताला भक्तीमार्गात अत्यंत उत्तम मार्गदर्शन आहे. तवशिष्य तापत्रयीं संतप्तु । शमदमसाधनीं संयुक्तु । गुरुतें शरणांगतु । विनविता जाला ॥
पुढे वाचामज सप्रेमाची आस्था । त्याचे मोचे मी वाहे माथा । ऐशी प्रेमळाची सांगता कथा । प्रेम कृष्णनाथा चालिले ॥६७३॥कंठ झाला सद्रदित । अंग झाले रोमांचीत । धावोनि उद्धवासी खेंव देत । प्रेम अद्बुत हरिचे ॥६७४॥सजल जाहले लोचन । वरुषताती स्वानंदजीवन । भक्तिसाम्राज्य पटाभिषिंचन । उध्दवासी जाण हरि करी ॥६७५॥
पुढे वाचा