श्रीमद् गुरुचरित्र या ग्रंथाचे लेखकांनी नमुद केल्‍याप्रमाणे ज्‍या ज्या भक्‍तांनी श्रीगुरुंना शरण जाऊन भग्‍वद्भक्‍तीला सुरवात केली त्‍यांच्‍या जीवनामध्‍ये भगवद्भावाचे आलेले अनुभव या ग्रंथात सविस्‍तर,उत्‍कृष्‍ट व स्‍पष्‍टपणे मांडण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.याचा साधकाने आत्‍मीयतने अभ्‍यास केल्‍यास अष्टसात्‍वीक भावा प्रमाणे अनुभुती आली तरच ही भक्‍ती शास्‍त्राप्रमाणे होय,अन्‍यथा साधकांने यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.
श्रीमद् गुरुचरित्र या भक्‍तीशास्‍त्र ग्रंथात दिलेल्‍या दाखल्‍यांप्रमाणे अष्टसात्‍वीक भावाबाबतची अनुभूती ज्‍या ज्‍या भक्‍तांना आली त्‍याचे विवरण खालीप्रमाणे आहे-

अध्‍याय पहिला - ओवी नं.४५ ते ४८ (कवी गंगाधर सरस्‍वती यांची अवस्‍था)

येताचि गुरुमुनि । बंदी नामकरणी । मस्‍तक ठेवोनि । चरणयुग्‍मी ॥४५॥
केश तो मोकळी । झाडी चरणधुळी । आनंदाश्रुजळी । अंध्रि क्षाळी ॥४६ ॥
ह्र्दयमंदिरात । बैसवोनि व्‍यक्‍त । पूजा उपचारित । षोडशविधी ॥४७॥
आनंदभरित । झाला नामांकित । ह्र्दयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८ ॥

अध्‍याय १६ वा - ओवी नं.१५३ ते १५७ (गुरुभक्‍त ब्राम्‍हणाची अवस्‍था)

तये वेळी श्रीगुरुसी । नमन केलें चरणांसी । जगद्गुरु तूचि होसी । त्रैमूर्तीअवतार ॥१५३॥ तव कृपा होय जरी । पापे कैची शरीरी । उदय होतां तमारी । अंधकार केवी राहे ॥१५४ ॥ ऐशियापरी श्रीगुरुसी । स्‍तुति करी भक्‍तीसी । रोमांच उठले अंगासी । सद्गदित कंठ झाला ॥१५५॥ निर्मळ मनेसी तये वेळी । माथा ठेवी चरणकमळी । विनवीतसे करुणा बहाळी । तारी तारी श्रीगुरुराया ॥१५६॥ निर्माण देखोनि अंत:करणी मस्‍तक ठेवी दक्षिण पाणी । ज्ञान झाले तत्‍क्षणी । तया ब्राम्‍हणासी परियेसा ॥१५७॥

अध्‍याय २५ वा - ओवी नं.५५ ते ५९ (त्रिविक्रम मुनींची अवस्‍था)

नमन करुनि श्रीगुरुसी । विनवी मुनि भक्तिसी । कृपामूर्ती व्‍योमकेशी । भक्‍तवत्‍सला परमपुरुष ॥५५॥ जय जयाजी जगद्गुरु । निर्गुण तूचि निर्विकारु । त्रयमूर्तीचा अवतारु । अनाथांचा रक्षक ॥५६।१ दर्शन होता तुझे चरण । उध्‍दरे संसारा भवार्ण । नेणती मूढ अज्ञानजन । अधोगतीचे ते इष्‍ट ॥५७॥ सद्गदित कंठ झाला । रोमांच अंगी उठला । नेत्री बाष्‍प आनंद झाला । माथा ठेवी चरणावरी ॥ ५८॥ नमन करिताचि मुनीश्वरातें । उठविले श्रीगुरुनाथे । आलिंगोनि करुणा वक्‍त्रे । पुसताती वृत्‍तांत ॥५९॥

अध्‍याय ४१ वा - ओवी नं.३१ ते ३३ (सायंदेवाची अवस्‍था)

ऐसी नानापरी स्‍तुती करीत । पुन:पुन: नमन करीत । सद्गदित कंठ होत । रोमांच अंगी उठले ॥३१ ॥ आनंदाश्रु लोचनी । निघती संतोषे बहु मनी ।
नवविधा भक्ति करोनि । स्‍तुति केली श्रीगुरुची ॥३२॥ संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा आश्‍वासिती । माथा हस्‍त ठेवोनि म्‍हणती । परम भक्‍त तूचि आम्‍हा ॥३३॥

अध्‍याय ४२ वा - ओवी नं.१४५ ते १४७ (त्‍वष्‍टकुमाराची अवस्‍था)

येणेपरी स्‍तोत्र करीत । मागुती करी दंडवत । सद्गदित कंठ होत । रोमांच अंगी ठठियेले ॥ १४५ ॥ म्‍हणे त्रैमूर्ति अवतारु । तूचि देवा जगद्गुरु आम्‍हा दिसतोसी नरु । कृपानिधि स्‍वामिया ॥१४६॥ मज दाविला परमार्थ लाधलो चारी पुरुषार्थ । तूची सत्‍य विश्‍वनाथ । काशीपुर तुजपाशी ॥१४७॥

अध्‍याय ४२ वा - ओवी नं.१८२ ते १८५ (सायंदेवाची अवस्‍था)

प्रेमभावे समस्‍तांसी । बैसा म्‍हणती समीपेसी । जैसा लोभ मायेसी । या बाळकावरी परियेसा ॥ १८२ ॥ आज्ञा घेऊनी सहज । गेला तुमचा पूर्वज । सकळ पुत्रांसहित द्विज । आला श्रीगुरुदर्शना ॥१८३॥ भाद्रपद चतुर्दशीसी । शुक्‍लपक्ष परियेसी । आला शिष्‍य भेटीसी । एका भावें करोनिया ॥१८४॥ येती शिष्‍य लोटांगणी । एकाभावे तनुमनी । येऊनि लागती चरणी । सदगदित कंठ झाला ॥१८५॥

अध्‍याय ५० वा - ओवी नं.१७५ ते १७६ (यवन राजाची अवस्‍था)

ऐसे वचन ऐकोनि । म्‍लेंच्‍छ झाला महाज्ञानी । पूर्वजन्म स्‍मरला मनी । करी साष्‍टांग दंडवत ॥१७५॥ पालुकांवरी लोळे आपण । सद्गदित अंत:करण । अंगी रोमांच उठोन । आनंदबाष्‍पे रुदन करी ॥१७६॥

अध्‍याय ५३ वा - ओवी नं.२ ते ८ (नामधारकाची अवस्‍था)

सेवूनि गुरुचरित्रामृत । नामधारक तटस्‍थ होत । अंगी धर्म पुंलकांकित । रोमांचही ऊठती ॥२॥ कंठ झाला सद्गदित । गात्रे झाली सकंपित । विवर्ण भासे लोकांत । नेत्री वहाती प्रेमधारा ॥३॥ समाधिसुखे न बोले । देह अणुमात्र न हाले । सात्विक अष्‍टभाव उदेले । नामधारक शिष्‍याचे ॥४॥ देखानि सिध्‍द सुखावती । समाधि लागली यासी म्‍हणती । सावध करावा मागुती । लोकापकाराकारणे ॥५॥ म्‍हणोनि हस्‍ते कुरवाळिती । प्रेमभावे आलिंगिती । देहावरी ये ये म्‍हणती । ऐक बाळा शिष्‍योत्‍तमा ॥६॥तू तरलासी भवसागरी । रहासी ऐसा समाधिस्‍थ जरी । ज्ञान राहील तुझया उदरी । लोक तरती कैसेट मग ॥७॥ याकारणे अंत:करणी । दृढता असावी श्रीगुरुचरणी । बाहय देहाची रहाटणी । शास्‍त्राधारे करावी ॥८॥