रुक्‍मीणी स्‍वयंवर या ग्रंथातील आत्‍मज्ञानाचे अनुभूतीचे अष्‍टसात्‍वीक भावाचे विवरण खालीलप्रमाणे करण्‍यांत आलेले आहे.

प्रसंग पहिला

कृष्‍णरुपाची प्राप्‍ती । भीमकी सादर श्रवणार्थी । -हदयी आर्विर्भवली मूर्ती । बाहयस्फुर्ती मावळली ॥ ८७॥ आंग जाहले रोमांचित । कंठी बाष्‍प पै दाटत । शरीर चळचळा कापत । पडे मूर्छित धरणीये ॥८८॥ एक म्‍हणती धरा धरा । एक पल्‍ल्‍वे धालिती वारा । एक म्‍हणती हे सुंदरा । कृष्‍णकीर्तने झडपली ॥८९॥ भक्‍तीपाशीं भावना जायेगा । तैसी धाविन्‍नली जायेगा । झणी दृष्‍टी लागेल माये । म्‍हणोनि कडिये घेतली ॥९०॥रायासी कळले चिन्‍ह । ईस जाहले कृष्‍णश्रवण । तेथेचि वेधले असे मन । कृष्‍णार्पण हे करावी ॥९१॥

प्रसंग पांचवा

पांच ठेविता धरणी । कृष्‍णा आठवी रुक्मिणी । सर्वांगी थरथरोनी । रोमांचित होऊनि ठाके ॥६५॥ लीला कमल घेता हाती । कृष्‍णचरण आठवती । नयनी अश्रु लोटती । कृष्‍णप्राप्‍तीलागी पिशी ॥६६॥ गोविंदे हरिले मानस । जाहली विषयभोगी उदास । पाहे द्वारकेची वास । मनी आस कृष्‍णाची ॥६७॥ कां पा न येचित गोविंद । तरी माझेचि भाग्‍य मंद । नाही पूर्वपूण्‍य शुध्‍द । म्‍हणऊनि खेद करीतसे ॥६८॥ मग म्‍हणे गा कटकटा । किती करु गे आहाकटा । मरमर विधातया दुष्‍टा । काय अदृष्‍टालि हिले असे ॥६९॥ आजिचेनि हे कपाळ । कृष्‍णप्राप्‍तीविण निष्‍फळ । म्‍हणूनिया भीमकबाळ । उकसाबुकसी स्‍फुंदत ॥ ७०॥ मज नलगे विंजणवारा । तेणे अधिक होतसे उबारा । प्राणरिघो पाहे पुरा । शाड्.र्गधरावाचोनि ॥७१॥ आंगी न लावा गे चंदन । तेणे अधिकचि होय दीपन । माझे निघो पाहती प्राण । कृष्णचरण न देखता ॥७३॥ शिवा भवानी रुद्राणी । का पा न पवतीच कोणा । का विसरली कुळस्‍वामिणी । चक्रपाणी न पवेचि ॥७४॥ नेत्री अश्रुंचिया धारा । दु:खे कांपतसे थरथरा । धरिता न धरवेचि धीरा । विकळ सुंदरा जातसे ॥७५॥ तव लविन्‍नला डावा डोळा । वाहू स्‍फुरुती वेळोवेळा । ही चिन्‍हे गे गोपाळा । प्राप्तिकर पै होती ॥७६॥

प्रसंग सहावा

कृष्‍णचरणी जडले मन । यालागी वाचे पडले मौन । दृढ लागले अनुसंधान । सहज स्थिती चाचली ॥६९॥ आत्‍मसाक्षात्‍कारवृत्‍ती । अनिवार अहिंसादिक येती । वेवी भीमकीसवे समस्‍ती । सखिया धांवती स्‍वानंद ॥७०॥

प्रसंग सातवा

निजभावे पाहे गोरटी । तव घनश्‍याम पाहे दृष्‍टी । लाज वृत्ति झाली उफराटी । तव जगजेठी पावला ॥६३॥ उपरमोनि पाहे सुंदरी । तव अंगी आदळला श्रीहरी । प्रेमे सप्रेम घबरी । करी धरी निजमाळा ॥६४॥

प्रसंग तेरावा

आत्‍मदृष्‍टीचें लक्षण । दृश्‍य द्रष्‍टा आणि दर्शन । तिन्‍ही होऊनि अकारण । परिपूर्ण श्रीकृष्‍ण ॥८१॥ तेथे कैचे धरिली ध्‍यान । ध्‍याता ध्‍येय जाले शून्‍य । तुटला बोल खुंटले मौन । चैतन्‍यघन श्रीकृष्‍ण ॥८२॥ उरले चिन्‍मात्र स्‍फुरण । तेही मायिक तू जाण । हेतु मातु नाही लक्षण । ऐसा श्रीकृष्‍ण जाणावा । ८३॥ होती कृष्‍णरुपी संलग्‍न । ऐकोनि बळिरामवचन । कृष्‍णमय झाले मन । तेणे स्‍फुंदन चालिले ॥८४॥ कृष्‍णभाव झाला चित्‍ता । गेली देहबुध्‍दी सर्वथा । चरणांवरी ठेविलीला माथा । तिन्‍ही अवस्‍था सांडुनी ॥ ८५॥ वाचा झाली सद्गद । नि:शेषे खुंटला अनुवाद । सुखे कांदला परमानंद । पूर्ण बोध भीमकीसी ॥८६॥ नाठवती भावे दीर । वृत्‍ती झाली कृष्‍णाकार । ब्रम्‍हरुपे चराचर । देखे सुंदर निजबोधे ॥८७॥ देखोनि भीमकीची निजवृत्‍ती । हरिख न माये रेवतीपती । उचलो निया दोहीं हाती । अतिप्रीती मानिली ॥८८॥ कृष्‍ण बळिभद्र रुक्मिणी । तिघे मीनली पूर्णपणी । परमानंद रणांगणी । भावे रुक्मिणी भोगीत ॥ ८९॥ कृष्‍ण रुक्मिणी हलायुध । तिघां झाला एकचि बोध । एका हनार्दनीं आनंद । परमानंद प्रगटला ॥९०॥

प्रसंग सोळावा

कृष्‍णचरणी निजस्‍वरुप । देखता आला स्‍वेदकंप । कंठीं दाटला जी बाष्‍प । विकळरुप मूर्छित ॥६९॥ सद्गुरु म्‍हणती सावधान । कृष्‍णचरणी दृढ मन । धैर्य बळे राखोनि जाण । विकळपण येवो नेदी ॥७०॥ मोहे धांविन्‍नलो धाये । म्‍हणे तुज झाले काये । झणी दिठी लागेल माये । उचलोनि कडियें घेतली ॥७१॥ कृष्‍णचरणी जें अनुभविले । ते तव न बोलवे बोले । भीमकीया शहाणपण केलेंडर । खुणे वारिले धायेते ॥७२॥

प्रसंग सोळावा

नमस्करालगी भले । येरी मागुती अंगविले । तव समसाम्य पाउले । काही केल्या नातुडती ॥८॥ जितुके अभिमानाचे बळ । तितुके निजद्रूष्टिपडळ । तेणे चुकवले चरणकमळ । वेगे वेल्हळ गजबजली ॥९॥ वियोग न साहवे पोटी । ऊर्ध्वश्वासे स्फ़ुंदे गोरटी । चरण न लागती लल्लाटी । कपाळ पिटी निजकरी ॥११०॥ दुःखे म्हणतसे कटकटा । मर मर दुष्टा अद्रूष्टा । कृष्ण पावलिया गोष्टी फुजटा । चरण लल्लाटा न लागती ॥११॥ लोक म्हणती सकळ । धन्य भिमकीचे कपाळ । ते हे आजि झाले निर्फळ । श्रीकृष्णचरण नातळती ॥१२॥ मनी होती येसी आस । करुनि उटणियाचे मिस । कृष्ण नमीन सावकाश । तेही उदास भाग्य भाग्य जाले ॥१३॥ चरण न पावेची कपाळ । जीवी लागली तळमळ । गात्रे जाताती विकळ । परम विव्हळ होतसे ॥१४॥ चंडवाते जैसी कर्दळी । उलथो पाहे जी समूळी । त्याहून अधिक भीमकबाळी । गात्रे सकळी कापती ॥१५॥ नेत्री अश्रूंचीया धारा । अंग कापतसे थरथरा । चरणवियोगे सुंदरा । शरीरभारा उबगली ॥१६॥ गळती अकंकारे भूषणे । करमुद्रीका आणि कंकणे । पडली अवशेषीत प्राणे । सत्वगुणे मूर्छित ॥१७॥ जीवनावेगळी मासोळी । तेवी तळमळी भीमकबाळी । उध्दव म्हणे कृष्णनाथा । तूझी अवस्था शोधीत चित्ता । विनोद करिसी भक्तहिता । चरणी माथा ठेवू दे ॥१९॥ मग धांवोनिया लवलाहे । धरूनि भीमकींची बाहे । म्हणे उठी उठी वो माये । वदी पाय कृष्णाचे ॥१२०॥ सांडी सांडी लज्जाभिमान । निर्विकल्प राखी मेनेजर । वृत्ति करूनी सावधान । हरिचरण वंदावे ॥२१॥ मग उध्दवाचे वचनी । देत विश्वास रूक्मिणी । लाज सांडिली उपडोनी । हरिचरणी निर्लज्ज ॥२२॥ समचरणाचिये भेटी । सुटल्या अहंसोहं गाठी । उटू विसरली गोरटी । घातली मिठी हरिचरणी ॥२३॥ वृत्तीसी जाले समाधान । खुंटला शब्द तुटले मौन । भोगिताहे चैतन्यघन । समचरण वंदिता ॥२४॥ उपरमली विषयदृष्टी । निजानंदे कोंदली सृष्टी । तेथे हरपली त्रिपुटी । उठाउठी निजलाभ ॥२५॥ कृष्णीचरणी जडली कैसी । देह विदेह नाठवे तिसी । विसरली विवाहसोहळ्यासी । कृष्णसाम्येसी समरस ॥२५॥