तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि सुकर्मी कुर्वन्ति कर्माणि सच्छास्त्री कुर्वन्ति शास्त्राणि ।
महर्षी नारदांनी नारद भक्तिसुत्रात प्रेमरुप भक्तिचे माहात्म्य वर्णन करुन इतर साधनापेक्षा भक्तिचे श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. सुत्रांमद्ये आधी भक्ति प्रेमात रंगलेला भक्ताचा आचार व अनुभव आणि नंतर त्यावरुन भक्ति विषयक तत्वे ठरविली गेली आहेत. साधक भक्ताने जीवनात भक्तिची लक्षणे पूर्णतः बाणून भक्तिशास्त्रातील अनुभव घेण्यासाठी मार्गदर्शन वरील नारद भक्तिसुत्र हा ग्रंथ अत्यंत लाभदायक ठरेल.
नारद भक्तिसुत्र विषय सारंश
नारद भक्तिसुत्र विषय सारंश |
सुत्र क्रमांक |
भक्तिबाबत विषय प्रस्ताव | |
भक्तिचे स्वरुप | |
भक्तिचा प्रभाव |
४) यल्लब्ध्वा पुमान्सिध्दो भवतिअमृतो भवति,तृप्तो भवति । ५) यत्प्राप्य न किज्जिद्वात्र्छति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति । |
भक्तिमधील अनन्यता व अनन्य भक्तांचा आचार |
७) सा न कामयमाना निरोधरुपत्वात । ८) निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः । ९) तस्मिन अनन्यता तद विरोधिषु उदासीनता च । १०) अन्याश्रयाणां त्यागो अनन्यता । ११) लोके वेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधिषु उदासीनता । |
महर्षी नारद यांनी नारदभक्तिसूत्रात प्रेमरुपाभक्तिचे महात्य वर्णन केले आहे. या भक्तिसुत्रातील रहस्य साधकांना कळावे व भक्ति प्रेमाचा आनंद लुटता यावा म्हणून वारकरी संप्रदायाचे अर्दायु गुरुवर्य ह.भ.प धुंडामहाराज देगलूरकर यांनी देवाच्या नामाचे महत्व विषद करणारा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर टिका करुन साधकांना हरिपाठाद्वारे नामाचा गुहयार्थ कळून यावा व साधकांचे मन नामस्मरणाद्वारे आत्मस्वरुपाशी लीन व्हावे म्हणून हा खटाटोप केलेला आहे.तसेच मनुष्याला जीवनात भक्तिशिवाय तरणोपायच नाही, हे ब्रम्हलीन सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण (घोटी) यांनी जाणले व नारद भक्तिसूत्रांतील रहस्य साधकांना अनुभवाला यावे व भक्ति दृढ होण्यासाठी अमोलीक प्रयास घेतले. हे करत असताना अनुग्रह घेतलेल्या साधकांमध्ये भक्तिची लक्षणे ज्या ज्या वेळी प्रगट होत, तेंव्हा अज्ञानामुळे वारकरी संप्रदायातील काही जेष्ठ कीर्तनकार व इतरही भक्तिची अनुभूती नसल्याने संभ्रमात पडत. मग त्यांनी संत श्रीपादबाबांच्या भक्तिकार्याच्या विरोधात बंड पुकारले आणि ह.भ.प.धुंडामहाराज देगलूरकर यांचेकडे याबाबतची तक्रार नेली. मात्र न्याय देणारे न्यायाधीश हे आध्यात्मशास्त्राचे अधिकारीच होते.
तुका म्हणे चाखुनी सांगे । मज अनुभव आहे अंगे ॥
अनुभव आले अंगा । ते या जगा देत असे ॥
उजळाया आलो वाटा । खरा खोटा निवाडा ॥
याप्रमाणे ज्यांनी भक्तिचा यथार्थ अनुभव घेऊन भाविकांना ती अनुभूती यावी व भक्ति-नामाचा प्रसार व्हावा म्हणन धुंडामहाराजांनी सुत्रांचे विवरण केले.ज्यावेळी त्यांचेकडे ही सत्य धर्माची तक्रार आली तेंव्हा त्यांनी श्रीपादबाबांचा हा चाललेला भक्तिमार्ग बरोबर असून तो संप्रदायपूर्वक असल्याचा निर्वाळा दिला व सत्य प्रत्ययाला आले.
संत एकनाथ महाराज यांनी महर्षी नारद यांचे वर्णन एकनाथी भागवत या ग्रंथात पुढील प्रमाणे केले आहे.
नारदा तूं भगवद्रूप । तुझी भेटी करी निष्पाप ।
तुवां कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरुप ठसावें ॥५२॥
नारदा तु देवा समान । हेही उपमा दिसे गौण ।
हेचि विषयी निरुपण । वासुदेव आपण निरुपी ॥५३॥
देवापासून भूतसृष्टी । सुखदुःखें शिणें पोटी ।
अतिवृष्टी कां अनावृष्टी । भूतकोटी आकांतू ॥५४॥
त्या देवा परिस साधू अधिक । हे साचचि मज मानले देख ।
देव चरिते उडे सुखदुःख । साधू निर्दोख सुखदाते ॥५५॥
त्याही माजी तुजासारखा । जोडल्या कृपाळू निजात्म सखा ।
तैं पेठ पिके परमार्थ सुखा । हा महिमा लोकां कदा न कळेंचि ॥५६॥
नारदांच्या समत्व स्थितीचे वसुदेव वर्णन पुढीलप्रमाणे करतात
तू देवांचा आप्त होसी । दैत्याही विश्वासती तुजपाशीं ।
रावण तुज नेऊनि एकांतासी । निज गुह्यासी स्वयें सांगे ॥६० ॥
देव रावणे घातले बंदी । तो रावण तुझे वंदी ।
शेखी रामाचा आप्त तूं त्रिशुध्दी । विगम तुजमधी असेना ॥६१॥
जरासंध कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरी ।
आणि कृष्णाचे सभेमाझारी । आप्तत्वें थोरी पै तुझी ॥६२॥
नाम घेऊ नेदीं देवाचे । हे ब्रीद हिरण्यकशिपूचें ।
त्यासी कीर्तन तुझे रुचें । विषमत्व साचे तूज नाही ॥६३॥
तुवा व्यास देखोनि सज्ञान । उपदेशीलें गुहयज्ञान ।
ध्रूवबाळक अज्ञान । म्हणोनि जाणनुपेक्षिसी ॥७२॥
प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्य पुत्र न म्हणसी तेव्हां ।
तुझिया कृपेचा हेलावा । तोनिज विसांवा दीनांसी ॥७३॥
वरिवरी दाविसी मिथ्या कोप । कोपोनि सांडविशी त्याचे पाप ।
शेखी सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयाळुवा ॥७५॥
वाल्मीक ऋषींचे गुरुही श्रीनारदच होते
संत एकनाथ महाराज सांगतात
केवळ वाट पाडा देख । भजनेवीण एकाएक ।
महाकवी केला वाल्मीक । अमर अवश्यक वंदिती त्यासी ॥७०॥
देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी ।
ऐसा तू कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥७१॥
वरिवरी दाविसी मिणधाकोप । कोपोनि सांडिवशी त्याचे पाप ।
शेखी सायुज्याचे दीप । दाविसी सद्रूप दयाळुवा ॥७२॥
भावार्थ रामायणनामक प्रासादिक ग्रंथात संत एकनाथ नारदाचे श्रेष्ठत्व सांगतात.
ब्रम्हपुत्र श्रीनारद । सर्वेंद्रिंयी ब्रम्हबोध ।
ब्रम्हवीणा सुस्वरनाद । नित्य आनंद ब्रम्हपदी ॥३॥
ब्रम्हानंदे डुल्लत । ब्रम्हदृष्टी विचरत ।
भुवने भुवन हिंडत । स्वेच्छा विचरत ब्रम्हांड ॥४॥
भावार्थ रामायण यु.का.७५
भक्तिमार्गात मतामतांचा गलबला होऊन अनेक पंथ,उपपंथ, उपासना पध्दती, भिन्न भिन्न आचार, तसेच भिन्न प्रयोजने निर्माण झाली. त्यात भेदाभेदांचा वादग्रस्त प्रश्न निर्माण केला गेला. भज्य – भक्ति – भक्त यांच्या स्वरुपात संदेह निर्माण झाले, तसेच भक्तिच्या आत्यंतिक प्रयोजनाचा विसर पडून ऐहिक –पारत्रिक फलाकरिताच भक्ति करणा-या आर्त अर्थार्थींची संख्याच अधिक झाली. ख-या भक्तिचे स्वरुप व प्रयोजन दृष्टीआड केले जात होते. अशावेळी भक्त–भाविक समाजाला ख-या भक्तिमार्गाचे यथार्थ स्वरुप कळावे, भक्तिचे महात्म्य कळावे याकरिता श्रीनारद महर्षींनी भक्तिसूत्रांची रचना केली आहे.