ऐकाजी तुम्ही भक्ता भागवत । कराल ते हित सत्य करा ॥ भक्ती शिकवणारे भक्ती शास्त्रं म्हणजे श्रीमदभागवत
होय. भक्तीच्या सर्व तात्वीक अंगाचा विचार यामध्ये आढळून येतो. भक्त‍ व देव यांच्यातील परस्पर प्रेमाचे आनंदमय दर्शन व अंत:करणात भक्तीचा प्रवेश भागवतात घडून येतो.

अध्‍याय ६ - श्‍लोक ७३ व ७४ नारदमुनींची अवस्‍था :

नारदश्‍च कृतार्थोडभूत्सिध्दे स्‍वीये मनोरथे । पुलकी कृत सर्वांग: परमानन्‍दसम्‍भृत: ॥७३॥
एवं कथा समाकर्ण्‍य नारदो भगवत्प्रिय: । प्रेमगदया वाचा तानुवाच कृताज्‍जलि : ॥७४ ॥
आपले मनोरथ पुर्ण झाल्‍याचे पाहून नारद क्रुतकृत्‍य झाले.त्‍याच्‍या सर्व शरीराव रोमांच दाटून आले आणि त्‍यांना परमानंद झाला. भगवंताचे प्रिय नारदमुनी याप्रकारे कथा ऐकून,हात जोडून,प्रेमाने सदगदित होऊन सनकादिकांना म्‍हणाले.

स्‍कंद पहिला
अध्‍याय ६ वा श्‍लोक १७ व १८ - नारदमुनींची अवस्‍था.

ध्‍यायतश्‍चरणाम्‍भोजं भावनिर्जितचेतसा । औत्‍कण्‍ठयाश्रुकलाक्षस्‍य -ह्द्यासीन्‍मेशनैर्हरि: ॥१७॥
प्रेमातिभरनि भ्रिन्‍नपुलकाग्‍डोsतिलिर्वृत: । आनंदसम्‍प्‍लवे लीनो नापश्‍यमुभयं मुने ॥१८॥

भक्तिभावपूर्वक भगवंताच्‍या चरण कमलांचे ध्‍यान करु लागताच भगवत्‍प्राप्‍तीच्‍या उत्‍कट इच्‍छेने माझ्या डोळयातून अश्रूधारा वाहू लागल्‍या आणि ह्रुदयात हळू हळु भगवंत प्रगट झाले. व्‍यासमुनी- प्रेमभावाचा अत्‍यंत उद्रेक झाल्‍याने माझे सर्वांग पुलंकित झाले. ह्रुदय अत्‍यंत शांत झाले. त्‍या आनंदाच्‍या पुरात मी असा बुडून गेलो की,मला माझे आणि ध्‍येवस्‍तूचेही भान राहिले नाही.

अध्‍याय ११ वा श्‍लोक ३२ -- भगवान श्रीकृष्‍णांच्‍या पटटराण्‍याची अवस्‍था

तपात्ममजैर्दुष्ट भिरन्ताचरात्मळना,दुरन्तहभावा: वरिरेभिरेपतिम ।निरुध्दयमप्या स्त्रशवदम्बुण नेत्रयो विरलज्यी्नां भृगुवर्य वैक्लूवात ॥ ३२॥

भगवंता विषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते. त्यांनी प्रथम मनोमन, नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसे त्या‍ला अलिंगन दिले. शौनक महोदय; त्या वेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या, संकोचास्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण प्रेमभावातिरेकाने अश्रू ओघळलेच.

स्कंद दुसरा
अध्याय ३ वा श्लोक २४ - श्रवणभक्तीने भक्ताची अवस्था

तदश्मसारं ह्र्दयं बतेद, यद गुहयमाणैर्हरिनामधेयै: । नविक्रियेताथ यदा विकोरो, नेत्रेजलं गात्रजलं गात्ररुहेषु हर्षु: ॥२४॥
सूत महोदय - भंगवंताच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे -हदय विरघळून जात नाही ते हदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी -हदय विरघळते,त्यावेळी डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात आणि शरिरावर रोमांच उत्पन्न होतात.

अध्याय ९ वा श्लोक १७-- ब्रह्मदेवाची अवस्था

तदृर्शंनाल्हा दपरिप्लुयतान्तरो,हृष्य त्तनु: प्रेमभराश्रुलोचन : । ननाम पदाम्बुतजमस्य विश्वसृग,यत पारमहंसेन पथादिगम्यते ॥१७॥त्याचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे ह्र्दय आनंदाच्या उद्रेकाने भरुन शरीर पुलि‍कंत झाले,प्रेमभराने डोळ्यातून अश्र वाहू लागले.परमहंसाच्या निवृत्ती मार्गांने जे प्राप्त होतात,त्या चरणांना ब्रहृमदेवाने नमस्कार केला.

स्कंद तिसरा
अध्याय २ रा श्लोक १- उध्दवाची अवस्था

श्रीशुक उवाच - इति भागवत: पृष्ट् : क्षत्त्रा वार्तां प्रियाश्रयाम । प्रतिवक्तुं न चोत्सेह औत्कण्ठयात्मा रितेश्वर: ॥१॥
श्री शुकदेव म्हणाले जेव्हा विदुराने परम भक्त उध्दृवाला अशा प्रकारे त्याच्याच प्रियतम श्रीकृष्ण संबंधी विचारले, तेव्हा आपल्या स्वामीची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे ह्रदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही.

अध्याय ४ था श्लोक १४- उध्दवाची अवस्था
इत्‍यादभोक्‍त:परमस्‍य पुंज प्रतिक्षणानुग्रभाजनो हम । स्‍नेहोत्‍थरोमासलिताक्षरस्‍तं, मुच्‍चुछुच: प्राग्‍जालिराखभाषे ॥१४॥

विदुरा,माझ्यावर प्रत्‍येक क्षणी त्‍या परमपुरुषाच्‍या कृपेचा वर्षाव होत होता. जेव्‍हा ते असे आदरपूर्वक म्‍हणाले,तेव्‍हा स्‍नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले,वाणी सद्गित झाली आणि डोळयांतून अश्रुधारा वाहू लागल्‍या.

अध्याय ४ रा श्लोक ३ ३ ते ३५ - विदुराची अवस्था

कुरुक्षेत्र परीक्षिता, परमात्‍मा श्रीकृष्‍णांनी लीलेनेच आपला श्रीविग्रह प्रगट केला होता व लीलेनेच तो अदृश्‍य केला. त्यांचे हे अंतर्धान पावणेसुध्‍दा धैर्यवान पुरुषांचा उत्‍साह वाढि‍वणारे आणि दुस-या पशुतुल्‍य अशा अधीर पुरुषांना अत्‍यंत असहय होते.परम भागवत उध्‍दवाच्‍या तोंडून भगवंताची प्रशंसनीय कर्मे आणि अशा प्रकारे त्यांचे अंतर्धान होणे ऐकून तसेच भगवंताने परमधामाला जाताना आपली आठवण काढली, हे विदुराने ऐकल्‍यानंतर तो प्रेम विव्‍हल होऊन अश्रू ढाळू लागला.

स्कंद तिसरा
अध्याय ४ था श्लोक ३७ ते ४० - प्रल्‍हादाची अवस्था

शुक्राचार्य म्‍हणतात, भक्‍त प्रल्‍हाद हा बालक असताही भगवंताचे ठिकाणीच चित्‍त आसक्‍त झाल्‍यामुळे त्‍याने अनेक प्रकारची खेळणीही टाकूनच दिली होती. जसे काही श्रीकृष्‍णरुपी ग्रहाने (पिशाचाने) त्‍याचे चित्‍त ग्रासले हाते, जगाला तो या रुपाने पाहतच नव्‍हता बसता,उठता,फिरता,खाता,झोपता,पिताना,बोलताना,त्‍या प्रल्‍हादाला त्‍या कार्याचे भानच राहत नव्‍हते.भगवंताचा वियोग झाला असे समजून रडत असे, कधी प्रभूच्‍या मीलनाचा आनंद वाटून हसत असे. कधी कधी भगवतदृयश तसेच लीलांचे गायन करीत असे,कधी मोठमोठयाने हाक मारीत असे,कधी लाज या सोडून नाचत असे,कधी कधी तर तन्‍मय होऊन स्‍वत:स श्रीकृष्‍ण मानून त्‍या शामसुंदराच्‍या लीलांचे अनुकरण करीत असे.
संतवाग:मयात विराण्‍या (विरहिणी) सौरी (स्‍वैरिणी) इत्‍यादी रुपकाचे जे अभंग आहेत ते मत्‍त या स्थितीतीलच आहेत.भगवत्‍प्रेमात रंगलेले ह्रदय असेल तेथे कोणाचीही भीड-पर्वा नसते.श्रीज्ञानेश्‍वर महाराज म्‍हणतात-

न गमे हा संसारु म्‍हणुनि केला भ्रतारु । लोक अनाचरु म्‍हणती मज ॥ चंचळ झालिये म्‍हणतील मज । कवणा सांगू जिवीचे गुण ॥

अध्याय ७ वा श्लोक १२ - गोपीकांची अवस्था

ता ना विदन्‍मययनुषडगा बध्‍द धिय:स्‍वातात्‍मानमतस्‍तथेदम ॥ यथ समाधौ मुनयोsब्धितोये नद्य: प्रि‍वष्‍टा इव नामरुपे ॥
समाधी अवस्‍थेमध्‍ये ज्‍याप्रमाणे योग्‍यांना कशाचेही भान नसते,तो निश्‍चल असतो, महासागरात प्रविष्‍ट झालेल्‍या नदयांना निराळे अस्तित्वच राहत नाही,त्‍याप्रमाणे श्रीकृष्‍ण प्रमेतिशयाने ज्‍यांची अंत:करणे माझ्या ठिकाणी एकरुप झाली आहेत अशा गोपी आपला देह,आपला जीव व हे जगत माझ्या‍शिवाय सर्व काही संपूर्ण विसरल्‍या होत्‍या.या श्‍लोकावरील श्रीएकनाथ महाराजांची टिका पहा -

ऐशी अनन्‍य ठायीच्‍या ठीयी । गोपिकांसी माझी प्रीती पाटी । त्‍या वर्तताही देहगेही । माझ्या ठायी विनटल्‍या