किर्तन १

 
 
 

संत श्रीपादबाबांचे कीर्तन [२]

(संग्रहक-ह.भ.प.गीतेश,मानकर-पुणे)

कर्वेनगरला सुतार काकांच्‍या घरी एका संतसंगात संत श्रीपादबाबांच्‍या अगदी शेजारी बसून जेवण्‍याचा योग लाभला.बाबा जेवताना वाढणा-याला हो,नको हया शिवाय एक शब्‍दीही बोलले नाही.बाबांचे जेवण होत आले.त्‍यांनी ताटात चपातीचे काठ काढून ठेवले होते;ते तुकडे माझया ताटात ठेवून त्‍यांनी खावून घेण्‍यास खुणेनेच सुचविले.बाबा जेवून झाल्‍यावर उठले तेंव्‍हा बाकीच्‍या साधकांनी बाबांचे उच्‍छीष्‍ट खाण्‍यासाठी धाव घेतली,साक्षात परब्रम्‍हाचा तो प्रसाद होता.याद्वारे बाबांचा माझयावर कृपावर्षावच झाला.अशी अनुभुती येऊन संताची आत्‍मस्‍तुतीपर वचने संत रामदास बाबा,श्रीपादबाबा,संत बापू गुरुजी मालुंजेकर,इत्यादींची श्रवण केलेली अमृतवाणी लेखणीद्वारे मांडण्‍याची प्रेरणा वाढू लागली;वाघोली,राममंदीर,जिल्‍हा-पुणे येथील दिनांक ४ जानेवारी १९९२ रोजी संत श्रीपादबाबा यांच्‍या कीर्तनाद्वारे खालील अभंगावरील विवेचनातील श्रवण झालेली अमृतवचने मांडण्‍याचा अल्‍पसा प्रयत्‍न करत आहे.

बोलावा विठठल पहावा विठ्ठल ।करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

येणें सोसे मन झालें हांवभरी । परत माघारी येत नाही ॥२॥

बंधनापासूनी उकलल्‍या गांठी । देतां आली मिठी सावकाश ॥२१॥

तुका म्‍हणे देह भरिला विठ्ठले । काम क्रोध केले घर रिते ॥४॥


श्रीपादबाबांची कीर्तन म्‍हणजे ऐकणा-या बरोबर प्रश्‍नोत्‍तरद्वारे साधलेला संवादच होय.वरील अभंगाला सुरुवात केली तेंव्‍हा त्‍यांनी श्रोत्‍यांना प्रश्‍नांत गुंतविले तुकाराम महाराज आज नाही कां?आहे?ते आजही तुमच्‍या आमच्‍यात आहेत.नव्‍हे नव्‍हे तुम्‍हीच तुकाराम महाराज आहात.मात्र याची तुम्‍हाला जाणीव नाही;मग जाणीव करुन देणारे पाहीजेत.तुमची काही चुक नाही,परंतु सांगणा-यानीच चुकीचे सांगीतले तर तो तुमचा दोष कसा असेल.चांगला विचार केला तर परमार्थ जाणत्‍याने सांगावा की नेणत्‍याने;अहो आपण बाजारात एखादी वस्‍तु आणण्‍यासाठी गेलो तर कीती पारखून,विचारपुस करुन वस्‍तु घेतो.मग परमार्थ करताना असे कां करत नाही.प्रत्‍येक गोष्‍टीला रित असते.लांब लांब आडव्‍या तिडव्‍या उडया मारणारे माकड परंतु त्‍याचपुढे नारळ सोलायला दिला तर आत काहीतरी वाजते आहे पण काय आहे;हे त्‍याला कळत नाही व त्‍याला नारळ सोलून पाणी पीता येत नाही,व खोबरेही खाता येत नाही.पण जर रीत माहीत असली तर,रीतीनेच सर्व गोष्‍टी केल्‍या पाहिजेत ना;मग परमार्थात रीत नसावी का;यावरुन बाबानी एक दृष्‍टांत दिला.एका नवीन लग्‍न झालेल्‍या गृहीनीकडून रात्री झोपताना काडीची पेटी किंवा माचीस चुलीच्‍या खाली राहीले.चुलीजवळच्‍या ओलसरपणामुळे माचीस सादळले,सकाळी त्‍या स्‍त्रीच्‍या पतीला लवकर कामावर जावयाचे असल्‍याने ती सकाळी उठल्‍यावर चुल पेटवण्‍यासाठी माचीसमधील काडी पेटवू लागली.चार पांच काडया ओढल्‍या मात्र त्‍या पेटेनात,हा प्रकार बाजूलाच झोपलेल्‍या तीच्‍या सासूबाईच्‍या लक्षात आला.ती पांघरुनातूनच तीच्‍या सुनेला म्‍हणाली की,अग पोरी,शेजारच्‍या ताईची चुल पेटलेली आहे,त्या चुलीवर माचीस सेकवून आण.हे सांगीतल्‍या प्रमाणे सुनबाईने केल्‍यावर काडया भराभर पेटू लागल्‍या.त्‍याप्रमाणे तुम्‍हीही सादळलेले आहात;त्‍या काडीतील अग्‍नीप्रमाणे तुमच्‍यातील चैतन्‍य अनुभवाला यावे यासाठी तुम्‍हालाही कुणीतरी शेकवण्‍याची गरज आहे.बाबांनी सांगीतले–वरील अभंगातून तुकोबांनी जगण्‍याची व हया नरदेहापासून देवाची ओळख करुन घ्‍यावयाची रित सांगीतली आहे.आपल्‍या वाणीतून जे शब्‍द बाहेर पडतात त्‍यांना फार कींमत आहे.म्‍हणून बोलताना फार विचार करुन बोला.वाचफळ चर्चा करु नका. हया मुखाने काय बोलावे तर- बोलावा विठठल पहावा विठठल । करावा विठठल जीवभाव॥१॥
अशाप्रकारे आपल्‍या सर्व इंद्रीयांना देवाच्‍याच भजनाचे वळण लावावे.इंद्रीयांना सर्व विषयांकडून वळवून त्‍यांना परमेश्‍वराच्‍या ठिकाणी रत करावे.देवाला आपलेसे करताना कसे करावे;तर

मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वाया आनीक पंथा जाशी झणी॥

शेतकी तज्ञ बारीक आकाराच्‍या बीचे झाड खोडापर्यंत तोडतात व मोठया आकाराच्‍या बोरिच्‍या झाडाची फांदी तीथे कलम करुन लावतात.चांगला विचार केला तर,ज्‍या प्रमाणे दोन वेगळया जातीची झाडे (परंतु बोरीचीच)जोडता येतात.मग हया नरदेहाने देव जोडता येऊ नये.वस्‍तूची प्राप्त करुन घेता येवू नये.परंतु सांगणा-यांनाच रित माहित नाही.तेच संभ्रमात आहेत,मग तुम्‍हाला काय सांगणार;(त्‍याच वाघोलीतील श्रीराममंदीरात समर्थांची तसबीर होती,त्‍या तसबीरकडे पाहून बाबा म्‍हणाले)ती तसबीर कोणाची आहे माहिती आहे ना;त्‍या माऊलीच आपल्‍यावर फार उपकार आहेत.समर्थ जेंव्‍हा घळईतून बाहेर येऊन नामस्‍मारणाला बसत तेंव्‍हा तीथे एक घोरपड येऊन बसत असे.तीला वाटे समर्थांना आपल्‍याला काहीतरी सांगायचे आहे.तेव्‍हा तीने एकदा त्‍याबाबत विचारले असता समर्थांनी त्‍या आश्रमात आणले व तीथे त्‍यांचा संवाद झाला.ती घोरपड म्‍हणजे यशवंती की तीच्‍यामुळे हिंदवी स्‍वराज्‍यात कोंडाण्‍यासारखा किल्‍ला घेता आला.यावर बाबा म्‍हणाले की,प्राण्‍यांनाही एखादी गोष्‍ट करण्‍यास प्रवृत्‍त करण्‍यात येते,मग आपण तर माणसे आहोत.तुमच्‍या मध्‍ये कीती पावर आहे,मग त्‍याचा उपयोग करुन देवाची ओळख करुन नको का घ्‍यायला.या नरदेहाने परमेश्‍वर नको कां जोडून घ्‍यायला.परंतु त्‍यासाठी प्रथम इंद्रीयांना वळण लावून घेतले पाहीजे मग ते कोणते तर,
बोलावा विठठल पहावा विठठल । करावा विठठली जीव भावे॥

वाचेने मुखाने त्‍याचेच नांव घ्‍यावे डोळयाने त्‍याचेच रुप पहावे.इंद्रीयांना इतके वळण लावून घ्‍यावे की, जीवभाव विठठल झाला पाहीजे. आणि मग

येणे सोसे मन झाले हावभरी । परत माघारी येत नाही॥

त्या नामामध्‍ये अखंड राहीले असता अष्‍ठसात्‍वीक भाव होतात.बाबा उदाहरण देतात,ज्‍याप्रमाणे यात्रेत माय लेकरांची ताटातूट व्‍हावी व अनेक वेळानंतर जीव कासावीस झाल्‍यानंतर त्‍यांची भेट व्‍हावी बाबा हंसू हंसून रडून दाखवत त्‍यांची कशी अवस्‍था होते.एकमेकाला मिठीत घेऊन ते हमसाहमसी रडतात.मग ते सोंग असते की,लोकांना देखावा असतो,फसवेगीरी असते.श्रोते नकाराचे उत्‍तर देत.बाबा मग हे सर्वजण बाकीचे म्‍हणतात जे खोटे आहे,आणा त्‍यांना समोर,त्‍यांनी समोर यावे मग मी सांगतो काय सांगायचे;माझयावर खटला भरला तरी चालेल त्‍या न्‍यायाधीशाला पण मी सांगेल की हा म्‍हणतो की देव नाही.मग हा कोणाचे सत्‍तेने बोलतो,आहे जज/न्‍यायाधीश तुमचा प्राण तुम्‍ही हालवता की,ते मशीन आहे,बाकीचे म्‍हणतात तो कोण घोटीचा बुआ येतो आणि लोकांना चेटकीचा मंत्र देतो.असे म्‍हणणा-यांनी समोर यावे,आणि‍ एक दिवस तरीअसा येर्इल,बाबा नाते फार महत्‍वाचे आहे,ते कळले पाहीजे.घरी बायकोला आई म्‍हणतो का;तेथे बरे नाते कळते ,मग येथे देवाचे व आपल्‍याबरोबरचे नाते कांय आहे हे का बरे कळत नाही.अहो तुमच्या नाकात जो श्‍वास आहे तो सर्वत्र नाही इथे आहे,अमेरीकेत आहे,चीनमध्‍ये आहे,तुमच्‍या नाकात जे आकाश,प्रकाश व आवाज ते सर्वत्र भरुन राहीलेले आहे.

अणुरेणू या तोकडा । तुका आकाशा एवढा॥

भिमसेन जोशी जो अभंग गातात कां तुम्‍ही नाही आकाशा एवढे;आहात परंतु त्‍याची जाणीव नाही.मग ही जाणीव कोणी करुन दीली पाहीजे,जाणत्‍याने कां नेणत्‍याने,तुमची काही चुक नाही,अंगबळापेक्षा बुध्‍दीचे बळ अधीक असते,परमार्थातही बुध्‍दीचे बळ वापरले पाहीजे.बाबा स्‍वत:चे उदाहरण सांगत त्‍यांना मुलाखतीला प्रश्‍न विचारला एका साहेबांनी,की नदीच्‍या एका बाजून माणूस व शेळी गवत व वाघ यांना घेऊन उभा आहे त्‍याला या तीनही गोष्‍टी घेऊन पलीकडील तीरावर जायचे आहे,तो कसा जाईल;बाबा म्‍हणाले तो प्रथम शेळीला पलीकडे ठेवून येईल.मग गवत येऊन ठेवले व शेळी परत घेऊन येईल.मग वाघास पलीकडे ठेऊन शेळीला परत नेईल.

सारांश - युक्‍तीने कुठलेहीकाम करावो.परमार्थही युक्‍तीने करावा.बुध्‍दी निश्‍चय आत्‍मज्ञान;बुध्‍दी निश्‍चत झाला पाहीजे,तुकाराम,माऊल व इतर अभंग खोडायला कोणी जन्‍मनार नाही,एक माचीसची काडी माझी व माझी राख करायला बास होणार नाही;कीती शक्‍ती आहे या काडीत,नाही म्‍हणायची सोय नाही,ती तर काडी आहे.मग तुमच्‍यात तर चैतन्य आहे,मग नको ते जाणून घ्‍यायला.संत तुकाराम ज्ञानेश्‍वर इत्‍यादी संतानी जाणून घेतले होते.कुठलीही गोष्‍ट जाणून व समजून घेतली पाहीजे.ब्रीटीशी साहेबांच्‍या डोक्‍यात आधी ही रेल्‍वे होती,ते रुळ ते सिग्नल आधी त्‍यांच्‍या टको-यात होते,त्‍या त्‍यांनी कागदावर उतरवल्‍या व त्‍यांनी ही रेल्‍वे त्‍यांच्‍या डोक्‍यातून कागदावर उतरवली व मग रुळावर उतरवली.कुठल्‍याही गोष्‍टीचे प्राप्‍तीवीणा कस्‍ट होत नाही,त्‍यासाठी किंमत मोजावी लागते.एकाला नारळ घ्‍यावयाचा आहेत्यासाठी तो पुण्‍यात दुकानदाराकडे गेला हो नारळ कसा सहा रुपयाला तेंव्‍हा तो ग्रहस्‍थ म्हणाला पांच रुपयाला का नाही,तो दुकानदार म्‍हणजे भाजी बाजारात फळ बाजारात जा मग ते ग्रहस्‍थ तेथे गेल त्‍याला नारळ अजून कमी कींमतीत पाहीजे होता,असे विचारत विचार त्‍याला सांगीतले की,कोकणात जा.मग तो तेथे गेला व विचारले नारळ पाहीजे तर एकाने सांगीतले त्‍या विहीरीजवळ नारळाचे झाड आपले आहे,तुला काय पाहीजे तेवढे घे तो तेथे गेला पण नारळाचे झाड कलले होते विहीरीच्‍या बाजूला व विहीरीच्‍या तळाला एक नाग होता,झाडाला मथमाशाचे मोहळ होते,हो नाराळ काढायला वर चढला नारळाच्‍या झाडाच्‍या शेंडयापाशी गेल्‍यावर खाली विहीरीकडे बघीतले असता त्‍याचे डोळे फीरले व तोल जाऊन तो त्‍या विहीरीतील झाडावर पडला.मग मधमाशा त्‍याला अशा काही चावल्‍या की,फुकट नारळ पाहीजे होतो त्‍याला.सांगायचे कारण एवढे की,मनोमार्गे गेला तो तेथे तेथे मुकला॥हरिपाठी स्थिरावला तोची धन्‍य॥ज्ञानेश्‍वर महाराजांचे शब्‍द खोडायला कोण जन्‍मले नाही जनमणार नाही,देवाच्‍या नामाचा सोस भरला पाहीजे,आणि दुसरी गोष्‍ट मी देह आहे,ही जी अनंत जन्‍मापासून कल्‍पना दृढ झाली आहे हे बंधन तुटले पाहीजे.मी आत्‍मरुप आहे,याचा अनुभव या शिवाय येणार नाही,

तुका म्‍हणे सोडली गाठी । दीली मिठी पायाशी॥

संदेहाच्‍या सुटल्‍या गाठी । झालो पोटी शितळ॥


म्‍हणून महाराज अभंगाच्‍या तीस-या चरणात सांगतात

बंधनापासूनी उकलल्‍या गाठी। देता आली मिठी सावकाश॥

हा चित्‍ताचा विषय आहे महाराज एके ठिकाणी म्‍हणतात

माझे चित्‍त तुझे पाया । मिठी पडली पंढरीराया॥ किंवा

लवण मेळवीता जळे । काय उरलेसे निराळे॥

अशी स्थिती होते.चित्‍त चैतन्‍याने परीपूर्ण भरुन जाते.म्‍हणून महाराज अभंगाच्‍या शेवटच्‍या चरणात सांगतात-
तुका म्‍हणे देह भरीला विठठले । काम क्रोध केलें घर रीते॥

म्‍हणून पांडूरंगाचे भजन करु या.बाबा पुढे विठोबा रखुमाई हे भजन घेतात.वाघोलीतील संपद्राय तडफदार कार्यकर्ते ह.भ.प.गोरखशेठ जाधव बाबांना हार घालातात.ज्‍या माऊलींच्‍या कृपेने ही मांडणी मांडली त्‍याचे भजन करु या.

ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

वेळ जास्‍त झाली तेंव्‍हा ही सेवा पांडूरंगाचे चरणी अर्पण करु या.

जय विठठल जय जय विठठल ।

बाबा विणेक-यांला जवळ बोलावून त्‍याचे दर्शन घेऊन
बोलीली लेकुरी वेडीवाकडी उत्‍तरे

हा अभंग म्‍हणून ज्ञानदेव तुकारामाच्‍या गजरात बाबांचे कीर्तन संपते.