संत श्रीपाद बाबा यांचे प्रवचन
पाहे पा दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड ।
परी ते अव्हेरुनी गोचिड । अशुध्द काय न सेविती ॥१॥
का कमलकंदा आणि दुर्दरु । नांदवणूक एकेची घरी ।
परी पराग सेविजे भ्रमरी । येरा चिखलची उरे ॥२॥
नातरी निदैवाच्या परीवरी । लोहया रुतलीया आहाती सहस्त्रवरी । परी तेथ बैसूनी उपवास करी । दरीद्री विजये ॥३॥
तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्व सुखाचा आरामू ।
का भ्रांताशी कामु । विषयावरी ॥४॥ - ज्ञानेश्वरी
जगाची माऊली यांनी या ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय मधील या ओव्यांद्वारे आपल्या अंत:करणातील भगवंता विषयी वर्णन केले आहे. हा जो ग्रंथ आहे तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवान यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या षड्गुण ऐश्वर्य भगवान यांच्या मुखातील हे बोल आहेत. जसा भगवंताचे षड्गुण आहेत तसा याही ग्रंथाला सहा अंग आहेत. वक्ता,श्रोता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत, सिद्धांत ही सहा अंग आहे. मी बी सहा अंगाचा आहे. नाही नाही तुम्ही बी सहाच अंगाचे आहेत. कसे माझी आई- माझ्या आईची आई – माझ्या आईचा बाप, हे तीन. माझा बाप – माझ्या बापाची आई व माझ्या बापाचा बाप हे तीन अंग असे सहा मुळे मी सातवा येथे आहे.पण अज्ञानामुळे हे कळत नाही .गाईच्या कासेजवळ गोचीड आहे गोचीडाला माहीत नाही की जवळच दुध आहे. तुज आहे तुजपाशी । परी तु जागा चुकलासी त्याला माहीतीच नाही तो गोचीड रक्तच पितो. दुसरा दृष्टांत देतात – चिखलात कमळ आहे. कमलावर लांबून लांबून भुंगे येतात मकरंद सेवन करतात पण खाली चिखलात बेडूक तिथे बसून चिखलच खातो. सांगा पाहुणे मग आपल्या जवळ बी देव आहे. पण माहीतीच नाही. मग कुणी जर सांगितले तर कळणार नाही कां? कळणार नाही ? सांगायला पाहीजे ना.म्हणून संताविण प्राप्ती नाही । ऐसे वेद देती ग्वाही ॥ मग संत म्हणजे काय? गंधगोळया उगळणारे, नाही संत म्हणजे ज्ञान होय. माणूस नाही. ज्ञानानेच तरता येईल. ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी अथी आणावे । तरी संता या भजावे । सर्वस्वेसी ॥ म्हणून माऊली म्हणते ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । साच उध्दरलो गुरुकृपे ॥ पण माणूस कसा पाहीजे, स्वत: सांभाळून दुस-याला तारुन नेता आलं पाहिजे. इथे तर गाईड करणारी मंडळी गंज आहेत. हो पण कसे काही अनुमान प्रमाणाचे आहे. काही शब्द प्रमाणाचे आहे. तर प्रत्यक्ष प्रमाणाचं मात्र कोणी नाही.अनुमान प्रमाण म्हणजे एका नदीच्या तीरावर तीन माणसं बसली होती.या नदीच्या पात्रातून पलीकडे कसे जायचे म्हणून त्यांतल्या एकाला विचारले पहील्या प्रवाशाला विचारले-तो सांगतो सरळ 10 हात वरच्या बाजूने पुन्हा 15 पावले सरळ पुढे जा नंतर पुन्हा वरच्या बाजुने पुढे जा आणि नंतर थोडे उजव्या बाजूला 10पावले सरळ गेल्यानंतर आपण नदीपात्र पार करुन जाऊ शकाता. हे ऐकल्यानंतर त्यांने सांगणा-याचे बारकाईने निरीक्षण केलें तर तो आंधळा दिसत होता.त्याचेवर विश्वास बसेना म्हणून त्याला त्याने विचारले तू आंधळा आहे काय तर केंव्हा पासून आहे,तर त्याने जन्मांधच आहे असे म्हटल्यावर प्रवाशाने त्याच्यावर विश्वास न ठेवता पुढेच चालत राहीला.दुस-या प्रवाशाला नदीतून पलीकडे जाण्याचा सल्ला विचारला, त्यानेही त्याला तसाच सल्ला दिला.त्याचेकडे पाहीले तर तो पांगळा असल्याचे दिसले,त्याला विचारले तू नदीपार करुन गेला कां तर नाही मी दुस-याच्या खांदयावर बसून पलीकडे गेलो आहे. यावरही त्याचा विश्वास बसेना.नंतर त्याने पुन्हा तिस-या प्रवाशाला विचारले. त्यांने सांगीतले की, मलाही पलीकडील गांवी जायचे आहे.चला तुम्हाला मी बरोबर घेऊन जातो.त्या प्रवाशाला आनंद झाला व मार्गदर्शकही मिळाला व इच्छीत मुक्काम गाठता आला. मग परमार्थात नुसत सांगून चालेल का नाही, जीवन मरणाच्या फे-यातून सुटण्याचा मार्ग सांगावा. जेवावयला बसल्यावर पात्रात पदार्थ न वाढता नुसत्या पंत्रवळी टाकल्या श्लोक झाला व बसा जेवायला असे म्हणून पोट भरेल कां?इथ नसुतेच गाईड करणारे आहेत.बिगर अब्रुचे आमच्या सारखे पोटभर खां,काय खाता,वाढले तर खाता येईल अन्यथा पोट भरणार नाही.म्हणजेच त्याला तो विषय कळल्याशिवाय त्याला ती गोष्ट कळेल?मग समजून नको द्यायला,विषय नको कळवून द्यायला,कां नाही,पहा आमच्या ज्ञानोबांनी सगळं विश्वच ब्रम्हरुप केल.प्रवचन कीर्तन हा करमणूकीचा विषय आहे कां, तत्वज्ञान , मग हे समजायला नको कां, सांगायला नको.तेवढया १000मधून १0डोकेबाज असतील का पण त्या १0 ला नको का कळायला,ज्ञानोबा गेल्यापासून कीर्तने चालू आहेत,त्याने एखाद्याचा उध्दार झाल्याचे कळले का्? मी जेवलो मी उपाय आहे मी फायनल पास झालो,मला कळले नाही सर्टीफीकेट आहे् माझया जवळ त्या विदयालयाचे का बोगस म्हणाम्हणी म्हणजे सर्टीफिकेट आहे का? अरे हे अधिकृत आहे,शिक्का मोर्तब आहे.त्याचप्रमाणे परमार्थही शिक्कामोर्तबाने करणे आवश्यक आहे,कारण बोलाचीच कढी बोलाचाच भात.याचे कारण हा विषय कां पटत नाही, तर दोन्हीही तसेच आहेत म्हणून, मात्र देव तसे नव्हते देवाने सांगीतले की अर्जुना मी सांगतो त्याप्रमाणे ऐक.हे लोक कां ऐकून घेत नाही तर त्यांच्या ठिकाणी अद्वेत किंवा विषयक आहे म्हणून ते ऐकत नाहीत.ही विषमता घालावयला पाहीजे व धर्माची जाणीव व्हायला पाहीजे,मग ती कोणी करुन दयायची हो?लहान मुल रांगायला लागले की त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्यावर की आईने तर तीने घडोघडी मुलाचा तपास करायला पाहीजे, बाळा कोठे बाहेर गेला पहा रे, क्षणाक्षणाला त्याची चौकशी आईने नको का करायला. रस्त्यावर वाहतूक आहे हे त्याला माहीत नाही, ते मुल जर आडवे आले तर उडून जाईल त्याच्या सांभाळण्याची गोष्ट आहे की नाही? मुलाला काहीही कळत नाही, ते अज्ञान आहे, जाईल घराचे बाहेर.आम्ही एका ठीकाणी सप्ताहाला गेलो ज्यांना एक लहान नातू होता,तो लई नवसाचा. त्याला काडयाची पेटी माचीस सापडली त्याने घराला आग लावली भर दुपारी झोपाही गेल्या व जेवणही गेले, ही धावपळ मोठयाने पेटवले तरी असेच व लहानांनी पेटवले तरी हेच. पेटवण्याचे ठिकाणी काही दुजा भाव नाही तर त्या काडी मध्ये आहे नाही बुआ लहान मी नाही पेटणार अशी ती काडी म्हणणार नाही.ऐकणारा पेटायला ती पावर नामात असे ते कोणाचेही हातात दिले तरी उपयोगच होईल.म्हणून आमच्या ज्ञानोबांनी निर्देश केला.
आणखी तिसरा दृष्टांत सांगतात – का निदैवाच्यां परिवरी । लोहया रुतलिया आहाती सहस्त्रवरी । परी तेथ बैसोनि उपवासु करी । का दरिद्र जिये ॥ एक अगदी अनाथ झाला होता, आणि दारात बसून जाणा येणा-याला सांगत होता. मला आता काही अवकाश नाही, मला कुठे ऐपत नाही. काहीतरी मला द्या. तो ज्या जागेवर बसला होता तिथे धनाच्या कढया होत्या. हे त्याला माहीत नव्हते, तेथे बसून सांगता होता. मला खायला काही नाही, द्या तुमच देव बर करीन. गोष्ट बरोबर आहे, माणसाने द्यावे काही हरकत नाही, कुणाला द्याव खायला मागत असेल तर खुशाल जेऊ घालावं, मी या मताचा आहे. नुसता एवढा तेवढा तुकडा टाकून तरी काय कामाचे, पोटभर जेवू घालाव घे जा आता काही मागू नको. पण आता माहित आहे, तुम्हाला नाही माहीत, मी सांगतो. ही जी मागणारी मंडळी आहे ती भाकरी मागते. भलेभले गाठोडे बांधते व उल्हानसनगरला जाऊन 100 रुपये किलो प्रमाणे विकते. घेणारी मंडळी त्याचे बिस्कीट बनवते व तुम्हाला ते पाठवते. सगळया शिळया भाकरी, शिळया चपात्यात, शिळा भात, तुम्हीम समक्ष जर जाऊन पाहील तर पहा डोळया वेगळ सृष्टी वेगळं. साहेब लोक पुन्हा, तीच बिस्कीट गबागब खातात. बिस्कीट पुडा आणा चहाबरोबर. माहीतीच नाही नां. डिस्को काही फरक नाही. मग देऊन तरी कांय सदोपयोग, तर दुरुपोगच. झाला अशाच गोष्टी इथं आहेत. तो मागणारा त्याच्या भुंडयाखाली धनाच्या कढया होत्या. पण त्याला माहीत नाही, तसे तुमच्या आमच्या जवळ जो मालपाणी आहे, पण म्ह्णणतो सुख पाहीजे. अरे सुखासाठी करीशी तळमळ किती तळमळ चालली सुखासाठी, का दु:खासाठी? असा कोणी आहे का, मी सत्य नारायण घालतो माझा सत्यानाश होऊ दे. माझ चांगल होऊ दे मी सत्य नारायण घालील. चांगल होण्या साठीच गोष्टी आहेत पण अद्याप चांगल झाल कां. माझ्या बापानं संसार केला पण मला अजून बोंबा मारायची पाळी आहेच. मी करुन राहीलो पण माझ्या भावी पिढीला आहेच. आजपावेतो पुरलं कोणाला नदीच फुकट पाणी आणल, ते सुध्दा पुरत नाही. काही पुरत नाही. केल पाहीजे केल्याशिवाय जमत नाही. छप्पन कोटी यादव होते, ते नांगर हाकित होते. धंदापाणी करत होते, देवाची पोर म्हणून तेही बसून खात नव्हती. देवानी स्वत: गाईवासर सांभाळली (वळली) आपणाला ते करायला लागल तर गुराखी म्हणतील. त्याला मोठा माणूस म्हणणार नाही तर, हा आमचा गुराखी. देवाने गाई वासर वळली मग देव कांय गुराखी झाला. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत, व हा विचार आताच करायला पाहीजे. विचार करायला टाईम नाही, कोणता माणूस असा आहे त्या्ला गॅरंटी माहीत आहे. पोस्ट डेटेड (पुढची तारीख) माहित आहे. हम ये तारीख को जायेंगे. कुणाजवळही नाही. नुसती ठेच लागल्याचबरोबर पुंढलिकवरदे हरी विठठल होते. जर खिशात पत्ता असेल तर मेहरबानी. काही दयाघन त्यात पत्यालिकववर नेऊन पोहचवतील. अन्यथा बेवारशी म्हणून विल्हेवाट लावतील किंवा फेकाटून देतील. मग कोल्हे कुत्रे खातील, कोल्हे या कुत्रांनी खाल्लेलं चांगल पण मातीत पुरलेला नाही चांगल. असं एक प्रमाण आहे. ऐशा भी मरणा विदेशी । जहॉं नही अपना कोय ॥ अशा ठिकाणी माणसानं मराव की तिथे आपल कोणी नाही. पशुपक्षी भोजन करे तो कोटी यज्ञ सफल होय. त्यांचा जठरांग्नी शांत झाला या शरीराकडून अन आम्ही तर त्याला जाळून टाकतो. मातीत घालतो, एकदा एका गावातं म्हातारी मेली पण तिची पोरं लई रडायची गांवातला एक माणूस गेला म्हटला भाऊ रडु नका तुमच्या आईच सोनं झाल. असे ऐकून ते पहाटेच उठले व राख उकरायला गेले म्हशानात, कुठे सोने पण अर्थ काही कळला नाही, तिथून आल्या वर ते म्हणाले काहो तुम्ही म्हटल सोनं झाल पण तिथे सगळी राखच आहे. गाढवावो त्याचा अर्थ कळला का. सोनं म्हणजे चांगल झालं, अशाच काही गोष्टी आहेत, सांगा मग आता इथे ज्यांच्या् जवळ धनं आहे तो तपास करावा, चुकामुकीचा. कष्टाच फळ तयार आहे, दाने दाने पर लिखा है । खाने वालेका नाम । फिर भी रोटी धुंडत है धुंडत चारी धाम ॥ दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम । प्रश्ना असाच आहे, पण कर्तव्य करायला पाहीजे कां नको, कर्तव्यच करायला घराचे बाहेर पडायला नको कां घरात बसून दे हरी पलंगावरी, नाही नाही कर्तव्याची जोड दिलीच पाहीजे, आणि कितीही कर्तव्य केलं आणि काळ अनकूल नसेल तर, कर्म बिघडेल असेल तर फळ मिळणार नाही. ज्यावेळेला काळ अनकुल होईल त्यावेळेला त्याचे फळ मिळेल. एक संन्यासी होता तो अजारी पडला, आजारी पडल्यानंतर आता कुठ भिक्षा मागायची मग तो राजाजवळ गेला, सांगीतले की मी आजारी आहे, सहा दिवसांपासून उपाशी आहे, मला काहीतरी द्या. त्यावेळेला 15 रुपयाचे नाने होत,(गिन्नीक) पाहीली तुम्ही कोणी? ती मी पाहीली. सोन्याची गिन्नी होती त्यावेळेची किंमत पंधरा रुपये ती त्याला दिली एक गिन्नी घेतली विधी करायचां म्हणे स्नानसंध्या वगैरे, अंघोळीला गेला तिथे ठेवले व कपडे त्याच्या वर सोडून ठेवली, व अंघोळीला गेला. कपडे वा-याने उडून गेली. म्हशीचे टोळकं आले आणि त्या गिन्नीवर नेमकी म्हैस हगली ते अंघोळ करुन आले, कपडे जेथे होती तेथे गेले पण गिन्नी नाही मिळाली होती पण जमले नाही. काळ अनकूल नाही, परत दोन दिवस तसाच राहिला आणखी तीस-या दिवशी परत राज्याकडे गेला व म्हणाला तुम्ही जी गिन्नी दिली होती ती हरवली अजून मी उपाशीच आहे. म्हणे चुक झाली द्या आणखी. राजाने पुन्हा एक गिन्नी दिली व त्याने लुंगीला गाठ बांधली त्याची. सोडून ठेवल परत विधी, तीकडे विधी करायला जातो इकडे घार आली आणि लुंगी उचलून घेऊन गेली तिच्या पिल्लांकरता. हा पुन्हा पहातो तर त्याची लुंगीच बेपत्ता, तिच्यामध्ये गाठ मारली तरीही तो उपाशीच कर्तव्याला चुकला. नाही ना चुकला पण काळ अनुकूल नव्हता. काळ हा अनकूल नाही तर विवेक नाही. अहो भूक लागली उपाशी होता, काही घेऊन खाल्ले असत आंघोळ करायची काय गरज पण विधी आडवे मग विधी करायची काय गरजं, काही घे व खां पण नाही आमची आई म्हणे देवाला नैवद्य दाखवल्या शिवाय काही खायचं नाही, मग मला राग यायचा पण आत्ताशी कळलं देवाला नैवद्य दाखवला पाहीजे. भारतीय संस्कृंती आहे आपली, तेंव्हा आता कांय? तरी आणखीन गेला. महाराजांना सांगीतले, ते म्हटले असं कसं असचं आहे मी देवा शपथ सांगतो. राजा दयाघन होता. द्या अजून एक. मग याच्या टको-यात आला विधी बिधी बंद मग टको-यात आले हात धुतलं, सामान आणलं, भांडी कुंडी आणली, स्वयंपाकाची तयारी करायची लाकड पाहीजे कां नाही मग अंबराईकडे गेला, झाडावर चढला ते लाकूड पाहीजे तर तेथे लुंगी सारखे दिसले आपली तर नाही नां जरा वर चढला ती आपली आहे. हि कांय मोहर सापडली खाली येताना पहिल्या दिवशी जी म्हैस हगली होती तिची गोवरी वाळून गेली होती, गोवरी पाहीजे ना स्वयंपाकाला गोवरीला ठोकर मारली ती उलटी झाली त्याच्यातही गिन्नी सापडली. सगळं गेलेल सापडलं अनं स्वयंपाकही झाला. पण थोडा विधी आडवा आला होता, अन त्यामुळे एवढा घोटाळा केला. देवाचं नांव घ्यायला केंव्हा बी, कां विधी, काळ वेळ नाम उच्चारीता नाही । दोन्ही पक्ष पाही उध्दरती ॥ कुठे भी केंव्हा भी कसे भी , हरी बोला देता हरी बोला घेता । सर्व काही करता हरी बोला॥ हरी बोला एकांती हरी बोला एकांती । देह त्यागा अंती हरी बोला। पण हया गोष्टी अनकुल होत्या पण काळ अनकूल नव्हता आणि धन जवळ होत, खाली नाही कां काळ अनकूल नाही. संगती नाही विवेक नाही म्हणून ते सापडत नाही. जर विचारले असतं तर काही काळ अनकूल व्हायला जगाचा नियंता आहे, काळाचा नियंता आहे, पण त्याला शरण नको जायला त्याला शरण जायला पाहीजे मग काहीतरी मदत होईल आणि त्याला जर शरण नाही गेल तर मग मदत होणार नाही. शरण गेलीयाचे कांय होतें फळ । तु तर उध्दरशील यात नवल नाही तुका म्हणे कुळ उध्दरीजे ॥ एवढा फरक आहे की, नाही ज्या कुळामध्ये जो मुलगा जन्माला आला आणि त्याने जर देवाची भक्ती, केली तर बापाकडच्या 42 व आईकडच्या 42 कुळांचा उध्दार होतो. आमच्या एकनाथ महाराजांनी सांगीतले कोटी कुळे तारी । हरी अक्षरे दोन्ही ॥ मग स्वत: ला तरता येणार नाही स्वत: तरु शकत नाही काही अवघड गोष्ट नाही तर पोहणा-या मार्फत जायला पाहीजे कां नाही, भवनदीचे पाणी गडया रे फारच ओढते । भले भले पोहानारे आसडून पडते । गंज मंडळी पोहायला जाते कोणल भोव-यात जातो कोणी कपारीत सापडते कोणल कशात सापडतं नदीचे पात्र गाठांयच माहीत पाहीजे त्यातच जजमेंट आहे कुठे उतरायचे कुठे निघायचे कुठेही उडया टाकल्या कसेंही पोहायला लागले तर जमणार नाही आणि तोंडात पाणी गेल तर मग पहायला नको. तोंडात पाणी जातं नाही तोपर्यंत गोष्ट माणसाने करावी कां नको? मग सांगा आता येथे काही गोष्टी अशा आहेत, विचाराच्यां आहेत आणि म्हणून ते म्हणतात, तै ह्रदयामध्ये रामू । असता सर्व सुखाचा आरामू । की भ्रांताशी कामू । विषयावरी ॥
सर्व सुखाचा विसावा आत्मा आहे, मग आत्मा तुम्ही आहांत कां देह तुम्ही आहात. हा धर्म नको कां अगोदर कळायला? कां नको? तुम्ही इथे आत्मा आहात देह नाही, निश्चित निर्विवात कोणत्या ही न्यायाधीशापुढे गेले तरी त्यालाही कबूल करावे लागेल, नाक घासून. साहेब तुम्ही जे बोलता ते चेतना आहे म्हणून कां तुम्ही म्हणून? साहेबाला सुध्दा कबूल करावे लागेल चेतना आहे म्हणून? नाही ती चेतना गेली तर साहेबांना डयुटीवर जाता येईल कां ड्यूटीवर साहेब जात होता की चेतनेमुळे जात होता. याचीच ओळख करुन घेतली म्हणजे तैसा ह्रदयामध्ये असलेला राम कळेल एरव्हीच नाही कळायचे. माऊली ज्ञानोबांनी आपल्याला या ओवीद्वारे आपल्या जवळच्या आत्मारामाची ओळख करुन घेण्यासाठी याद्वारे आपणास मोलाचा संदेश दिला आहे. तुज आहे तुजपाशी। परी तू जागा चुकलाशी माऊलींनी वरील दृष्टांत देऊन ह्रदयातील भगवंताची ओळख करुन घेण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम । संसार श्रम भोगू नका ॥ तृणअग्नीमेळे समरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ॥ तसेच भगवंताच्या नामाने भक्तांच्या अंतकरणावर परिणाम होतो. हि अनुभूती माउलीनि ह्या ओवी द्वारे जगाला सांगितली. तैसा हृदयामध्ये मी रामु । असता सर्व सुखाचा आरामू ।का भ्रांताशी कामु । विषयावरी ॥ पुंडलीक वरदे हरी विठठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.