मज सप्रेमाची आस्था । त्याचे मोचे मी वाहे माथा । ऐशी प्रेमळाची सांगता कथा । प्रेम कृष्णनाथा चालिले ॥६७३॥कंठ झाला सद्रदित । अंग झाले रोमांचीत । धावोनि उद्धवासी खेंव देत । प्रेम अद्बुत हरिचे ॥६७४॥सजल जाहले लोचन । वरुषताती स्वानंदजीवन । भक्तिसाम्राज्य पटाभिषिंचन । उध्दवासी जाण हरि करी ॥६७५॥सहजें प्रेमळाची करिता गोठी । संमुख उध्दव देखिला द्रुष्टी । धांवोनीया घातली मिठी । आवडी मोठी भक्तांची ॥६७६॥आवडी पडिले आलिंगन । विसरले कर्याकारण । विसरला स्वाधामगमन । मीतूंपण नाठवे ॥६७७॥ नाठवे देवभक्तापण । नाठवे कथानिरुपण । नाठवे उध्दवा उध्दवपण । क़ृष्णा कृष्णपण नाठवे ॥६७८॥प्रेमळाचे गोठीसाठी । परात्पर परतटी । दोघा ऐक्ये पडली मिठी प्रेमाची ॥६७९॥आजि भक्तिचे निजसुख । उध्दवासी फावले देख । भक्तिचे प्रेम अलौकीक । उध्दवे सम्यक विस्तारले ॥६८०॥
श्लोक : रामेण सार्धं मथुरां प्रणीते श्वाफल्किना मय्यनुरक्तचित्ता: ॥ विगाढभावेन न मे वियोगतीव्राधयोन्न्यं दद्शु: सुखाय ॥ १० ॥ बळिभद्रासमवेत तत्वतां । अक्रुरें मज मथुरे नेतां । तै गोपिकांसी जे झाली व्यथा । ते सांगता मज न ये ॥२५॥ ते त्यांची अवस्था सांगता । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता । ऐसे देवो सांगतसांगता । कंठीं बाष्पता दाटली ॥१२६ ॥ सांगता भक्तांचें निजप्रेम । प्रेमे द्रवला पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम । कृपा निरुपम भक्तांची ॥१२७॥ मज मथुरे जातां देखोनी आसवांचा पूर नयनी । ह्रुदय फुटे मजलागुनी । प्रेम लोळणी घालिती ॥१२८॥ पोटांतील परम प्राती । सारितां मागें न सरती । धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागी ॥१२९॥ नवल भावार्थ त्यांच्या पोटी । माझ्या रुपीं घातली मिठी । सोडिवतां न सुटे गांठी । श्वास पोटीं परतेना ॥१३०॥ लाज विसरल्या सर्वथा । सासुरां पति पित्यां देखतां । माझे चरणी ठेवूनि माथा । रडती दीर्घता आक्रंदें ॥१३१॥ मजवीण अवघे देखती वोस । माझीच पुन:पुन्हा पाहती वास । थोर घालोनि निश्वास । उकसाबुकसीं स्फुंदत ॥१३२॥ आमुचा जिवलग सांगाती । घेऊनि जातो हा दुष्टमूर्ती । अक्रूरा संमुख क्रुर म्हणती । येती काकुळती मजलागीं ॥१३३॥ उभ्या ठाकोनि संमुख । माझे पाहती श्रीमुख । आठवे वियोगाचें दु:ख । तेणें अधोमुख विलपती ॥१३४॥ ऐशिया मजलागी आसक्त । माझ्या ठायीं अनन्य चित्त । विसरल्या देहसुखे संमस्त । अतिअनुरक्त मजलागीं ॥१३६॥ मजवेगळें जें जें सुख । तें गोपिकांसी केवळ दु:ख । कैशी आवडी अलोकिक । मज –हदयीं देख न विसंबती ॥१३७॥ मज गोकुळीं असतां । माझे ठायीं आसक्त चित्ता । ते आसक्तीची समूळ कथा ऐक आतां सांगेन ॥१३८॥
भक्ताचा त्रिवध प्रेमा एकनाथ भागवत अध्याय ११
सात्वीक राजस व तामस या तीन प्रकारची प्रेम अवस्था साधकामध्ये किंवा भक्तामध्ये पुढीलप्रमाणे अनुभवाला येते.
श्रवणी ध्यानी बैसल्यापाठी । सगुण निर्गुण काहि नुठी । निळे पिवळे पडे दिठी । गुणक्षोभ त्रिपुटी कषाय ॥७११॥श्रवणी ध्यानी हे अवगुण । तैसाची त्रिवीध प्रेमा जाण । तो वोळखती विचणक्ष । ऐक लक्षण सांगेन ॥७१२॥महावीरांचे शौर्यपण । ऐकोनी युध्द दारुण । अत्यंत हरीखे उल्हासे मन । तो प्रेमा जाण राजस ॥७१३॥दु:ख शोकाची अवस्था । का गेल्या मेल्याची वार्ता । अत्यंत विलापाची कक्षा । ज्यासी एकता न संठे ॥७१४।१नेत्री अश्रुंचीया धारा । स्फुंदणे कापे थरथरा । प्रेम विलाप अवसरा । तो जाण खरा तामसू ॥७१५॥सगुण मुर्तीची संपदा । शंक चक्र पदम कदा । पिंतांबर धारी गोविंदा । ऐकोनी आनंदा जो भरे ॥७१६॥नेत्री आनंद जीवण । ह्रदयी न संठे स्फुंदन । कृष्णमय जहाले मन । तो प्रेमा जाण सात्विका ॥७१७॥यावरी प्रेमा चौथा । अतर्क्य तर्केना सर्वथा । उध्दवा तु मज लागी पढीयता । तोही आता सांगेन ॥७१८॥तुझया भावार्थाची अवस्था मोठी । ते बोलवीते गुहय गोठी । तुज वेगळा पाहता दृष्टी । अधीकारी सृष्ठी दिसेना ॥७१९॥श्रीकृष्ण म्हणजे सावधान । ऐकानी निर्गुण श्रवण । ज्यांचे चिन्मार्ती बुडे मन । उन्मज्जन होऊ नेने ॥७२०॥ जेवी का सैंदवाचा खडा । पडता सिंधु माजीवडा । तो झाला सिंधुची एवढा । तेवी तो धडपुडा ब्रम्ह होय ॥७२१ ॥ चित्त चैतन्या पडता मिठी । सुटता लिंग देहाची गाठी । नेत्री अश्रुंचा पूर दाटी । रोमांची उठी सर्वांगी ॥ ७२२॥ जीवभावाची दशा आटे । आणीवार बाष्प कंठी दाटे । काही केल्या शब्द न फुठे । पुरु लोटे स्वेदाचा ॥ ७२३॥ नेत्र झाले उन्मीलीत । पुंजाळले जेथीचे तेथ । विस्मयाचे भरते येत । ओसंडत स्वानंदे ॥७२४॥हा जाण पा प्रेमा चौथा । उत्तम भागवत अवस्था । तूज म्या सांगीतली तत्वता । तीच्या जाणता मी एकू ॥७२५॥ निर्गुणी जो प्रेमा जाण । ते शोधीत सत्वाचे लक्षण ।हे मी जाणे उण खूण । का ब्रम्हसंपन्न जाणती ॥७२६॥
कथं विना रोमहर्ष द्रवता चेतसा विना । विनानंन्दाश्रुकलया शुध्येभ्दक्त्या विनाशाय:
आवडी हरीकथा ऐकता । नाना चरीत्रे श्रवण करीता । माझी आत्मचर्चा ह्रदयी धरीता । पालटू चित्ता तेणे होय ॥३०७॥ तेणेची उपजे माझी भक्ती । माझया भजनाच्या अतीप्रिती । आवडी माझी नामे गाती । रंगी नाचती सदभावे ॥३०८॥पोटातूनिया उल्हासता । रंगी गाता पै नाचता । अंतरी द्रवो झाला चिता । ते अवस्था बाहय दिसे ॥३०९॥अंतरी सुखाची झाली जोडी । बाहय रोमांची उभीली गुढी । त्या स्वानुभवसुखाची गोडी । नयनी रोकडी प्रवाहे ॥३१०॥माझे भक्तीची आवडी । अहं सोंह दोनी कुडी । तुटली अभीमानाची बेडी । विषय ओडी निमाली ॥३११॥ते काळीचे हेची चिन्ह । पुलकांकीत देहो जाण । नयनी आनंद जीवन । ह्रदयी परीपुर्ण स्वानंदू ॥ ३१२॥ पुंजाळले दोनी नयन । सदासर्वदा सुप्रसन्न ।स्पुरेना देहाचे भान । भगवंती मन रंगले ॥३१३॥ ऐशी नुपजता माझी भक्ती । कैची होय विषय विरक्ती । विरक्तीवीन माझी प्राप्ती । नव्हे निश्चीत उध्दवा ॥३१४॥माझी शुध्द भक्ती तत्वता । साचार आली जयाचे हाता । ऐक त्याच्या चिन्हाची कथा । आणि पवीत्रता तयाची ॥३१५॥माझे भक्तीसी जो लागला । तो तात्काळ पवित्र झाला । त्याने त्रिलोक पुनीत केला । हे गर्जोनी बोलीला श्रीकृष्ण ॥३१६॥ वाग्गदगदा द्रवते यस्य चितं रुदत्यभीक्ष्णं हसती क्व चिश्च । विलज्ज उग्दायती नृत्यतेच मदभक्तीयुमभक्तो भुवनं पुनाति ॥ २४॥अंगी रोमांच रवरवीत । स्वेदबींदू डळमळित । चित्त चैतन्ये द्रवत । तेणे सदगदीत पै वाचा ॥३१७॥हर्ष ओसंडता पोटी । अर्धोन्मीलीत होय दृष्टी । जीवाशिवा पडली मिठी । ध्यान त्रिपुटी मावळली ॥३१८॥नयनी अश्रूंचा पूर लोटी । उभंडू न संटेची पोटी । होत जीवा भावाची तुटी । पडे सृष्टी मुर्छीत ॥३१९॥आक्रंदे थोर आक्रोशे । वारंवार रडता दिसे । रडण्यामाजी गदगदा हसे । जेवी लागले पिसे ब्रम्हग्रहो ॥३२०॥ रडण्या हासणे सांडे । त्याही माजी नवल आवडे अर्थाव बोधे गाणे मांडी । निजात्मगोडीचेनी योगे ॥३२१॥विसरोनी माझे तुझे सांडोनीया लोक लाजे । हरीखे प्रेमाचेनी भोजे । नेणे नाचीजे निश्चंग ॥३२२॥ गाणे नाचणे हासणे । तो रडे कासया कारणे । ऐक तेही लक्षणे । तूज कारण सांगेन ॥३२३॥ माऊली वेगळे बाळक पडे । जननी पाहता कोठे नातुडे । भेटता ओरडोनी रडे । मिठी पडे सप्रेम ॥३२४॥जीव परमात्मा दोनी । चुकामुकी झाली भ्रमपट्टणी । त्यांसी एकाकी होता मिळणी । रडे दिर्घस्वरे स्फुंदत ॥३२५॥बहुकाळे झाली भेटी । ऐक्यभावे पडली मिठी । तेणे उभंडू न संटे पोटी । रुदन उठी सप्रेम ॥३२६॥
श्लोक : दारुक:कृष्णपदवीम न्विच्छन्नधिगम्यताम ।वायुं तुलसिकामोदमाघ्राया भिमुखं ययौ ॥४२॥
कृष्ण न देखतां दारुक । कासावीस झाला देख । शोधीत श्रीकृष्णपदांक । पृथ्वी सम्यक अवलोकी ॥३१८॥ तंव कृष्णकंठींच्या तुळसीमाळा । त्यांचा आमोद दारुका आला । तेणें गंधाभिमुखें निघाला । तंव देखता झाला महातेज ॥ ३१९॥