सामान्य माणसे संसारात त्रस्त झाली व व्यवहारीक उपाययोजनेने ते दु:ख दुर होत नाही असे दिसले म्हणजे मग देवाकडे धाव घेतात व म्हणूनच दु:ख हरण करणारा हा देवाचा धर्म ज्यात सांगीतला आहे ते नाम हरीपाठ रुपाने चटकन डोळयासमोर येते व वारंवार उच्चारले जाते.
देव भक्त दोन्ही एकरुप झाले । मुळीचे संचले जैसे तैसे ॥
हरिपाठ किर्ती मुखे जरी गाय । पवित्रची होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप । चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥२॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥३॥
ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा लाधले । निवृत्तीने दिधले माझो हाती ॥४॥
नामाविण मुख सर्पाचे ते बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥
वाचा नव्हे लांव जळो त्याचें जिणे । यातना भोगणे यमपुरी ॥२॥
अंतकाळी कोणी नाही सोडविता । पुत्र बंधु कांता संपत्तीचे ॥३॥
अंतकाळी कोणी नाहीं बा सांगाती । साधुचे संगती हरि जोडे ॥४॥
हरिपाठात हरिनाम महात्म्याचे सर्वांगीण प्रतिपादन असते. हरिपाठ याचा अर्थ हरिनाम पाठ असा आहे. नामस्मरण ही हरीची फार मोठी सेवा आहे. हरीला तर सर्व पूजा, पादसेवन,वंदन दास्ये, इत्यादी नवविधा भक्ती पैकी अतिप्रीय अशी नामस्मरणसेवा आहे.येथे नामधारक हाच खरा हरिदास होय. दास्यत्व म्हणजे सेवा.
पुढे वाचा