परमार्थाची तळमळ असणा-या साधकांसाठी भगवत भक्तीची परमोच्च स्थिती भक्ती प्रेमाची अनुभुती चंद्रादेवी,गदाधर,मथुरबाबु,श्रीरामकृष्णत,विवेकानंद यांची परमार्थातील व्याकुळता,विरह अवस्था याचे स्पुष्टपणे दर्शन यामध्ये करण्यांत आले आहे.
स्वामी रामकृष्‍ण परमहंस यांना भगवद्भक्‍तीमार्गात कठोर साधना करता करता भक्‍तीची उच्‍चतम अवस्‍था प्राप्‍त झाली.भक्‍तीमय जीवनात प्रभु प्रेमाची परिपूर्ण अनुभूती असल्‍याने त्‍यांच्‍या सहवासात येणा-याला भक्‍तीचा सहजच लाभ होईल.त्‍यांना आलेले भगवद्प्रेमाचा अनुभव श्री रामकृष्‍ण चरित्र या त्‍यांच्‍या ग्रंथात खालील पृष्‍ठ क्रमांकांवर पहावयास मिळतात.ते अनुभव सारांशरुपाने दिलेले असून त्‍याची तपशीलवार माहती विषद करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यांत आला आहे.

स्‍वामी रामकृष्‍ण परमहंस यांच्‍या श्री रामकृष्‍ण चरित्र या ग्रंथात भगवदभक्‍तीतील अष्‍टसात्विक भावांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.

चंद्रादेवीची अवस्‍था – (पान क्र.२०)

एक दिवस धनीबरोबर बोलत असताना आपल्‍या घरासमोरच्‍या शिवमंदिरापुढे मी उभी होते,इतक्‍यात असे दिसले की महादेवाच्‍या अंगातून एक दिव्‍य ज्‍योती बाहेर पडून तीने सर्व मंदिर भरुन टाकले आहे.वायूप्रमाणे तरंगाकार होऊन ती माझ्याकडेच वेगाने येत आहे; आश्‍चर्याने चकित होऊन मी ती धनीला दाखविते तो ती ज्‍योती माझ्याजवळ आली आणि माझ्या अंगात शिरली;विस्‍मयाने आणि भायाने मी एकदम मूर्छित होऊन जमिनीवर पडले. धनीने डोक्‍यावर पाणी शिंपून मला सावध केल्‍यावर झालेली सर्व हकीकत मी तिला सांगीतली.तिलाही अत्‍यंत आश्‍चर्य वाटून मी म्‍हणाली,तुला वात झाला आहे.हे सुध्‍दा मी धनीला आणि प्रसन्‍नला सांगितले,पण त्‍यांनी मला वेडी,मुर्ख अशी एक ना दोन शेकडो नांवे ठेवली आणि तुला भ्रमच झाला आहे,तुला वायुगुल्‍मच झाला आहे अशा नाना त-हेच्‍या गोष्‍टी सांगून ही गोष्‍ट कुणाजवळही बोलू नको असे सांगितले;त्‍यांचे राहू द्या पण आपल्‍याला काय वाटते मला रोग झाला आहे की माझ्यावर देवाची कृपा झाली आहे;पण मला आपले अजून वाटते की, माझ्या उदरात गर्भ संचार झाला आहे.

गदाधराची अवस्‍था (१) -(पृष्‍ठ क्र.३०)

(गदाधर महणजेच रामकृष्‍ण)
ईश्‍वरकृपेकरुन जन्‍मापासूनच गदाधराचे शरीर गुटगुटीत व मजबूत असून त्‍याची प्रकृती निरोगी असे.त्‍यामुळे त्‍याची वृत्‍ती नेहमी एखाद्या पक्ष्‍याप्रमाणे स्‍वच्‍छंदी नि आनंदी असे.शरिरबोधराहित्‍य हेच शरीराच्‍या पूर्ण स्‍वास्‍थ्‍याचे लक्षण होय असे मोठमोठे धन्‍वतंरी समजतात.अशा प्रकारचे स्‍वास्‍थ्‍यसुख गदाधराला लहानपणापासूनच लाभले होते.त्‍याचे स्वाभाविक एकाग्र चित एखाद्या विषयाकडे लागले म्‍हणजे तो इतका तन्‍मय होऊन जाई की,त्‍यांचे शरीराचे भान सर्वतोपरी नाहीसे होई;शुध्‍द वायूने डोलणारी हिरवीगार शेते,शांत गंभीर नि स्‍वच्‍छ नदीची कलकल,पक्ष्‍यांचा किलि‍बलाट व विशेषत:निळे आकाश व त्‍यातील क्षणोक्षणी रुप बदलणारी अभ्रे अशा एखाद्या देखाव्‍याने प्रतिबिंब त्‍याच्‍या शुध्‍द मनावर पडताक्षणी तो एकाएकी बेहोश होऊन जाई व त्‍याचे मन भावराज्‍यातील कुठल्‍यातरी एका दूरच्‍या प्रदेशात निघून जाई.हा प्रकार त्‍याच्‍या असामान्‍य भावप्रवणतेमुळेच होत असे.एकदा गदाधर एका माळावरुन जात असता आकाशात एक काळाकुटट ढग वर येत होता व त्‍याच्‍यावरुन दुधासारखे पांढरे शुभ्र काही बगळे उडून जात होते.हा देखावा पाहताच तो त्‍यातच इतका काही तन्‍मय होऊन गेला की,तो एकाएकी बेहाश होऊन खाली पडला;डोक्‍यावर पाणी वगैरे शिंपडल्‍यावर ब-याच वेळाने तो सावध झाला.या प्रकाराने गदाधराचे आई-वडील व इतर मंडळी यांना काळली वाटू लागली व हा मूर्च्‍छेचा रोग कायमचा न जडावा म्‍हणून त्‍यांनी औषधोपचार सुरु केले व शांती केली.गदाधर मात्र म्‍हणाला की,मला आलेली मुर्च्‍छा रोगाची नव्‍हती,तर त्‍या स्थितीत मला अत्‍यंत आनंदाचा अनुभव होत होता.

गदाधराची अवस्‍था (२) - (पृष्‍ठ क्र.३५)

गदाधर अशारीतीने आनंदात देवीची गाणी म्‍हणत चालला असता एकाएकी त्‍याचा आवाज थांबला,डोळयांतून अश्रुधारा वाहू लागल्‍या व संज्ञाशून्‍य होऊन तो जमिनीवर कोसळला.

गदाधराची अवस्‍था (३) - (पृष्‍ठ क्र.३८)

पण इकडे शिवाच्‍या ध्‍यानात गदाधर इतका तन्‍मय होऊन गेला की त्‍याचे भाषण व गाणे बंद पडून त्‍याला भावसमाधी लागली सर्व मंडपात एकच गोंधळ उडाला.मंडळींनी गदाधराला उचलून आत नेले व अंगावर पाणि वगैर शिपडल्‍यावर कि‍तीतरी वेळाने तो सावध झाला.त्‍या दिवशीचे नाटक,झाल्‍या प्रकारामुळे अर्थातच तेवढयावरच थांबले.
या वेळेपासून गदाधराला मधे मधे भाव समाधी लागू गेली.देवादिकांचे ध्‍यान करीत असता,अथवा देवांची स्‍तुतीपर गाणी ऐकत असता त्‍याने इतके तन्‍मय व्‍हावे की,काही वेळपर्यंत त्‍याचे देहभान नस्‍ट व्‍हावे.ज्‍या दिवशी ही तन्‍मयता अतिशय वाढे त्‍या दिवशी तर त्‍याचे बाहयज्ञान अगदी नष्‍ट होऊन जाऊन त्‍याचा देह एखाद्या लाकडी ठोकळयाप्रमाणे जड होऊन पडावा;सावध झाल्‍यानंतर विचारता त्‍याने सांगावे,ज्‍या देवतेचे ध्‍यान मी करीत होतो,तिच्‍या स्‍तूतीचे गाण ऐकत होतो त्‍या देवतेचे दिव्‍य दर्शन मला झाले.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था –(४) - (पृष्‍ठ क्र.१२३)

या तन्‍मयतेचा लेशमात्र ह्रास होऊन जर एक क्षणभर श्रीजगदंबेचे दर्शन झाले नाही,तर मन कसे व्‍याकुळ होई की त्‍या विरहाच्‍या वेदना असह्य होऊन मी जमिनीवर गडबडा लोळावे आणि आपले तोंड मातीत घासून,ओक्‍साबोक्‍सी रडून व आक्रोश करुन आकाशपातळ एक करुन सोडावे;जमिनीवर लोळल्‍याने व मातीसी तोंड घासल्‍याने सर्वांग रक्‍तबंबाळ होऊन जाई.पण तिकडे लक्षच जात नसे.पाण्‍यात पडलो आहे,की चिखलात पडलो आहे,की विस्‍तवात पडलो आहे त्‍याचे भानच नसे;काही वेळ अशा असह्य वेदनांत गेल्‍यावर पुन्‍हा श्रीजगदंबचे दर्शन व्‍हावे व पुन्‍हा मनात आनंदाचा समुद्र उचंबळू लागावा.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (५) - (पृष्‍ठ क्र.१३६)

श्रीरामकृष्‍णांच्‍या साधक जीवनाचा जितका विचार करावा तितकी ही गोष्‍ठ अगदी स्‍पष्‍टपणे दिसून येते की,काली माता मंदिरातील बहुतेकांचा त्‍यांना उन्‍माद झाला आहे असा जरी समज झाला असला,तरी त्‍यांचा हा उन्‍माद मेंदूच्‍या विकाराने अथवा एखाद्या रोगामुळे खास झालेला नव्हता.हा उन्‍माद नसून दिव्‍योन्‍माद होता.ही ईश्‍वराच्‍या दर्शनासाठी त्‍यांच्‍या अंत:करणात उत्‍पन्‍न झालेली प्रचंड व्‍याकुळता होती व याच व्‍याकुळतेच्‍या प्रबळ वेगामुळे त्‍याकाळी ते स्‍वत:ला आवरु शकत नसत व एखाद्या उन्‍मत्‍तासारखे बेफाम आचरण करीत असत.ईश्‍वराच्‍या दर्शनासाठी त्‍यांच्‍या ह्र्दयात एकसारखी प्रचंड ज्‍वाला पेटली असल्‍यामुळे इतर साधारण लोकांशी नेहमीच्‍या व्‍यवहारातील गप्‍पागोष्‍टी ते करत नसत,म्‍हणून ते सर्व लोक यांना उन्‍माद झाला आहे असे म्‍हणत.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था –(६) - (पृष्‍ठ क्र.१५४)

श्रीजगदंबा मातेच्‍या पूर्ण दर्शनाचा लाभ झाल्‍यानंतर जेंव्‍हा दिव्‍योन्‍मादावस्‍था त्‍यांच्‍या अंगी पूर्णपणे बाणली तेव्हा पूर्ण यौवन प्राप्त झालेल्‍या आपल्‍या पत्‍नीला त्‍यांनी दक्षिणेश्‍वरी आणून ठेविले;श्रीजगदंबे माता ज्ञानाने पूजा केली;आठ महिने पर्यंत तिच्‍या बरोबर एकत्र वास केला;एवढेच काय पण तिच्‍या बरोबर एक शय्येवर शयन सुध्‍दा केले;व तिला बरे वाटावे व आनंद व्‍हावा म्‍हणून त्‍या नंतर काही वर्षे,कधी कधी कामारपुकुरात व कधी कधी जयरामवाटीस तिच्‍या माहेरी स्‍वत:जाऊन ते एक-दोन महिने तेथे राहून घालवू लागेल; दक्षिणेश्‍वरी,श्रीरामकृष्‍ण जेव्‍हा आपल्‍या स्‍त्रीसह एकत्र राहत असत,तेव्‍हाचा काळ आठवून माताजी (श्रीरामकृष्‍णांची पत्‍नी)आपल्‍या स्‍त्रीभक्‍तांना सांगत असत-त्‍या दिवसांत ते अशा काही दिव्‍य भावावस्‍थेत निरंतर निमग्‍न असत की ते सांगून समजावयाचे नाही.भाववस्‍थेच्‍या भरात त्‍यांनी कीती गोष्‍टी सांगाव्‍या,किती उपदेश द्यावा,केंव्‍हा हसावे,केंव्‍हा रडावे,केंव्‍हा समाधीत निमग्‍न होऊन जावे;अशा रीतीने सारी रात्र घालवावी;त्‍या भावावस्‍थेचा आवेश असा विलक्षण असे की तो पाहून माझ्या सर्वांगाला कापरे भरे व रात्र एकदाची केव्‍हा सरते व दिवस उजाडतो असे मला होऊन जावे;भावसमाधी म्‍हणजे काय वगैरे त्‍या वेळी मला काहीच समजत नसे.एक दिवस त्‍यांची समाधी किती वेळ तरी भंगेना असे पाहून मी भितीने रडू लागले व ह्र्दयाला हाक मारली;त्‍यांनी येऊन जगदंबेचे नांव त्‍यांच्‍या कानात किती वेळ तरी उच्‍चारले तेव्‍हा कुठे ब-याच वेळाने त्‍यांची समाधी उतरली;हे त्‍यांना समजल्‍यावर,मला पुन्‍हा असा त्रास होऊ नये म्‍हणून अमुक प्रकारचा भाव दिसला तर अमुक नाम कानात उच्‍चारावे,अमुक भाव दिसला तर अमुक बीज मंत्राचा कानात उच्‍चार करावा हे सर्व स्‍वत:त्‍यांनी मला शिकवून ठेवले.तेंव्‍हापासून मग तितके भय वाटत नसे व उपायांनी ते लवकर शुध्‍दीवरही येत.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (७) - (पृष्‍ठ क्र.१६९)

कोणी कोणी म्‍हणतात,श्रीरामकृष्‍णांना पाहिल्‍याबरोबरच हे कोणी महापुरुष आहेत असे वैष्‍णवचरणांनी आपल्‍या दिव्‍य दृष्‍टीने जाणले होते.परंतु जाणले असो व नसो,श्रीरामकृष्‍णांच्‍या अवस्थेसंबंधी ब्राह्ममणीने जे विवेचन केले होते ते त्‍यांना पूर्ण पटले व आपलेही मत तसेच असल्‍याचे त्‍यांनी भर सभेत सांगितले हे आम्ही श्रीरामकृष्‍णांच्‍या तोंडून ऐकले आहे.एवढेच नव्‍हे तर वैष्‍णवचरणांनी असेही सांगितले की,जे एकोणिस प्रकारचे निरनिराळे भाव अथवा ज्‍या अवस्‍था यांच्‍यामध्‍ये प्रकाशीत असल्‍याचे दिसून येते;एखाद्या महाभाग्‍यवानाला जर महाभावाचा थोडासा आभास प्राप्‍त झाला तर या एकोणिसापैकी फारफार तर दोनचार अवस्‍थाच त्‍याच ठिकाणी प्रकाशित होतात.या सर्व एकोणिस अवस्‍थांचाही उदाम वेग सहन करण्‍यास आजपर्यंत कोणाही मानवाचे शरीर समर्थ झाले नाही.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (८) - (पृष्‍ठ क्र.२०४)

बोलता बोलता श्रीरामकृष्‍णांचा तो त्‍यावेळचा शोक पुन्‍हा उसळला आणि आमच्‍या समोर गळा काढून ते एवढ्याने ओक्‍साबोक्‍शी रडू लागले की त्‍यांच्‍या या दिव्‍यप्रेमाचा लवलेशही आम्‍हाला समजला नाही तरी आमचे डोळे पाण्‍याने भरुन आले.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (९) - (पृष्‍ठ क्र.२५२)

दिवस संपला,रात्र आली;तीही जाऊन दुसरा दिवस उजाडला.असे लागोपाठ तीन दिवस गेले,तरी दार उघड्यासाठी श्रीकृष्‍णांची हाक ऐकू येईना;तेव्‍हा मात्र श्रीमद त्तोतापुरींना आश्‍चर्य वाटले आणि आपल्‍या अद्भुत शिष्‍याची अवस्‍था तरी काय आहे ती पाहावी,या उद्देशाने त्‍यांनी स्‍वत:च त्‍या कुटिराचे दार हलकेच उघडून आंत प्रवेश केला आणि पाहतात ते आपला शिष्‍य तीन दिवसांपूर्वी समाधी लागताना जसा बसला होता अगदी तसाच बसला असून देहामध्‍ये प्राणाचे बिलकुल चिन्‍ह नाही,मुखमंडल मात्र शांत व गंभीर असून त्‍यावर अपुर्व तेज झळकत आहे;बह्रीजगताच्‍या संबंधाने आपला शिष्‍य अजूनही अगदी मृतमय असून त्‍याचे चित्‍त मात्र निवांत,निष्‍कंप,प्रदीपवत्,ब्रम्‍हामध्‍ये लीन होऊन राहिले आहे.
हा प्रकार पाहून स्‍तंभित होऊन श्रीमद तोतापुरी स्‍वत:शी म्‍हणू लागले,ही गोष्‍ट खरोखरीच शक्‍य आहे कांय;जी गोष्‍ट साध्‍य करुन घेण्‍याला मला चाळीस वर्षे सतत परिश्रम करावे लागले,ती गोष्‍ट या महापुरुषाने तीनच दिवसांत साध्‍य करुन घेतली काय;असा संदेह उत्‍पन्‍न होऊन त्‍यांनी श्रीरामकृष्‍णांच्‍या अंगावरील सर्व लक्षणे ह्र्दयाची स्‍पंदन क्रिया चालू आहे की नाही,नाकातून थोडा तरी श्‍वासोच्‍छ्वास चालू आहे की नाही वगैरे पुन्‍हा नीट न्‍याहाळून पाहिली.परंतु हृदयाची क्रिया बंद होती,श्‍वासोच्‍छवासही बंद होता;मग त्‍यांनी श्रीरामकृष्‍णांच्‍या त्‍या काष्‍ठवत शरीराला डिवचून पाहिले,पण व्‍यर्थ.त्‍याचा काहीच परिणाम दिसून येईना;तेव्हा मात्र तोतापुरींच्‍या आश्‍चर्याला आणि आनंदाला सीमाच उरली नाही.ही काय विलक्षण गोष्‍ट आहे;ही तर खरोखरच समाधी;असे शब्‍द त्‍या आश्‍चर्याच्‍या आणि आनंदाच्‍या भरात त्‍यांच्‍या तोंडातून बाहेर पडले.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (१०) - (पृष्‍ठ क्र.२७९)

बांकेबिहार कृष्‍णाच्‍या दर्शनास गेले असता,श्रीरामकृष्‍णांना अद्भुत भावावेश उत्‍पन्‍न होऊन ते एकदम त्‍या मूर्तीला आलिंगन देण्‍यास धावून गेले;तसेच एक दिवस संध्‍याकाळी गुराख्‍यांची मुले रानातून गुरे घेऊन परत घरी येत असता,त्‍यांच्‍या मेळ्यात त्‍यांना गोपालकृष्‍णाचे दर्शन होऊन,ते प्रेमाने तन्‍मय होऊन गंभीर समाधिमग्‍न झाले;वृंदावनापेक्षा व्रज त्‍यांना अधिक आवडले व त्‍या ठिकाणी त्‍यांना श्रीकृष्‍णाचे व राधेचे अनेक रुपांत दर्शन झाले.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था –(११) - (पृष्‍ठ क्र.३१०)

भजनाच्‍या वेळचा त्‍यांचा आवावेश आणि मधुर नृत्‍य पाहून जमलेली सर्व मंडळी तल्‍लीन होऊन गेली.लवकरच श्रीरामकृष्‍णांच्‍या अद्भुत भजनाची कीर्ती त्‍या व जवळपासच्‍या गांवातून लोकांच्‍या झुंडीच्‍या झुंडी श्‍यामबाजार गांवात येऊ लागल्‍या व त्‍या गांवात रात्रंदिवस भजने सुरु झाली.हळूहळू लोकांत अशी बातमी पसरली की एकजण मोठा सुंदर मग काय विचारावे श्रीरामकृष्‍णांचे दर्शन घेण्‍यास लोकांची गर्दी इतकी लोटली की कांही विचारु नये.झाडावर चढून घरावर बसून,जिथे जागा सापडेल तिथे जाऊन लोक त्यांचे दर्शन घेऊ लागले.त्‍यांच्‍या चरणावर मस्‍तक ठेवण्‍यासाठी तर याहूनही अधिक गर्दी होऊ लागली लोक दर्शन घेण्‍यास व पाया पडण्‍यास जसे काही वेडे होऊन गेले होते.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (१२) - (पृष्‍ठ क्र.३१९)

अशा रीतीने पायावर डोके ठेवणा-या प्रत्‍येकाला असाच स्‍पर्श करुन आशिर्वाद देऊ लागले आणि त्‍या अद्भुत स्‍पर्शाने प्रत्‍येकाच्‍या अंत:करणात कांही अपूर्व भावान्‍तर उपस्थित होऊन,कोणी हसू लागला,तर कोणी रडू लागला,तर कोणी ध्‍यानामध्‍येच निमग्‍न झाला,तर कोणचे ह्र्दय आनंदाने पूर्ण होऊन त्‍या अहेतुक कृपासिंधू श्रीरामकृष्‍णांच्‍या कृपालाभाने धन्‍य होण्‍यासाठी बाकीच्‍या सगळ्यांना मोठमोठयाने हाका मारु लागला.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था –(१३) - (पृष्‍ठ क्र.३२६)

देहादी साधारण भाव सोडून,श्रीरामकृष्‍णांचे मन जेव्‍हा उच्‍च उच्‍चतर भावभूमीवर आरोहण करीत जाई,तेव्‍हा त्‍या त्‍या अवस्‍थेमध्‍ये प्राप्‍त होणारे सर्व असाधारण दर्शनसमूह त्‍यांना प्राप्‍त होत आणि देहबुध्‍दीचा सर्वस्‍वी त्‍याग करुन,जेव्‍हा त्‍यांचे मन अद्वेतभावात लीन होऊन जाई,तेव्‍हा तर त्‍यांच्‍या इंद्रियाचे सर्व व्‍यापार अजीबात बंद होऊन जात हृदयाचे स्‍पंदन बंद होई व काही कालपर्यंत त्‍यांचा पार्थिव देह मृतवत पडून जाई;त्‍यावेळी त्‍यांच्‍या बुबुळांना स्‍पर्श केला तरी पापण्‍या हालत नसत;त्‍या अत्‍यंत उच्‍चावथेत,त्‍यांना पृथ्‍वीवरील सर्व गोष्‍टींचा व सर्व विषयांचा पूर्ण विसर पडे;तो इतका की,या अवस्‍थेतून नेहमीच्या साधारण अवस्‍थेत मन आल्‍यानंतर सुध्‍दा काही काळपर्यंत त्‍यांना नित्‍य परिचयातील वस्‍तू व व्‍यक्ति यांची सुध्‍दा ओळख पटत नसे व आपण ही काहीतरी नवीन सृष्टी पाहत आहो,असा भास होऊन,आपण या वस्‍तू व व्‍यक्‍ती मागे केव्‍हातरी पाहिल्‍या होत्‍या की काय, अशी ते आठवण करु लागत.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था – (१४) - (पृष्‍ठ क्र.३३१)

विशेष पर्वकाळी श्रीरामकृष्‍णांच्‍या शरीर व मनामध्‍ये विशेष प्रकारचा देहभाव उत्‍पन्‍न होत असे.वैष्‍णवाच्‍या पर्व दिवशी वैष्‍णवभाव,शाक्‍तांच्‍या पर्व दिवशी शाक्‍तभाव त्‍यांच्‍या ठिकाणी विशेष प्रमाणात दिसून येई.जसे–दुर्गापूजेच्‍या अथवा कालीपूजेच्‍या दिवशी ते श्रीजगदंबेच्‍या भावात इतके तन्‍मय होत की,त्‍यांच्‍या शरीराची ठेवण सुध्‍दा श्रीजगदंबेच्‍या वराभयकर मूर्तीप्रमाणे होऊन जाई.जन्‍माष्‍टमीच्‍या व इतर वैष्‍णव पर्व दिवशी श्रीकृष्‍ण व राधा यांच्‍या भावात तन्‍मय होऊन त्‍यांच्‍या अंगावर कम्‍पपुलकादि अष्‍टसात्विक भावांची लक्षणे दिसून येत; आणि हे निरनिराळे भावावेश,इतक्‍या साहजिकपणे त्‍यांच्‍या ठिकाणी उत्‍पन्‍न होण्‍यास त्‍यांना काही एक श्रम पडत नसावेत असे वाटे.

श्री रामकृष्‍णाची अवस्‍था –(१५) - (पृष्‍ठ क्र.३३२)

भावावेशात शरीरज्ञानाचा पूर्णपणे लोप झाल्यामुळे त्‍यांचे हात,पाय,मान वगैरे भाग वाकडे तिकडे होऊन जात व कधी कधी तर सारे शरीरच हालू लागून ते आता पडतात की काय असे वाटे;म्‍हणून अशा वेळी जवळच असलेली भक्‍तमंडळी,त्‍यांचे वेडेवाकडे झालेले अवयव हळू हळू जसेच्‍या तसे करीत व ते पडू नयेत म्‍हणून त्‍यांना धरुन ठेवीत;आणि त्‍यांची समाधी उतरण्‍यासाठी ज्‍या देवतेच्‍या अगर भावाच्‍या चिंतनामुळे त्‍यांना समाधी लागलेली असे,त्‍या देवतेचे नांव काली काली,कृष्‍ण कृष्‍ण,ओंम ओंम त्‍यांच्‍या कानात एकसारखे काही वेळ उच्‍चारीत; असे केल्‍यावर मग त्‍यांची समाधी उतरे.

मथुरबाबुंची भावसमाधी –(१) (पृष्‍ठ क्र.१०५)

या संवादानंतर काही दिवसांनी मथुरबाबूंना एकाएकी भावसमाधी प्राप्त झाली श्रीरामकृष्ण सागंतात-मला बोलावणे पाठविले.जाउन पाहतो तो तो जसा आधीचा मनुष्यच नव्हे!डोळे लाल दिसत होते आणि डोळ्यातुन एकसारख्या अश्रुधारा वाहत होत्या.ईश्वराच्या गोष्टी बोलत तो रडत भिजून गेला होता.त्याचे वक्ष:स्थळ थरथर कापत होते.मला पाहताच पायांना घट्ट मिठी मारुन म्‍हणाला बाबा,मी चुकलो;आज तीन दिवस झाले,असा प्रकार चालला आहे.प्रयत्‍न केला तरी संसाराकडे मनच लागत नाही.सारा गोंधळ होऊन गेला आहे.तुमचा भाव तुम्‍हालाच लखलाभ होवो.मला तर तो सहन होत नाही;मी म्‍हणालो,का बरे,आता कां,तू म्‍हणाला होतास ना की मला भाव पाहिजे म्‍हणून;तेव्‍हा तो म्‍हणाला,मी म्‍हणालो होतो खरा,आणि आनंदातच आहे.पण त्‍या आनंदाला काय करायचे आहे?हा इकडे सारा नाश होऊ लागला आहे ना;बाबा हा भाव मला नको,तुम्‍ही आपला तो परत घेऊन जा.तेव्‍हा मला हसू आले आणि म्‍हणालो,तुला तर हे मी प्रथमच सांगत होतो.तो म्‍हणाला बाबा होय,ते सर्व खरे पण तेव्‍हा कुणाला माहित होते की,हा एखाद्या भुतासारखा मानगुटीवर बसेल म्हणून;मनात आले तरी कांही करता येत नाही, तेव्‍हा मग त्‍याच्‍या छातीवरुन काही वेळ हात फिरवल्‍यावर त्‍याचा भाव शांत झाला.

मथुरबाबुंची अवस्‍था –(२) पृष्‍ठ क्र.२९८

एकदा मथुरबाबूंना एक मोठे गळू झाले व त्‍याने ते अगदी अंथरुणाला खिळून पडले.पांच सहा दिवसात श्रीरामकृष्‍णांचे दर्शनही न झाल्‍यामुळे त्‍यांनी ह्र्दयाबरोबर त्‍यांना बोलावणे पाठविले.श्रीरामकृष्‍ण म्‍हणाले–मी तेथे जाऊन कांय करु?मी कोणी वैद्य आहे की काय,म्‍हणून मला त्‍याचे गळू बरे करता येईल!श्रीरामकृष्‍ण येत नाहीत असे पाहून,मथुरबाबांनी त्‍यांचेकडे बोलावण्‍यावर बोलवणी पाठवली.त्‍यांचा फारच आग्रह पाहून श्रीरामकृष्‍णांना अर्थातच गेल्‍यावाचून राहवेना.ते ह्र्दयला घेऊन त्‍यांच्‍याकडे गेले.श्रीरामकृष्‍ण आलेले पाहून मथुरबाबुंचा आनंद गगनात मावेना.त्‍या आनंदाच्‍या भरात ते एकदम ताडकन उठून बसले व म्‍हणाले,बाबा मला तुमच्‍या पायांची धूळ घेऊ द्या श्रीराकृष्‍ण हसत हसत म्‍हणाले,आरे वेड्या माझ्या पायाची धूळ घेऊन रे तुला काय उपयोग;तिने तुझे गळू बरे होईल का रे?हे ऐकून मथुरबाबू म्‍हणाले –बाबा,इतका मी वेडा आहे कां,का हे गळू बरे करण्‍यासाठी तुमच्‍या पायाची धूळ मागीन!त्‍यासाठी तर हे डॉक्‍टर लोक आहेत.मी हा भवसागर तरुन जाण्‍यासाठी तुमच्‍या पायाची धूळ मागत आहे.मथुरबाबूंचे हे अलौकिक भक्ति विश्‍वासाचे शब्‍द ऐकून श्रीरामकृष्‍णांना गहिवर येऊन ते एकदम समाधिमग्‍न झाले आणि मथूरबाबू त्‍यांचे चरण आपल्‍या मस्‍तकी धारण करुन आनंदातिशयाने अश्रू गाळू लागले;मथुरबाबूंचे गळू थोड्या दिवसात बरे झाले.

शुध्‍द सत्‍वाची अवस्‍था - (पान क्र.१२०)

श्रीरामकृष्‍ण म्‍हणत असत,ईश्‍वरप्रेमाच्‍या प्रचंड लाटा जेव्‍हा कांही आगापिछा नसता मनुष्‍याच्‍या मनामध्‍ये उसळू लागतात,तेव्‍हा हजार प्रयत्‍न करुन सुध्‍दा त्त्यांने मागे हटवता येते नाही.एवढेच नव्‍हे तर अनेक प्रसंगी त्‍यांचा प्रबल वेग धारण करण्‍यास अगदी असमर्थ होऊन ह्या स्‍थूल,जड देहाचा चेंदामेंदा होऊ जातो.अशा रीतीने कित्‍येक साधक मृत्‍युमुखी पडले आहेत;पूर्णज्ञान अथवा पूर्णभक्ति यांचे उदृाम वेग सर्वकाळ धारण करुनही टिकू शकली,म्‍हणूनच भक्‍तीशास्‍त्रांत अवतारी पुरुषांना शुध्‍दसत्‍व विग्रहवान असे वरचेवर म्‍हटलेले आढळते. भक्तिशास्‍त्र म्‍हणते की, रज व तम या गुणांचा ज्‍यात लवलेशही नाही अशा अशा शुध्‍द सत्‍वगुणांच्‍या उपादानाने घडलेली शरीरे घेऊन ते इहलोकी आगमन करतात,म्‍हणूनच सर्व प्रकारचे आध्‍यात्मिक भाव ते सहन करु शकतात अशा प्रकारचे शरीर धारण करुन सुध्‍दा,ईश्‍वरीय भावाच्‍या प्रबल वेगाने अनेक समयी त्‍यांना विशेषत:भक्तिमार्गाने जाणा-या पुरुषांना–अत्‍यंत कष्‍ट झालेले दिसून येतात.भावाच्‍या प्रबल वेगामुळे येशुख्रिस्‍त व श्रीचौतन्‍य प्रभू यांच्‍या शरीराचे सांधे शिथिल झाले होते.व त्‍यांच्‍या शरीराच्‍या प्रत्‍येक केसाच्‍या मूळातून घामाप्रमाणे थेंब थेंब रक्‍त बाहेर येत असे.यावरुन ही गोष्‍ट स्‍पष्‍ट समजते.अशा प्रकारचे शारीरिक विकार त्‍यांना अत्‍यंत कष्‍टदायक झाले असले तरी त्‍यांच्‍याच सहायाने त्‍यांच्‍या शरीरांना पूर्वोक्‍त असाधारण मानसिक वेग धारण करण्‍याचा सराव होत गेला.पुढे हे वेगधारण त्‍यांच्‍या शरीरात जेव्‍हा स्‍वाभाविक व सहज होऊन बसले तेव्‍हा ह्या सर्व विकृती त्‍यांच्‍या शरीरात पूर्वीप्रमाणे सर्वकाळ दिसून येत नसत.

परमार्थाची व्‍याकुळता – (पृ्ष्‍ठ क्र.१२८)

श्रीरामकृष्‍णांचे त्या वेळेचे चरित्र पाहिले असता,ती व्‍याकुळता किती असावयास पाहिजे ही गोष्‍ट स्‍पष्‍टपणे दिसून येते.त्‍यावेळी ईश्‍वराच्‍या दर्शनाच्‍या विलक्षण तळमळीने त्‍यांचे आहार,निद्रा,लज्‍जा,भय वगैरे शारीरिक व मानसिक दृढबध्‍द संस्‍कार कोठच्‍या कोठे नाहीसे होऊन त्‍यांचा मागमूसही राहिला नाही.शरीराच्‍या स्‍वास्‍थ्‍याची गोष्‍ट राहो,पण स्‍वत:च्‍या जिवाच्‍या रक्षणाकडेही त्‍यांचे मुळी सुध्‍दा लक्ष नसे.श्रीरामकृष्‍ण सांगत असत–त्‍यावेळी शरीरसंस्‍कारांकडे मुळीच लक्ष नसल्‍यामुळे डोक्‍याचे केस खूप वाढून त्‍यांस धूळ माती वगैरे लागून त्‍यांच्‍या आपोआप जटा बनल्‍या होत्‍या.ध्‍यान करावयास बसला असता मनाच्‍या एकाग्रतेमुळे शरीर असे एखाद्या ठोकळया सारखे स्‍थीर होऊन जाई की,पक्षी सुध्‍दा निर्भयपणे डोक्‍यावर येऊन बसत,व चोचीने केस विसकटून डोक्‍यातील धुळीत काही खाण्‍यासारखे सापडते की काही ते पाहत; ईश्‍वराच्‍या विरहाने अधीर होऊन मी कधी कधी मातीत इतके तोंड घासावे की खरचटून जाऊन ते रक्‍तबंबाळ होउन जावे.अशारीतीने ध्‍यान,भजन,प्रार्थना,आत्‍मनिवेदन यांत दिवस केव्‍हा उगवला व केव्‍हा मावळला याचे भानच राहत नसे;परंतु संध्‍याकाळी द्वादशशिव मंदीरे,गोविंदजीचे मंदिर व श्री जगदंबेचे मंदिर या सर्व मंदिरात आरत्‍या सुरु होऊन जेव्‍हा शंख,घंटा,झांजा यांचा एकत्र आवाज होईल तेव्‍हा मात्र माझ्या वेदनांना पारावार उरत नसे.असे वाटते की,-हाय हाय आणखी एक दिवस फुकट गेला आणि जगदंबेचे आजही दर्शन झाले नाही या विचाराने प्राण असा व्‍याकुळ होई की मुळीच स्‍वस्‍थ राहवत नसे.त्‍या व्‍याकळतेच्‍या भरात मी आपले अंग जमिनीवर टाकून द्यावे आणि मेाठ मोठ्याने ओक्‍साबोक्‍शी रडत–आई आज सुध्‍दा दर्शन दिले नाहीस ना असे म्‍हणून एवढा आक्रोश करावा की चहुकडून लोकांनी धावून यावे व माझी ही अवस्‍था पाहून म्‍हणावे,अरेरे बिच्‍या–याला पोटशुळाने काय वेदना होत आहेत!आम्‍ही श्रीरामकृष्‍णांच्‍या चरणांच्‍या आश्रयांस राहू लागल्‍यावर ईश्‍वराच्‍या दर्शनासाठी मनात किती तीव्र व्‍याकुळता असावयास पाहिजे या संबंधाने आम्‍हांस उपदेश करीत असता कधी कधी ते स्‍वत:च्‍या साधनाकालच्‍या उपरोक्‍त गोष्‍टी सांगत व म्‍हणत स्‍त्री पुत्र वगैरेच्‍या मृत्‍युबद्दल अथवा पैशाबद्दल लोक डोळ्यातून घागर घागर पाणी काढतील पण ईश्‍वराचे आपल्‍याला दर्शन झाले नाही,म्‍हणून एक चुळकाभर तरी पाणी कोणाच्‍या डोळयांतून निघते का आणि उलट म्‍हणतात काय करावे बुवा इतक्‍या एक निष्‍ठपणे ईश्‍वराची सेवा केली,तरी त्‍याने दर्शनही दिले नाही!ईश्‍वराच्‍या दर्शनासाठी अशा व्‍याकुळतेने एकवार तरी डोळयांतून पाणी निघू द्या मग पाहू बरे तो कसे दर्शन देत नाही ते?ते त्‍यांचे शब्‍द आमच्‍या ह्र्दयास भेदून जात व आम्‍हांस वाटे की स्‍वत:च्‍या साधनकाळी त्‍यांनी या गोष्‍टीचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला आहे.म्‍हणूनच ते इतक्‍या नि:शंकपणे ठासून बोलू शकतात.

विवेकानंदांची अवस्‍था - (पृष्‍ठ क्र.१८७)

साधनकाळी श्रीरामकृष्‍णांच्‍या मनातील उत्‍साह व तळमळ ही कीती तिव्र होती याची थोडीसी कल्‍पना काशीपुरातील बगीच्‍यात राहत असताना आम्‍हांला त्‍यांनी दिली.स्‍वामी विवेकानंद यांना त्‍यावेळी ईश्‍वरदर्शनाची एवढी तळमळ लागलेली होती हे तर आम्‍ही प्रत्‍यक्ष आपल्‍या डोळ्यांनी पाहत होतो.वकिलीच्‍या परिक्षेला बसण्‍यासाठी फी जमा करीत असताना त्‍यांना एकाएकी कसे तीव्र वैराग्‍य प्राप्‍त झाले व त्‍या भरात फक्‍त एक धोतर नेसून अनवाणी एखाद्या उन्‍मत्‍तासारखे शहरापासून तो काशीपुरापर्यंत धावत जाऊन त्‍यांनी श्रीरामकृष्‍णांचे चरण धरुन आपल्‍या मनाची व्‍याकुळता त्‍यांना कशी सांगितली;त्‍या दिवसापासून आहर,निद्रा,याकडेही पूर्ण दुर्लक्ष करुन ते रात्रं दिवस कसे जप,ध्‍यान,भजन यातच निमग्‍न होऊन राहू लागले! साधनांच्‍या उत्‍साहाने त्‍यांचे कोमल-हदय वज्रासारखे कठोर होऊन ते आपल्‍या घराच्‍या स्थिती विषयी कसे पुरे उदासीन बनले आणि श्रीरामकृष्‍णांनी सांगितलेल्‍या साधनामार्गाचे अत्‍यंत श्रध्‍देने अवलंबन करुन केवळ तीन चार महिन्‍यांच्‍या अवधीत त्‍यांनी निर्विकल्‍प समाधिसुखाचा कसा अनुभव घेतला.

विवेकानंदाची अवस्था – (पान क्र.४३६)

दक्षिणेश्वराला जाण्यास त्या दिवशी मी पायीच निघालो.मागे फक्त एकदा तेथे गेलो होतो व तोही गाडीतून.म्हणून दक्षिणेश्वर ईतके दूर असेल अशी माझी मुळीच कल्पना नव्हती.किती चालून गेलो तरी वाटच संपेना.शेवटी तेथे एकदाचा जाऊन पोहोचलो व तडक श्री रामकृष्णांच्या खोलीत गेलो.ते आपल्या पलंगडीवर एकटेच विचारमग्न होऊन बसलेले होते.जवळपास कोणीही नव्हते.मला पाहताच मोठ्या आनंदाने त्यांनी मला जवळ बोलावले.थोड्याच वेळात मला दिसून आले की,त्यांना भावावेश प्राप्त झाला असून,तोंडाने अस्पष्ट स्वराने काही पुटपुटत,माझ्याकडे टक लावून पाहत,हळूहळू माझ्याच बाजुला सरकत येत आहेत!त्याबरोबर मला वाटते की आता पुन्हा त्या दिवशीसारखा प्रकार होनार!हे मनात येत न येते ईतक्यात मजजवळ येऊन,त्यांनी आपला उजवा पाय माझ्या अंगावर ठेवला! त्याबरोबर काय चमत्कार सांगावा?असे दिसून लागले की,ती खोली आणि तिच्यातील सर्व वस्तू व त्याबरोबर माझा अहंकारही एका स्वर्गग्रासी महाशून्यामध्ये विलीन होण्यासाठी मोठ्या झपाट्याने चालत आहे!हा प्रकार पाहून माझी पाचावर धारण बसली;असे वाटले की,मीपणाचा नाश म्‍हणजेच तर मरण,मग मरणाला आता काय बाकी राहिले आहे?त्‍यासरशी धीर सुटून मी एकदम ओरडलो,अहो!तुम्‍ही मला काय करीत आहा?मला आईबाप आहेत असजून!हे ऐकून ते खदाखदा हसू लागले व हातांनी माझे वक्षस्‍थळ चोळीत चोळीत म्‍हणू लागले,तर मग आता राहू दे.एकदम व्‍हायला नको,हळू हळू होईल!आणि आश्‍चर्याची गोष्‍ट ही की,या त्‍यांच्‍या स्‍पर्शाने तो सारा अद्भूत देखावा नाहीसा झाला व मी पहिल्‍यासारखा देहभानावर आलो.
पुन्‍हा मनामध्‍ये खळखळ उडाली! हा मनुष्‍य आहे तरी कोण?आणि याने हा केलेला प्रयोग हिप्‍नॉटिझमचा आहे असे म्‍हणायचे की काय?पण ही गोष्‍टही मनाला पटेना.ज्‍याचे मन दुर्बल आहे अशा माणसावरच तो चालतो असे मी वाचले होते आणि मला तर अभिमान असे की,आपली इच्‍छाशक्‍ती फार प्रबल आहे,मग याला काय म्‍हणावे?व एखादाच्‍या मनाला नुसत्‍या इच्‍छेने चिखलाच्‍या गोळ्यासारखा वाटेल तसा आकार
देणा-या या माणसाला अर्धोन्‍माद तरी कसे म्‍हणावे? बरे,न म्‍हणावे तर पहिल्‍या दिवशीचे यांचे आचरण अर्धोन्‍मादासारखे नव्‍हते तर कशासारखे होते असे कितीतरी विचार येऊन त्‍यांनी मनात काहूर माजविले.

विवेकानंदाची अवस्था – (पान क्र.४६९)

ब-याच वेळाने नरेंद्र देहभानावर आला.त्‍याचे अंत:करण भरुन आले होते.नेत्रांतून अश्रुधारा वाहत होत्‍या व त्‍याच्‍या ह्र्दयात दिव्‍य आनंद आणि शांती यांचा प्रचंड प्रवाह वाहू लागला होता! देहाभानावर येताच प्रथम त्‍याने श्रीरामकृष्‍णांना उद्देशून नमस्‍कार केला आणि लागलीच उठून जिन्‍याकडे धाव घेतली.

** ख-याखोटयाचा निवाडा **

देवळात जाताना त्‍यांना भावावेश झाला.ते देवाचे दर्शन घेत असताच,तेथे एक भजीनी दिंडी आली.तेथील प्रघात असा होता की,प्रत्‍येक दिंडीने प्रथम देवासमोर काही वेळ भजन करावे व मग तेथून जाऊन गंगातीरावर वाळवंटात भजन करीत बसावे.ती दिंडी तेथे असताच एक भले धष्‍टपुष्‍ट जटाधारी,मुद्रा लावलेले,गौरवर्ण;बोवाजीही डुलत डुलत,माळ जपत तेथे आले.भजनी मंडळीला उत्‍तेजन देण्‍यासाठीच की कांय,ते एकदम दिंडीत मिसळले आणि भावाविष्‍ट झाल्‍यासारखे,हातवारे करीत हुंकार देत नाचू लागले!
देवाचे दर्शन घेऊन सभामंडपात एका बाजूला उभे राहून श्रीरामकृष्‍ण भजन ऐकत होते.बोवाजींचा तो वेश आणि थाट-माट पाहून थोडे स्मित करुन ते जवळ असलेल्‍या नरेंद्र वगैरेकडे वळून म्‍हणाले,पहा ढंग तर पाहा! त्‍यांच्‍या तोंडाचे हे शब्‍द ऐकून मंडळी हसू लागली व आज श्रीरामकृष्‍ण भावाविष्‍ट न होता चांगल्‍या सावधगिरीने वागत आहेत.असे पाहून त्‍यांना फार आनंद झाला.पण इकडे मंडळी बुवाजीकडे पाहण्‍यात दंग झाली असता श्रीरामकृष्‍ण केंव्‍हाच तेथून निसटून उडी मारुन त्‍या भजनी मेळ्याच्‍या मध्‍ये जाऊन उभे राहिले होते आणि भावविष्‍ट होऊन त्यांचे देहभानही नाहीसे झाले होते!हा आकि‍स्‍मक प्रकार पाहून मंडळी गडबडून गेली.त्‍यांच्‍या तोंडचे पाणी पळाले व सर्वांनी एकदम धाव घेऊन मंडळीत शिरुन श्रीरामकृष्‍णांना घेरले.काही वेळात थोडे देहभानावर येताच श्रीरामकृष्‍ण सिंहबळाने नृत्‍य करु लागले!नृत्‍य करीत असता मधेच त्‍यांची समाधी लागावी व त्‍यांनी ती उतरेपर्यंत तसेच निश्‍चेष्‍ट उभे राहावे.त्‍या स्थितीत झोक जाऊन त्‍यांनी पडू नये म्‍हणून कोणी तरी भक्‍तांनी त्‍यांना नीट धरुन ठेवावे.समाधी उतरताच पुन्‍हा नृत्‍य सुरु व्‍हावे,असा प्रकार एकसारखां सुरु झाला !! नृत्‍य करताना,तालावर,भरभर पुढे मागे सरकत असता,असे वाटे की जणूकाय एखाद्या माशाप्रमाणे ते ब्रम्‍हानंद-समुद्रात उड्या मारीत,स्‍वच्‍छंद पोहत,मनसोक्‍त विहार करीत आहोत! आणखी एक दिवस सर्व मंडळींना बाहेर जाण्‍यास सांगून श्रीरामकृष्‍णांनी नरेंद्रला आपल्‍या खोलीत हाक मारुन त्‍याला ध्‍यानस्‍थ बसण्‍यास सांगितले. नरेंद्र बसला आणि लवकरच त्‍यांचे बाह्य जगताचे ज्ञान नाहीसे झाले.काही वेळाने ध्‍यान विसर्जन करुन पाहतो तो श्रीरामकृष्‍णही जवळ बसले असून,त्‍यांच्‍या नेत्रांतून अश्रु वाहत आहेत!!श्रीरामकृष्‍ण त्‍याचेकडे पाहून म्‍हणाले,-नरेंद्र मजजवळ होते नव्‍हते तेवढे सर्व तुला देऊन,आता मात्र मी खराखरा फकीर बनलो!धर्मप्रचाराच्‍या कामी तुला या शक्‍तीचा उपयोग होईल!!श्रीरामकृष्‍णांनी आपल्‍या सर्व सिध्‍दींचे दान केल्‍याचे पाहून नरेंद्राचे डोळे पाण्‍याने भरुन आले.

स्‍वामी विवेकानंदांची प्रेमावस्‍था -

स्‍वामी विवेकानंद अर्थात नरेंद्र यांचेवर त्‍यांचे सद्गुरु श्रीरामकृष्‍ण परमहंस यांनी कृपा केली असता जी स्थिती झाली त्‍याचे वर्णन स्‍वामी विवेकानंद स्‍वत: मांडतात –

But it the twinkling of eye he placed his right food on my body.The touch, at once gave rise to a novel experience within me.With my eyes wide open,I,saw the walls and everything in the room,whirled rapidly and vanished nto naught and the whole Universe together with my individuality was about to merge in an all encompassing mysterious void! I was terribly frightened and thought that I was facing Death, for the loss of individuality meant nothing short of that.Unable to control myself,I cried out,what is this that you are doing to me?I have my parents at home! He laughed aloud at this and stroking my chest said.
“All right let it rest now. Everything will come in time!The wonder of it was that no sooner he had said this than that strange experience of mine vanished.I was myself again & found everything within & without the room as it had been before.”