दृष्टांत सागर ३

 
 
 

३१] एवढं शिकुन काय केल?

एक पंधरा सोळा वर्षाचा मुलगा गरीब परिस्थितीमुळे मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे व्‍यवसाय म्‍हणून होडी चालवत. तो होडीत बसणा-या गि-हाईकाची वाट पहात असता एक सॉलिसीटर,एक बॅरीस्‍टर व एक वकील आले.त्‍यांनी त्‍या मुलाला विचारले, आम्‍हाला समुद्रात फेरफटका करण्‍याचे किती पैसे घेणार.प्रत्‍येकी दहा रुपये ठीक म्‍हणून ते तीघे जण समुद्रात होडीचे प्रवासाला सुरुवात केली.त्‍यांनी त्‍या मुलाची विचारपूस केली-बाळ शिकलास किती?त्‍यांने सांगितले की आई वडीलांची परिस्थिती गरीब असल्‍याने शिकता आले नाही.दिवसभर हा धंदा करुन कस-बस कुटुंब चालवतो.शिकला नाही हे ऐकून त्‍या निघांना आपापल्‍या ज्ञानाचा गर्व व श्रीमंतीचा अहंकारामुळे त्‍याचेवर खुप भडकले.मुर्ख,नालायक,बावळट शिकायला वगैरे नको होतं का?आपल्‍या देशात असेच बावळट जन्‍माला आले.त्या मुलाला खूप बोलले.मुलालाही फार वाईट वाटले पण ती आपली गि-हाईक असल्‍याने त्‍याला काही बोलता येईना.
होडी समुद्रात खूप आत आली असता एक भली मोठी समुद्रात लाट येताना दिसली.त्‍या बरोबर मुलाने त्‍या तिघांना विचारयला सुरुवात केली साहेब तुमचं शिक्षण काय?एक म्‍हणे मी बॅरीस्‍टर एक म्‍हणे मी सॉलिसीटर तर एक म्‍हणे मी वकील आहे.मुलगा म्‍हणाला ठीक आहे पण तुम्‍हाला पोहता येत का? ते ते म्‍हणाले नाही,मग ता मुलगा भडकला.कारण समुद्रात आलेल्‍या लाटेपासून बचाव करण्‍यासाठी पोहता येणे गरजेचे आहे.म्‍हणे हे थोबाडवास्‍यांनो एवढं शिकून काय केल?मला पोहता येत नाही मी पोहून काठावर जावू शकतो.तुमचं तुम्‍ही पहां,तेंव्‍हा तिघेही गयावाया करु लागलेम्‍हणे आता तुच काहीतरी कर.असं करु नकोस तेंव्‍हा तो मुलगा म्‍हणाला मगाशी फार ज्ञानाच्‍या गप्‍पा मारत होता.आता करा वकीली,सोडा हुकूम आणि ती लाट तेवढी बाजूला करा.तेव्‍हा ते कसे शक्‍य आहे.तुच काहीतरी कर, त्‍यामुलाला रोजचें जजमेंट असल्‍याने त्‍यांने लाट आल्‍याबरोबर होडी बरोबर तिरकी केली व ती संकटप्राय लाट चुकवून सर्वांचे प्राण वाचवले.

सिध्‍दांत - जीवन समुद्रात जन्‍म व मरणरुपी लाट वचुकवता येत नसेल तर बाकी सर्व गोष्‍टीमध्‍ये निरर्थकता आहे. तात्‍पर्य जन्‍म-मरण टाळण्‍यात जीवनाची सार्थकता आहे.ते टाळता येत नसेल तर कितीही मोठा ज्ञानी,पंडीत,वेदांताचार्य, किर्तन केसरी,प्रवचणकार,वगैरे असेल तर तो काही उपयोगाचा नाही.

प्रमाण - १} तुका म्‍हणे येथे अनुभव प्रमाण । शब्‍दाचे गौरव कामा नये ॥


३२] दिवस आहे तोपर्यंत मुक्‍काम गाठावा

एक शेतकरी होता तो बैलगाडी घेऊन बाजारात गेला त्‍याच्‍याबरोबर त्‍यानेपाळलेला कुत्रा होता सर्वर व्‍यवहार आटोपून तो निघाला.परंतु बाजाराच्‍या गर्दीमुळे कुत्रा मालकापासून चुकला व बाजारातच मालकाला व बैलगाडीला शेधू लागला.मालकानेही बराचवेळ कुत्र्याचा शोध घेतला परंतु कुत्रा काही सापडला नाही. कुत्र्याने ही मालकाचा शोध घेऊन ते शेवटी घराच्‍या रस्‍त्‍याने निघाला.अंधार पडायला सुरुवात झाली म्ह्णून कुत्र्याने घराचा रस्‍ता धरला बाजार दुस-या गांवी असल्‍याने बरीच दुसरी कुत्री त्‍याला रस्‍त्‍याने आडवी व्‍हायची.मात्र कुत्र्याने एक ध्‍येय ठेवले होते, की अंधार पडायच्‍या आंत आपल्‍याला घरी पोहचले पाहीजे,म्हणुनया मरतूकड्या कुत्र्यांच्‍या नादी लागून आपल्‍याला जमायचे नाही.आपले ध्‍येय गाठले पाहीजे.

सिध्‍दांत - परमार्थ करत असताना जर आपण मोक्ष साधन सोडून इतर गोष्‍टीच्‍या साधनाच्‍या म्‍हणजे लौकिक किर्ती,मोठेपणा,इत्‍यादीच्‍या नादी लागलो तर आपल्‍याला मोक्षापर्यंत पोहचण्‍याची गोष्‍ट अपुरी राहते.म्‍हणून परमार्थात योग्‍य दिसेने वाटचाल होण्‍यासाठी या गोष्टींच्‍या मोह पाशात न पडता आपले मुळ साध्‍य यशस्‍वी करायला हवे.त्‍याचप्रमाणे माणव देहाला आल्‍यानंतर जरी कुठलेही संकट आले तरी त्‍याच्‍यावर मात करुन परमार्थ साधलाच पाहीले व नरदेहाचे सार्थ केले पाहीजे.

प्रमाण - भवनदीचे पाणी गड्या रे भलतेच ओढीते । भले भले पोहणार आसडूनओढून पाडीते ॥


(३३) केलें म्‍हणजे होतं

एक व्‍यवसायाने वकिल पेशा करणारे जोडप होत.दोघेही कोर्टातून घरी आल्‍यानंतर तो म्‍हणायचा आज अशी केस जिंकली,तसी केस जिंकली,आज असं झाल, तसं झालं. परंतु ती म्‍हणायची,त्‍यात काय मोठं केलं म्‍हणजे होंत आणि रोज रोज अस चालल्‍यानंतर तो मोठया फुशारकीने सांगायचा आणि ती म्‍हणायची, त्‍यात काय मोठं केल म्‍हणजे होंत परंतु त्‍यामुळे त्‍याला खुप राग आला व त्‍याच टोकाची भांडणे होऊन दोघेही वकील असल्‍यामुळे वगेच फारकत घेवून मोकळे झाले. मग साहेब मुंबईला तर बाईसाहेब नागपूरला. नागपूर येथे एक सर्कस आली होती व त्‍या सर्कसीमध्‍ये एक वकील महीला सल्‍लागार हवी होती.बाईसाहेबांनी जाहीरात वाचली व त्‍या ठिकाणी सर्कसमध्‍ये रजू झाल्‍या.त्‍या सर्कसमध्‍ये एक हत्‍तीन व्‍याली होती.बाईसाहेबानी ते एक दिवसाचे पिल्‍लू उचलून खांद्यावर घेतल.अशा रीतेने रोज सकाळ,दुपार,संध्‍याकाळ ते पिल्‍लू ती उचलू लागली.ते पिल्‍ल्‍ूा दोन वर्षाचे मोठे झाले.काही दिवसांनी ती सर्कस मुंबई येथे आली,पोस्‍टर झळकू लागली की, बाई हत्‍ती उचलते आणि हे पोस्‍टर वकील साहेबाने पाहीले.त्‍याला आश्‍चर्य वाटले मुद्याम फर्स्‍ट क्‍लासचं तिकीट काढून सर्कसला पुढच्‍या शीटवर बसले.सर्कस चालू झाली,बाईसाहेबांनी डोळयावर गॉगल घातला होता. आणि तोच प्रयोग सुरु झाला बाइने हत्‍ती उचलेला पाहून साहेबांनी टाळी वाजवली.
अशा पध्‍दतीने खेळ पूर्ण झाल्‍यानंतर साहेबांनी मॅनेजरची भेट घेतली व बाईसाहेबांचे अभिनंदन करायच ठरवलं. मॅनेजर साहेबांना घेवून साहेबांकडे गेला परंतु बाईसाहेबांनी डोळयावर गॉगल घातल्‍यामुळे साहेबांनी तीला ओळखले नाही.साहेबांनी अभिनंदन केलं असता बाईसाहेब नेहमीप्रमाणे म्‍हटल्‍या,त्‍यात काय अवघड केलं म्‍हणजे होतं.हे ऐकल्‍याबरोबर साहेब म्‍हटले आमची ही बी असंच म्‍हणायची आणि तेवढण्‍यात बाईसाहेबांनी गॉगल काढला व म्‍हटले,अरे तु होय.मग ही खरी वस्‍तुस्थिती एकमेकांना कळली व दोघांनी एकमकांची माफी मागितली.

सिध्‍दांत - केल्‍याने होत आहे रे आधी केलेच पाहीजे.प्रयत्‍नाने अशक्‍य गोष्‍टी ही साध्‍य होता.म्‍हणून प्रयत्‍नच सर्वश्रेष्‍ठ आहे.

प्रमाण - १} असाध्‍य ते साध्‍य करिता सायास । कारण अभ्‍यास तुका म्‍हणे ॥


३४] जाणून कर्म करणे आवश्यक

एक ब‍हिर ससाणा नावाचा पक्षी आकाशात उंच जातो नदीच्‍या किंवा सरोवराच्‍या वर एका जागी आकाशात स्थिर होऊन खाली पाण्‍यामध्‍ये झोपलेला मासा कोणता व जागा मासा कोणता हे बरोबर हेरतो म्‍हणजेच संधान साधतो. त्‍याबरोबर पाण्‍याकडे झेप घेतो म्‍हणजे विंदान करतो व पाण्‍यात बुडी मारली की स्‍नान आणि चोचीत मासा पकडून काठावर आला की लगेच भोजन. म्‍हणजे एकाच वेळेस संधान,विंदान,स्‍नान व भोजन या चार क्रिया करतो.
ही त्‍याची क्रिया एका कावळ्याने पाहिली व त्‍या कावडयाला वाटलं हा बघा किती मस्‍तपैकी मासे पकडून खातोय.आपण इतके दिवस खरकटं व विष्‍ठा खावूनच मेलो.मग त्‍याने जसं केलं तसचं आपण का करु नये, म्‍हणून तो कावळा उंच आकाशात उडाला व त्‍या ससाण्‍यासारखे एका जागेवर स्थिर होऊन लफडंग लफडंग करु लागला.पण तो काय करतो हे कावळयाला माहित नसल्‍यामुळे त्‍याने केली तशी कृती करायला जातो आणि उंच आकाशातून पाण्‍यात अंग टाकून देतो.पाण्‍यात नेमकं खडक खालून वर आलेला असतो त्‍याच्‍यावर जाऊन आपटतो व मान वाकडी होते.पाण्‍यातून कसाबसा वर येण्‍याचा प्रयत्‍न करतो,तोच शेवाळात त्‍याची मान अडकते त्‍यामुळे त्‍याला वरतीही येत येईना.

सिध्‍दांत - आम्‍ही जो परमार्थ करतो तो फक्‍त दुस-याचे पाहून,कशाकरता करावयाचे हेच माहित नसते.समोरचा देव देव करतो म्‍हणून आम्ही करतो,समोरचा कां करतो आणि आम्‍ही कां करतो हे कळत नाही.

प्रमाण - १} जानत नही बुझत नही देखत काम करते हो । शेवल में तो मुंढी अटकी अब क्‍युं फडफड करते हो ॥ (संत कबीर)
२} जाणे भक्‍तीचा जिव्‍हाळा । तोची दैवाचा पुतळा ॥ (संत तुकाराम)


३५] सर्वांचे अधिष्‍ठान एक

ब्रम्‍हलीन श्रीपाद बाबा म्‍हणायचे बोला पाहुणे गणपतीचं वाहन काय?तर उंदीर.त्‍या उंदराला मांजर फस्‍त करते.मग सांगा पाहुणं गणपती मोठा का मांजर मोठे.अधिष्‍ठान पाहिलं तर गणपती,उंदीर व मांजर हे तिघेही एक किंवा एक आहेत.पण कर्म मात्र वेगवेगळे आहे,कर्माच्‍या बाजून पाहिलं तर गणपती हा देव,उंदीर हे त्‍याचे वाहन व उंदीर त्‍या माजराचा आहार आहे.कर्माप्रमाणे हे असं कमी जासत असणारच आहे.परंतु तिघांचेही अधिष्‍ठान एकच हे विसरुन चालनार नाही.

सिध्‍दांत - नाही अधिष्‍ठानाच्‍या बाजूने सर्वर सारखेच आहेत तिथे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. कोणी श्रेष्‍ठ नाही,कोणी कनिष्‍ठ नाही तर सर्वांची योग्‍यता एकच आहे.

प्रमाण - १} जिसकी उसकी टेक । सबकी निशाणी एक ॥
२} आदी ब्रह्मा अंती मशक । सर्वांच्‍या ठाई मीची एक ॥
ऐसे पाहे तो सभाग्‍य देख । हे भजन चोख मत्‍प्राप्‍ती ॥ (गवत)
३} ज्ञानदेवा प्रमाणे आत्‍मा हा निधान । सर्वाघटी पूर्ण एक नांदे ॥(ज्ञानेश्‍वर महाराज)


३६] जीवाला विषयाचीच गोडी वाटते

हे पहा पाहुणे,या ठिकाणी जर आता विंचू निघाला,त्‍याला म्‍हटले नांगी सरळ कर तो करेल का । जाऊ द्या,आपल्‍या मुख्‍यमंत्रयाने जरी नांगी सरळ करायला सांगितली तरी तो करणार नाही. विंचू ज्‍याला चावला त्‍याला गुदगुदल्‍या होतात का. ज्‍याला चावला त्‍यालाच माहिती. आहा हा हा किती विषारी. विंचवाने भांडयाला जर डंक मारला तर बोळ पडते. एवढा विषारी आहे. तला कोणीही सांगितले नांगी सरळ कर तर तो करणार नाही. पण देवाने येथे एक एकाहून बळी निर्माण केले, तोच विंचू पाल पाहिली की लगेच नांगी सरळ करतो.कारण ती पाल त्‍याला अख्‍खा गटट करते. मग पालीलाही अभिमान झाला. एक पट विंचवाच विष पचायला दोन पट पाल. परंतु तीलाही अभिमान झाला,तर देवाने तिसरा प्राणी तयार केला कोंबडूबाई. ती कोंबूडबाई त्‍या पालीला आख्‍खी खाते. तीन पट पालीचं विष पचवायला सहा पट कोंबडीमध्‍ये विष आहे. ती कोंबडी दिवसभर उकरते परंतू पोट काय भरत नाही, हे लहान लहान मुले रस्‍त्‍याच्‍या कडेला बसतात. पहि त्‍याच्‍यावर ताव मारते आणि अशी विषारी असणारी कोंबडी पचवायला किती पट विष पाहिजे. आणि त्‍या कोंबडीलाही अभिमान झाला तर देवाने पहा ना ती कोंबडी कोण खातं. या देशातले सुशीक्षित विचारंत अशी विषारी कोंबडी खातात. सांगा पाव्‍हणे किती विषारी असतील व म्‍हणून तर या ठिकाणी मेळ बसत नाही.

सिध्‍दांत - काय खावं आणि काय खाऊ नये. काय प्‍यावं आणि काय पिऊ नये हे सुध्‍दा आम्‍हाला कळत नाही. इतके आम्‍ही विषयाधीन झालो. म्‍हणून तर देवाचा संबंध आम्‍हाला कळत नाही. मनुष्‍य म्‍हणून जन्‍माला येऊन सुध्‍दा आम्‍ही माणसासारखे वागत नाही.

प्रमाण - १} विषय ओढी भुलले जीव । कोण करीत त्‍यांची कीव । न उपजे नारायणी भाव । पावोनी ठाव नरदेह ॥ तु ॥
२} वेदे न करीता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्‍वभावे सकळ जना । अनिवार्य ॥ भागवत॥

३७] तुम्‍ही फक्‍त सादळेल आहात

पावसाळयाचे दिवस होते, ग्रामीण विभागात चुल पेटवण्‍यासाठी माचिसचा वापर होते. असेच एका ताईकडून पावसाळयाच्‍या दिवसात काडीपेटी खालू जमिनीवर राहून गेली. सकाळी मालकाला लवकर पुण्‍याला जायचे होते. म्‍हणून मालक तिला पहाटे लवकर उठवतात व म्‍हणतात उरक, मला पाणी ठेव लवकर. त्‍यावर ती ताइ उठून चूल पेटवण्‍यास जाते. एक एक करुन काडया उगाळते, परंतु काडयाकाही उगळत नाही. कंटाळून जाते. इकडे म्‍हातारी अंथरुणातच झोपलेली असते. म्‍हातारीला लगेच अंदाज लागला व म्‍हातारी सुनेला म्‍हणते बाई पेटी सादळून गेली आहे. शेजारच्‍या ताईची चुल पेटलेली असेल,तिथे नेवून काडीपेटी शेकून आण. शेकून आणल्‍यावर काडया भराभर उगळतात ना । तसेच तुम्‍ही बी फक्‍त सादळेल आहात. तुम्‍हाला बी शेकुन काढलं तर तुम्‍ही भराभर उगळालं.

सिध्‍दांत - ज्‍याप्रमाणे काडया ओल्‍यामुळे सादळल्‍यात तसेच तुम्‍ही ही मायेच्‍या ओलाव्‍यामुळे फक्‍त सदळलेले आहात. तुम्‍हालाही ज्ञानाग्‍नीने जर शेकवलं तर तुम्‍ही ही भराभर मोकळे व्‍हाल.

प्रमाण - १}वैराग्‍याच्‍या शेणी लागल्‍या शरीरा । ज्ञानाग्‍नी चेतवीला ब्रह्मत्‍वेशी ॥ दिली तिलांजली कुळनाम रुपाशी । शरीर ज्‍याचे त्‍याशी समर्पिले ॥ तुकाराम महाराज॥


(३८) जिथे चावला तिथे लाव

एक म्‍हातारी होती, तिला एक मुलगा होता व तो थोडा भोळसट होता. तो मोठा झाल्‍यावर म्‍हातारीने त्‍याचे लग्‍न केले. संसार करु लागले, शेतकरी कुटुंबातील असल्‍याने असेच एक दिवस सासू त्‍या सुनेला आपली गाय गोठयात बांधायला सागते. तेंव्‍हा ती सुन गाय बांधण्‍यासाठी गोठयात खुंटीजवळ जाते. त्‍या खुंटीजवळ विंचू असल्‍याने तो सुनेला चावला. ती मोठमोठयाने आरडाओरडा करुन सांगू लागली मला विंचू चावला. तीचा मालक तातडीने डॉक्‍टरांकडे जावून औषध घेऊन आला. डॉक्‍टरांनी सांगतल्‍या प्रमाणे जीथे चावला तिथे औषध लावावयास सांगीतले असता ते दोघे ज्‍या ठिकाणी विंचू होता त्‍या ठिकाणीते औषध लावू लागले. सांगा पाव्‍हुन आता तीच्‍या वेदना केंव्हा कमी होतील । आपले पण असेच चालले आहे.

सिध्‍दांत - वास्‍तविक साधुसंत सांगतात एक व आम्‍ही समजतो भलतेच. साधू संताने बरोबर सांगितले आहे. पण संताना जे सांगावयाच ते आम्‍हाला समजतच नाही आणि म्‍हणून कदाचित साधन बरोबर असून सुध्‍दा आम्‍हाला त्‍याचा फायदा होत नाही किवा साधन मिळूनही अशा पध्‍दतीने ते वायाच जात आहे. म्‍हणून संताचे जे मनोगत आहे ते बरोबर आत्‍मसात झाले पाहीजे त्यात थोडी सुध्‍दा कमतरता उपयोगाची नाही. औषध मिळनही जर वापर कळाला नाही तर औषध प्राप्‍त होऊन उपयोग नाही.

प्रमाण - १} तैसे तोंडी ब्रह्मनाम । हाती ते सात्‍वीक कर्म । विनियोगेविण काम । विफळ होय ॥ ज्ञानेश्‍वरी ॥