ग्रंथराज ज्ञानेश्वरीत नरदेहाचे महत्व जाणून कर्मयोग,ज्ञानयोग,भक्तियोग याचे विस्त्रुत ज्ञान महाभारतातील एकादश स्कंदाचा मागोवा घेउन भगवंताने अर्जुनाच्या माध्यमातुन जगाला भक्तिज्ञान भांडार खुले केले. याद्वारे भक्तिची पूर्णताः भगवत प्रेमात असल्याचे विशेषत्वाने विविध लक्षणांनी संत ज्ञानेश्वरांनी प्रमाणसिध्द विषद केले आहे.चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथीची तेथ । आपादकंचुकीत । रोमांच आले ॥ भक्तिच्या माध्यामातून साधक भक्तांना देवाबाबत अर्थात आत्मस्वरुपाचे अनुभव शास्त्रात प्रतिपादन केले आहे.संतानी आपला अनुभव ग्रंथ किंवा शास्त्राद्वारे जगाला निर्माण केला आहे. साम्राज्या चक्रवर्ती महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमध्ये याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.
तया नांव गा अधियज्ञु । ऐसे बोलला जव सर्वज्ञू तव अर्जुन प्रतिपाज्ञू । तया पातले ते ॥५३॥ हे जाणोनि म्हणीतले देवे । पार्था परिस तु आहासि बरवे । या कृष्णाचिया बोलासवे । येरु सुखाच जाहाला ॥५४॥ देखा बालकाचीया धणी धाइजे । का शिष्याचेनि जाहलेपणे होईजे । हे सद्दगुरुची एकलेनि जाणिजे । का प्रसवतीया ॥५५॥ म्हणोनी सात्वीक भावांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुनाआधी । न समातसे परी बुध्दी । सावरुनी देवे ॥५६॥ मग पिकलीया सुखाचा परिमळु । का निवालीया अमृताचा कल्लोळु । तैसा कोवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥५७॥.
येतुलें हे वाड सायासे । जंव बोलत असे दृढ मानसे । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विके केले ॥५२६॥ चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथीची तेथ । आपादकंचुकीत । रोमांच आले ॥५३७॥ अर्धोन्मीलित डोळे । वर्षताती आनंदजळे । आतुलिया सुखोर्मीचेनी बळे । बाहेरी कापे ॥५२८॥ पै आघवांची रोममूळी । आली स्वेदकणीका निर्मळी । लेईला मोतीयांची कडीयाळी । आवडे तैसा ॥५२९॥ ऐसा महासुखाचेनी अतिरसे । जेथ आटणी होईल जीवदशे । तेथ निरोपीले व्यासे । ते नदीच हो ॥५३०॥ आणि कृष्णार्जुनाचे बोलणे । घोकरी आले श्रवणे । की देहस्मृतीचा तेणे । वापसा केला ॥५३१॥ तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी । सर्वांगीचा स्वेदु परीमार्जी । तेवीच अवधारा म्हणे हो जी । धृतराष्ट्राते ॥५३२॥ आता कृष्णनवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणेनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रेमेय पीकाचा ॥५३३॥ अहो अळुमाळ अवधान देयावे । येतुलनी आनंदाचीया राशीवरी बैसावे । बाप श्रवणेंद्रीया दैवे । घातळी माळ ॥५३४॥ म्हणोनी विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिध्दांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तिचा ॥५३५॥ तसेच (अध्याय १८वा ओवी क्र. १५७६ ते १५७९, ओवी क्र. १६०० ते १६०७, ओवी क्र. १६१६ ते १६२२)
मच्चित्ता मध्दसतप्राणा बोधयन्तथः परस्परम । कथयन्तलश्वमां नित्या तुष्यओन्ति च रमन्ती च ॥
चित्ते मीची जाहाले । मियाची प्राणे धाले । जीवो मरो विसरले । बोधाचीया भूली ॥११९॥ मग तया बोधाचीया भूली । नाचती संवादसुखाची भोजे । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥१२०॥ जैशी जवळीकेची सरोवरे । उचंबळलीया कालवती परस्पंरे । मग तरंगासी धवळारे । तरंगची होती ॥१२१॥ तैसी येरयेरांचीये मिळणी । पडत आनंद कल्लेळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणी । बोधेची मिरवी ॥१२२॥ जैसे सूर्ये सूर्याते वोवाळीले । की चन्द्रे चंद्रम्याण क्षेम दिधले ॥१२३॥ तैसे प्रयाग होत सामरस्याचे । वरी वोसाण तरत सात्वी काचे । ते संवादचतुष्पणथींचे । गणेश जाहाले ॥१२४॥ तेंव्हा तया महासुखाचेनी भरे । धावोनी देहाचीया गावाबाहेंरे । मिया घाले तेणे उदगारे । लागती गाजो ॥१२५॥ पै गुरुशिष्यांच्या एकांती । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगती । गर्जती सैंध ॥१२६॥ जैसी कमळकळिका जालेपणे । ह्रदयीचिया मकरंदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदाचे ॥१२७॥ तैसेची माते विश्वी कथीत । कथीतेनी तोषे कथू विसरत । मग तया विसरामाजी विरत । आंगे जीवे ॥१२८॥ ऐसे प्रेमाचेनि बहुवसपणे । नाही राती दिवसो जाणणे । केले माझे सुख अव्यंगवाणे । आपणपेया जिही ॥१२९॥
ततःस विस्मयाविष्टोध ह्रष्टरोमा धनंजयः । प्रणम्यत शिरसा देवं कृताज्जलिरभाषत ॥१४॥
तेथ एक विश्व एक आपण । ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण । तेही आटोनि गेले अंतःकरण विराले सहसा ॥२४५॥ आतुला महानंदा चेइरें जाहले । बाहेरि गात्रांचे बळ हारपोनी गेले । आपाद पा गुंतले । पुलकांचले ॥२४६॥ वर्षीये प्रथमदशे । वोहळलया शैलाचे सर्वांग जैसे । विरुढे कोमलांकुरी तैसे । रोमांच आले ॥२४७॥ शिवतला चंद्रकरी । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणीका शरीरी । दाटलीया ॥२४८॥ माजी सापडलेनि अलीकुळे जळावरी कमळकळीका जेवी आंदोळे । तेवी आंतुलीया सुखोर्मीचेनी बळे । बाहेरी कापे ॥२४९॥ कर्पूर केळीची गर्भपुटे । उकलता कापुराचेनि कोंदाटे । पुलीका गळती तेवी थेंबूटे । नेत्रोनी पडती ॥२५०॥ ऐसा सात्वीकांही आठा भावा । परस्परें वर्ततसे हेवा । तेथ ब्रम्हा्नंदाची जीवा । राणीव फावली ॥ २५१॥ उदयलेनी सुधाकरे । जैसा भरलाची समुद्र भरे । तैसा वेळोवेळा उर्मीभरे । उचंबळत असे ॥२५२ ॥ तैसाची तया सुखानुभावापाठी । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उससौनि कीरीटी । वास पाहीली ॥ २५३॥ तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिकडे मस्तक खालविला देवा । जोडोनी करसुंपट बरवा । बोलतु असा ॥५४॥ सी आघवीची हे कथा । तया अपूर्णमनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥४८२॥ मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलीया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ । बोलता तया ॥४८३॥ नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे । घुमघुमिला मंदराचळ । क्षीराब्धी जैसा ॥४८४॥ जैसे गंभीरे महानादे । हे वाक्य विश्वकंदे । बोलिले अगाधे । अनंतरुपे ॥४८५॥ ते अर्जुनें मोटके ऐकीलें । आणि सुख कीं भय दुणावले । हे नेणो परी कांपिन्नलें । सर्वांग तयाचे ॥४८६॥ सखोलपणे वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळा ललाट । चरणी ठेवी ॥४८७॥ तेवींचि कांही बोलों जाये । तंव गळा बुजालाची ठाये । हें सुख की भय होये । हे विचारा तुम्ही ॥४८८॥ परी तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें । मिया पदांवरी देखिलें । श्लोकाचिया ॥४८९॥ मग तैसाचि भेणभेण पुढती जोहारुनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेति ॥४९०॥
आधीच आम्हां यया कांही । नरनारायणासी भिन्न नाहीं । परी आतां जिरो माझा ठाई । वेगु हा माझा ॥४५८॥ इया बुध्दी सहसा । श्रीकृष्णा म्हणे वीरेशा । पैगा तो तुवां कैसा । प्रश्न केला ॥४५९॥ जो अर्जुन कृष्णीं विरत होता । तो परतोनिया मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐकों आला ॥४६०॥ येथ सदग्दें बोलें । अर्जुनें जी जी म्हणीतले निरुपाधिक आपले । रुप सांगा ॥४६१॥
मग सावळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु । आलिंगीला स्वशरणु । भक्तराजु तो ॥१४१८॥ न पवतां जयातें । काखे सूनि बुध्दीतें । बोलणे मागौंतें । वोसरले ॥१४१९॥ ऐसें जें कांही एक । बोला बुध्दीसीही अटक । तें द्यावया मिख । खेवाचें केलें ॥१४२०॥ ह्रदया ह्रदय ऐक जालें । ये ह्रदयींचे ते ह्रदयीं घातले । द्वैत न मोडीतां केले । आपणाऐसें अर्जुना ॥१४२१॥ दीपें दीप लाविला । तैसा परिष्वंगु तो जाला । द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थु ॥१४२२॥ तेव्हां सुखाचा मग तया । पुरू आला जो धनंजया । तेथ वाड तर्ही बुडोनिंया । ठेला देव ॥१४२३॥
पुर्णब्रह्म जाला पार्थ । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णानाथु । उल्लंघो नेदी ॥१५४७॥ एह्रवीं आपलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणे । परी केलें पुसणें याचिलागीं ॥११४८॥ एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण । आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥१५४९॥ मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजुमंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्र ॥१५५०॥ जैसा ब्रह्म मीं हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे । हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥१५५१॥ ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे । मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥१५५२॥ मग कापतां करतळीं । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळीं । जिरुऊनियां ॥१५५३॥ प्राणक्षोमें डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु चाळया । भुलैनियां ॥१५५४॥ नेत्रयुगुळाचेनि वोंते । आनंदामृताचें भरितें । वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥१५५५॥ विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं । ते करुनियां पैठी । ह्रदयामाजीं ॥१५५६॥ वाचेचें वितुळणें । सांवरुनि प्राणें । अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥१५५७॥
भाव अक्षराची गाठी । ब्रह्मज्ञानाने गोमठी ॥ किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली । तेणे निगम वल्ली प्रकट केली ॥ ग्रंथराज ज्ञानेश्वरीत नरदेहाचे महत्व कर्मयोग,ज्ञानयोग, भक्तीयोग याचे विस्त्रुत ज्ञान अर्जुनासारखा अधिकार पुढे ठेवून भगवंताने सकल विश्वाला भक्ती-ज्ञान भांडार खुले केले.भक्तीची पूर्णता भगवत प्रेमात असल्याचे विशेषत्वाने विवध लक्षणांनी रेखाटले आहे.
भक्तीच्या माध्यमातून साधक भक्तांना येणारे देवाबाबत अर्थात आत्मस्वरुपाचे अनुभव शास्त्रात प्रतिपादन केले आहेत.संतानी आपापल्या अनुभव ग्रंथ किंवा शास्त्राद्वारे जगाला निर्माण केला आहे. साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या भावार्थ दिपीका अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.
तया नांव गा अधियज्ञु । ऐसे बोलला जव सर्वज्ञू तव अजुन प्रतिपाज्ञू । तया पातले ते ॥५३॥ हे जणोनि म्हणितले देवे । पार्था परि रस तु आहासि बरवे । या कृष्णाचिया बोलासवे । येरु सुखाच झाहला ॥५४॥ देखा बालकाचीया धणी धाइजे । का शिष्याचेनि जाहलेपणे होईजे । हे सद्दगुरुची एकलेनि जाणिजे । का प्रसवतीया ॥५५॥ म्हणोनी सात्वीक भांवांची मांदी । कृष्णाआंगी अर्जुनाआधी । न समातसे परी बुध्दी । सावरुनी देवे ॥ ५६ ॥ मग पिकलीया सुखाचा परिमळु । का निवालीया अमृताचा कल्लोळु । तैसा कोवळा आणि सरळु । बोलु बोलिला ॥५७॥.
येतुलें हे वाड सायासे । जंव बोलत असे दृढ मानसे । तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विके केले॥५२६॥चित्त चाकाटले आटु घेत । वाचा पांगुळली जेथीची तेथ ।
आपादकंचुकीत । रोमांच आले ॥ ५३७॥अर्धोन्मीलित डोळे । वर्षताती आनंदजळे । आतुलिया सुखोर्मीचेनी बळे । बाहेरी कापे ॥५२८॥ पै आघवांची रोममूळी । आली स्वेदकणीका निर्मळी । लेईला मोतीयांची कडीयाळी । आवडे तैसा ॥५२९॥ ऐसा महासुखाचेनी अतिरसे । जेथ आटणी होईल जीवदशे । तेथ निरोपीले व्यासे । ते नदीच हो ॥५३०॥ आणि कृष्णार्जुनाचे बोलणे । घो करी आले श्रवणे । की देहस्मृतीचा तेणे । वापसा केला ॥५३१॥तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी। सर्वांगीचा स्वेदु परीमार्जी । तेवीच अवधारा । म्हणे हो जी । धृतराष्ट्राते ॥५३२॥ आता कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणेनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रेमेयपीकाचा ॥५३३ ॥अहो अळुमाळ अवधान देयावे । येतुलनी आनंदाचीया राशीवरी बैसावे । बाप श्रवणेंद्रीया दैवे । घातळी माळ ॥५३४॥ म्हणोनी विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिध्दांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तिचा ॥ ५३५ ॥ तसेच (अध्याय १८वा ओवी क्र. १५७६ ते १५७९, ओवी क्र. १६०० ते १६०७, ओवी क्र. १६१६ ते १६२२)
मच्चीत्ता मध्दतप्राणा बोधयन्त: परस्परम । कथयन्तश्वमां नित्य तुष्यन्ति च रमन्ती च ॥ चित्ते मीची जाहाले । मियाची प्राणे धाले । जीवो मरो विसरले । बोधाचीया भूली ॥११९॥ मग तया बोधाचीया भूली । नाचती संवादसुखाची भोजे । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधची वरी ॥१२०॥ जैशी जवळीकेची सरोवरे । उचंबळलीया कालवती परस्परे । मग तरंगासी धवळारे । तरंगची होती ॥१२१॥ तैसी येरयेरांचीये मिळणी । पडत आनंद कल्लेळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणी । बोधेची मिरवी ॥ १२२ ॥ जैसे सूर्ये सूर्याते वोवाळीले । की चन्द्रे चंद्रम्या क्षेम दिधले ॥ १२३ ॥ तैसे प्रयाग होत सामरस्याचे । वरी वोसाण तरत सात्वीकाचे । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहाले ॥ १२४॥ तेंव्हा तया महासुखाचेनी भरे । धावोनी देहाचीया गावाबाहेंरे । मिया घाले तेणे उदगारे । लागती गाजो ॥१२५॥ पै गरुशिष्यांच्या एकांती । जे अक्षरा काची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगती । गर्जती सैंध ॥१२६॥ जैसी कमळकळिका जालेपणे । -हदयीचिया मकरंदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदाचे ॥१२७॥ तैसेची माते विश्वी कथीत । कथीतेनी तोषे कथू विसरत । मग तया विसरामाजी विरत । आंगे जीवे ॥१२८॥ ऐसे प्रेमाचेनि बहुवसपणे । नाही राती दिवसो जाणणे । केलेंडर माझे सुख अव्यंगवाणे । आपणपेया जिही ॥ १२९ ॥
त: स विस्मयाविष्टो –हष्टरोमा धनंजय: । प्रणम्य शिरसा वंकृताज्जिलरभाषत ॥ १४॥ तेथ एक विश्व एक आपण । ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण । तेही आटोनि गेले अंत:करण विराले सहसा ॥२४५॥ आतुला महानंदा चेइरे जाहले । बाहेरि गात्रांचे बळ हारपोनी गेले । आपाद पा गुंतले । पुलकांचले ॥२४६॥वर्षीये प्रथमदशे । वोहळलया शैलाचे सर्वांग जैसे । विरुढे कोमलांकुरी तैसे । रोमांच आले ॥२४७॥शिवतला चंद्रकरी । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकिणका शरीरी । दाटलीया ॥२४८॥माजी सापडलेनि अलीकुळे जळावरी कमळकळीका जेवी आंदोळे । तेवी आंतुलीया सुखोर्मीचेनी बळे । बाहेरी कापे ॥२४९॥कर्पूर केळीची गर्भपुटे । उकलता कापुराचेनि कोंदाटे । पुलीका गळती तेवी थेंबूटे । नेत्रोनी पडती ॥२५०॥ ऐसा सात्वीकाही आठा भावा । परस्परे वर्ततसे हेवा । तेथ ब्रम्हानंदाची जीवा । राणीव फावली ॥ २५१॥उदयलेनी सुधाकरे । जैसा भरलाची समुद्र भरे । तैसा वेळोवेळा उर्मीभरे । उचंबळत असे ॥२५२ ॥ तैसाची तया सुखानुभावापाठी । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उसासौनि कीरीटी । वास पाहीली ॥२५३॥ तेथ बैसला होता जिया सवा । तयाचिकडे मस्तक खालाविला देवा । जोडोनी करसुंपट बरवा । बोलतु असा ॥५४॥ सी आघवीची हे कथा । तया अपूर्णमनोरथा । संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे ॥४८२॥ मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलीया वाजत खळाळ । तैशी वाचा विशाळ ।
बोलता तया ॥४८३॥ नातरी महामेघांचे उमाळे ।घडघडीत एके वेळे । घुमघुमिला मंदराचळ । क्षीराब्धी जैसा ॥४८४॥ जैसे गंभीरे महानादे । हे वाक्य विश्वकंदे । बोलिले अगाधे । अनंतरुपे ॥४८५॥ ते अर्जुने मोटके ऐकीले । आणि सुख की भय दुणावले । हे नेणो पिर कापिन्नले । सर्वांग तयाचे ॥४८६॥सखोलपणे वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट । वेळोवेळा ललाट । चरणी ठेवी ॥४८७॥तेवीचि काही बोलो जायेगा । तव गळा बुजालाची ठाये । हे सुख की भय होये । हे विचारा तुम्ही ॥४८८॥परी तेव्हा देवाचेनि बोले । अर्जुना हे ऐसे जाहले । मिया पदांवरी देखिले । श्लोकीचिया ॥४८९॥मग तैसाचि भेणभेण पुढती जोहारुनि चरण । मग म्हणे जी आपण । ऐसे बोलिलेति ॥४९०।१
आधीच आम्हा यया काही । नरनारायणा सिने नाही । परी आता जिरो माझा ठाई । वेगु हा माझा ॥४५८॥ इया बुध्दी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा । पैगा तो तुवा कैसा । प्रश्न केला ॥४५९॥ जो अर्जुन कृष्णी वीरत होता । तो परतोनिया मागुता । प्रश्नावळीची कथा । ऐको आला ॥४६०॥ येथ सदगदे बोले । अर्जुने जी जी म्हणीतले निरुपाधिक आपले । रुप सांगा ॥४६१॥
पुर्णब्रहृ जाला पार्थ । तरी पुढील साधावया कार्यार्थु । मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघो नेदी ॥ १५४७ ॥ ए-हवीं आपलें करणे । सर्वज्ञ काय तो नेणे । परी केलें पुसणें याचिलागीं ॥११५४८ ॥ एवं करोनि प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण । आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥ मग क्षीराब्धीतें सां डितु । गगनीं पुंजुमंडितु । निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्र ॥ १५५० ॥ जैसा ब्रह्म मीं हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मतें भरे । हेंही सांडी तरी विरे । ब्रह्म पणही ॥१५५१ ॥ ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दु:खे देहाचिये सीमे । मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला ॥ १५५२ ॥ मग कापतां करतळीं । दडपूनि रोमावळी । पुलिका स्वेदजळीं । जिरुऊनियां ॥ १५५३ ॥ प्राणक्षोमें डोलतया । आंगा आंगचि टेंकया । सूनि स्तंभु जाळया । भुलैनियां ॥१५५४ ॥ नेत्रयुगुळाचेनि वोंते । आनंदामृताचें भरितें । वोसंडत तें मागुतें । काढूनियां ॥१५५५॥ विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं । ते करु नियां पैठी । -हदयामाजीं ॥१५५६ ॥ वाचेचें वितुळणें । सांवरुनि प्राणें । अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं ॥१५५७॥
मग सावळा सकंकणु । बाहु पसरोनि द क्षिणु । आ लिंगीला स्वशरणु । भक्तराजु तो ॥ १४१८॥ न पवता जयाते । काखे सूनि बुध्दीते । बोलणे मागौते । वोसरले ॥१४१९॥ ऐसे जे काही एक । बोला बुध्दीसीही अटक । ते द्यावया मिख । खेवाचे केले ॥१४२०॥ ह्रदया ह्रदय ऐक जाले । ये ह्रदयीचे ते ह्रदयी घातले । द्वैत न मोडीता केले । आपणाऐसे अर्जुना ॥२१॥ दीपे दीप लाविला । तैसा परिष्वंग तो जाला । द्वैत न मोडिता केला । आपणपे पार्थु ॥२२॥ तेव्हा सुखाचा मग तया । पुरू आला जो धनंजया । तेथ वाड तर्ही बुडोनिया । ठेला देव ॥२३॥
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः । ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥२३॥
तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम । तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे ॥३२८॥
तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥३२९॥
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं । ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥३३०॥
कष्टले संसारशीणें । जे देवों येती गाऱ्हाणें । तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा ॥३३१॥
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वें तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें ॥३३२॥
मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें । मागां असत ठाके । पुढां उभें ॥३३३॥
परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थनगरीं । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं । तयांसीच कळे ॥३३४॥
हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥३३५॥
पैं सृष्टीचिया उपक्रमा । पूर्वीं गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥३३६॥
मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके । तो थोरु केला एकें । नामें जेणें ॥३३७॥
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥३३८॥
तेधवां रचिलें ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन । यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें ॥३३९॥
पाठीं नेणों किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें ॥३४०॥
ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें । तयाचें स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥३४१॥
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥३४२॥
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु । हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें ॥३४३॥
येणेंसीं गा होऊनि एक । जैं कर्म चाले सात्त्विक । तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी ॥३४४॥
परी कापुराचें थळींव । आणून देईल दैव । लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा ॥३४५॥
तैसें आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें ॥३४६॥
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे ॥३४७॥
कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवीं ॥३४८॥
तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म । विनियोगेंवीण काम । विफळ होय ॥३४९॥
अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख । जेऊं नेणतां बालक । लंघनचि कीं ॥३५०॥
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥३५१॥
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण ॥३५२॥
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हें परब्रह्मनाम एक । विनियोगु तूं आइक । आतां याचा ॥३५३॥