संत एकनाथ महाराज हरिपाठ निरुपण २

 
 
 

पुराणि‍दकांतून परमात्‍म्‍याचे जेथे विशेष अधिस्‍ठान असते अशी काही स्‍थाने सांगीतली आहेत.श्रीमद्भभागवत विष्‍णुपुराण इत्‍यादि ग्रंथातून भगवंताचा वैकुंठलोक आहे,व तो सप्‍तावरणाबाहेर आहे.फार दिव्‍य आहे असे त्‍याचे विशेष वर्णन केले आहे.नाथभागवत अध्‍याय चोवीसमध्‍येही हे वर्णन आढळते.चतु:श्‍लोकी भागवतावरील आपल्‍या टीकेत श्री नाथमहाराजांनी वैकुंठलोकाचे विस्‍तृत वर्णन केले आहे.तसेच शिवभक्‍तांना कैलासलोक प्राप्‍ती होत,असे शैव पुराणातून प्रतिपादिले आहे. त्‍या कैलासलोकाचेही वर्णन श्री नाथमहाराजानी केले आहे.
भागवत एकादंश स्‍कंध अध्‍याय चोवीसात योग,तप,संन्यासादि साधनांनी प्राप्‍त होणा-या महर्लोक,जनोलोक,तपोलोकादिकांचे वर्णन केलेआहे.हे परलोक म्‍हले जातात.कित्‍येक धार्मीक वृत्‍तीचे लोक देव प्राप्‍तीकरिता तीर्थक्षेादिकांना यात्रा करत असतात.अशी तीर्थक्षेत्रे भारतात अनंत आहेत.पुराणांतूनही त्‍यांची विस्‍तृत माहिती मिळते.सप्‍तपु-या चारधाम,द्वादश जो तिर्लींगे,शक्‍तीपीठे,अष्‍टि‍वनायकांची स्‍थाने व इतरही पुष्‍कळच तीर्थक्षेत्रे आहेत.महाभारत वनपर्व,पद्मपुराण खंड सहावा तसेच
उत्‍तराखंड इत्‍यादिकांतून अपेक तीर्थांची स्‍थाने सांगितली आहेत.तेथे तेथे त्‍या त्‍या देवांचे वास्‍तव्‍य आहे असे मानून कित्‍येक भाविक सतत यात्रा करीत असतात.वैकुंठादिकांत किंवा तीर्थक्षेत्रात देव आहे, इतरत्र नाही असा यांचा अर्थ नाही.तसे पाहिले तर देव एकदेशी होईल, तो परिच्छिन्‍न मर्यादित होईल,पण तसा तो नाही.महाराज म्‍हणतात तयाविण ठावरिता कोठे ॥हरि व्‍यापक कसा आहे,याचा मागील अभंगातून विचार झालाच आहे.हरिभक्‍त,वैष्‍णव यांची हरिविषयक हीच भावना असते. तिस-या कडव्‍यात श्रीनाथमहाराज म्‍हणतात --
वैष्‍णवांचे गुहय मोक्षाचा एकांत । अनंतासी अंत पाहतां नाही ॥
अशा व्‍यापक रुपाने हरीस जाणणे,व सर्वात्‍मभावाने त्‍याची भक्‍ती करणे,हेच वैष्‍णवांचे अर्थात वैष्‍णव धमाचे गुहय म्‍हणजे रहस्‍य आहे. संत तुकाराम महाराज वैष्‍णव धर्माच स्‍वरुप ‍विष्‍णुमय जग वैष्‍णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ असे व्‍यापक सांगितले आहे.ज्ञानेश्‍वर महाराज हरीपाठात वीसाव्‍या अभंगात हेच सांगतात – नामसंकीर्तन वैष्‍णवांची जोडी । ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या अनंक अभंगातून वैष्‍णवांची लक्षणे आली आहेत.
सतत कृष्‍णमूर्ति सावळी । खेळे ज्‍याचे –हदयकमळीं ।
शांती क्षमा तया जवळी । जीव भावे अनुसरल्‍या ॥

अशा व्‍यापक रुपाने हरीची भक्‍ती करणे हेच वैष्‍णवांचे गुहय आहे.तसेच हे हरीचे ज्ञान हाच मोक्षाचाही एकांत म्‍हणजे एक निश्‍चय आहे.अंत शब्‍दाचे निश्‍चय व नाश असे दोन अर्थ आहेत.एकांत म्‍हणजे एकत्‍वाचा निश्‍चय.मोक्ष ही एक जीवनाची अंतिम स्थिध्‍दी आहे ती द्वैता विवर्जित अवस्‍था आहे.जीव,जगत,परमात्‍मा यांच्‍यातील जो भेद प्रतीत होतो तो कल्पित आहे.मागे ही कल्पना स्‍वरुपज्ञानाने नष्‍ट होते.म्‍हणजेच मोक्ष प्राप्‍त होतो.मोक्ष हा परमात्‍मस्‍वरुपच मानला जातो.जर मोक्षात भेद मानला,तर मोक्षात वस्‍तूपरिच्‍छेद म्‍हणजे सांतत्‍व मानले जाईल. मोक्षअनित्‍य होईल.मोक्षवाद्यांनी मोक्ष नित्‍यच मानला आहे.मोक्ष परमात्‍मस्‍वरुपाहून अभिन्‍न मानला व सांत मानला,तर परमात्‍माही सांतच होईल.पण तो अनंत म्‍हटला
आहे.म्हणून महाराज सांगतात –अनंतासी अंत पाहता नाही ॥ अंत शब्‍दाचा अर्थ नाश असाही होतो.जगात दोन प्रकारच्‍या वस्‍तू असून एक नाशवार व दुसरी नाशरहीत आहे्.नाशाचे तीन प्रकार स्‍वत:,परत:व आश्रय होत.वेदांत शास्‍त्रात नाशाचा देशत:,कालत:व वस्‍तुत:हे प्रकार सांगीतले आहेत.सर्व जग हे परमात्‍मस्‍वरुपाहून भिन्‍न राहू शकत नाही,म्‍हणून त्‍यांस वस्‍तू पि‍रच्‍छेद म्‍हणजे अंत नाही.
आदि मध्‍य अंती अवघा हरि एक । एकचि अनेक एक हरि ॥
ज्‍या त्‍याचे अर्थी विश्‍व हे कार्य आहे,त्‍याअर्थी कारण कोणीतरी पाहिजे.हे मानावे लागते.कारण हे कार्यापेक्षा अधिक व्‍यापक तसेच कार्याच्‍या तिन्‍ही म्‍हणजे उत्‍पत्ति,स्थिती व अंत या अवस्‍थेत त्‍याची उपस्थिती अवश्‍य असते.वेदांशास्‍त्रात कारणाचे निमित्‍तकारण व उपादानकारण असे दोन भेद सांगितले आहेत.परमात्‍मा हरी हाच या जगाचे मायेचा अंगिकार करुन म्‍हणजे माया विशिष्‍ट होतो,त्‍यावेळी त्‍या तम:प्रदान प्रकृत्‍तीच्‍या द्वारे उपादन व त्‍याच मायेच्‍या सत्‍वगुणाने युक्‍त होउुन इच्‍छज्ञ,ज्ञान,क्रियाद्वारा निमित्‍त बनून सर्व विश्‍वाची उत्‍पत्ति करतो.श्रीज्ञानेश्‍वरी अध्‍याय ७,९,१३,१४व २५ मध्‍ये हीच उपपत्ती श्रीकृष्‍णांनी अर्जुंनांस सांगितली आहे.श्रीनाथमहाराजांनी आपल्‍या भागवताच्‍या एकादश स्‍कंधावरील टीकेत अनेक ठिकाणी विस्‍ताराने याच गोष्‍टीचा केला आहे.श्रुतीचा हाच सिध्‍दांत अनेक उपनिषदातून सांगितला आहे.
यतो वा इमानि भूतानि जायन्‍ते । येन जातानि जीवन्ति ।
यत्‍प्रयन्‍त्‍यि‍भसं विशन्‍तीति । तद्ब्रम्‍ह । (श्रुति)

ज्‍या परब्रम्‍हापासून ही भूते उत्‍पन्‍नसो होतात,ज्‍याच्‍यामुळेच म्‍हणजे ज्‍याच्‍या ठिकाणी जगतात व ज्याच्‍यातच शेवटी लीन होतात त्‍या आदिकारणासय परब्रम्‍ह म्‍हणतात.श्रीज्ञानेश्‍वर महाराजांनी आपल्‍या हरीपाठांमध्‍ये एका वाक्‍यात हीच गोष्‍ठ सांगितली आहे.‘जेथुनि चराचर हरिसी भजे ।‘हा एकच पण आपल्‍या सामर्थ्‍याने तो अनेक बनतो.श्री निळोबाराय एका अभंगात म्‍हणतात.
की एकटाचि असोनि एकला । विश्‍वीं विश्‍वाकार होवोनिया ठेला । जयापरी वो तैसाची गमला । नंदनंदन हा अचोज अंबुला तवो ॥‘
मात्र त्‍याच्‍या एकत्‍वात बाध येत नाही.उदकावर कितीही तरंग निर्माण झाले व सुवर्णाचे कितीही अलंकार झाले,तरी मूळ उदक व सोने यात भेद होत नाही.श्रीज्ञानेश्‍वर महाराज चांगदेवास बोध करतांना सांगतात,
‘सोनें सोनेपणा उणें । न होता झाले लेणें ।
तेवी न वेचतां जग होणें । अंगे जया ॥ चांगदेव पासष्‍ठी

वेदांदशास्‍त्र दृष्‍टीने हरी हा एकच तो अनेक झाला तरी पुन्‍हा तो एकरुपच आहे.हे सिध्द होत असले तरी त्‍याचा अनुभव आला तरच खरे;नसता ते केवळ शब्‍दज्ञान आहे. ‘एकाकार झाले जीव शिव दोन्‍ही । एका जनार्दनी ऐसें केलें ॥‘ माझ्या सद्गुरुंनी माझ्या ठिकाणी जीव व शिवाचे ऐक्‍य घडवून आणले.तत्‍वमस्‍यादि श्रुतिवाक्‍यावरुन जीव व ईश्‍वराचे ऐक्‍य सिध्‍द आहे. तरी अनादि अज्ञानाने यांचा भेदच अनुभवास येत असतो.सामान्‍यांनीच नव्‍हे तर मोठमोठया दर्शनकारांनीही भेदच सिध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.उपि‍नषदे,गीता,ब्रम्‍हसूत्रे यांचे तात्‍पर्य जीव शिवाच्‍या अभेद प्रतिपादनातच आहे.तसेंच श्रीज्ञानेश्‍वर महाराजांनीही आपल्‍या सर्वर ग्रंथांतून, अभंगातून अद्वैत प्रतिपादिले आहे.अनादि अज्ञान व तत्‍कार्य द्वैतबुध्‍दीच्‍या संस्‍कारामुळे जीवईश्‍वराचा भेद आहे असे वाटते,पण तो भेद खरा नाही.भेद सत्‍य मानला तर मागील चरणांतील हरीचे एकत्‍व सिध्‍द होणार नाही.ही भेद कल्‍पना नष्‍ट होऊन,अद्वैतानुभूति प्राप्‍त होण्‍यास ब्रम्‍हनिष्‍ठ सद्गुरुची कृपा पाहिजे.ज्ञानेश्‍वर महाराज म्‍हणतात
‘पै सत्‍वशुधि सहाकारें । गुरुकृपामृत तुषारें ।
सासिन्‍नलेनि वोसरे । द्वैतदैन्‍य ॥‘ (ज्ञानेश्‍वरी)

ब्रम्‍हचैतन्‍य हे एकमेव अद्वितीय आहे तरी अनादि मायाशक्‍तीमुळे जीवेश विभाग पडला. या विषयाचा विशेष विचार पुढे अभंग पंथरात ‘कल्‍पना अविद्या येणें झाला जीव । मायोपाधि शीव बोलताती ॥ यावर सविस्‍तर होईल.हे अज्ञान आत्‍म्‍याच्‍या अपरोक्षज्ञानानेच दूर होते.तो अपरोक्षबोध गुरु देतात. आणि मग
‘जीव परमात्‍मा दोनी । बैसले एकासनीं ।
जयाच्‍या ह्र्दयभुवनी । विराजती ॥‘ (ज्ञानेश्‍वरी १२-१५३)

जीव शीव यांच्‍या ऐक्‍याचा अपरोक्षानुभव प्राप्‍त होतो.हीच स्थिती वेदांतशास्‍त्रात पूर्णावस्‍था म्‍हटली जाते.या बोधाने ‘हदयग्रंथी भेद, संशयच्‍छेद, कर्मक्षय, शोकतरण, मृत्‍युल्‍लंघन,सर्वबंध निवृत्‍ती इत्‍यादी महत्‍वाच्‍या भूमिका प्राप्‍त होतात.जीवदशा बाधित होऊन ‘सच्चिदानंद ब्रम्‍ह’ ते ‘मी’ या बोधावर तो साधक येतो. शब्‍दपर निष्‍णात सदगुरु त्‍यास या बोधावर आणून सोडतात.‘माझे सद्गुरु श्रीजनार्दनस्‍वामींनी मला या भूमिकेवर आणून सोडले.
एकनाथ महाराज म्‍हणतात एकाकार झाले जीवशिव दोन्‍ही । एका जनार्दनीं ऐसे केलें ॥


अभंग पाचवा

नामाविण मुख सर्पाचे ते बीळ । जिव्‍हा नव्‍हे काळ सर्प आहे महत्‍वाचा विषय विधीमुखाने व निधमुखाने पदवून देण्‍याचीशास्‍त्रकारांची व संतांची पध्‍दत असते.नामस्‍मरणाचे फल किती श्रेष्‍ठ आहे याचा विचार मागील अभंगातून झाला.नाम हे पुरुषार्थप्रद आहे.व तेथे सुखाची विश्रांती आहे.नामस्‍मरण साधनाचरणात धन्‍यता आहे.अशा महत्‍वपूर्ण भोषत नाममहात्‍म्‍य कथन केलें आहे. असे असूनही ब हिर्मुख पामरांना नाम आवडत नाही.वास्‍तविक मनुष्‍य देह मुळातच भक्‍तीसाठी असल्‍याने अखंड भगवन्‍नामच घेतले पाहिजे.त्‍यातच त्‍याची पार्थकता आहे.असे असताही ज्‍या पाप्‍याला हे न आवडता पापाचरणच पिय वाटते त्‍यांना नाथमहाराज नामाविण मुख सर्पाचे ते बीळ । सर्व पुराणादिकांतून व संतानी ही भाषा वापरली आहे. ज्‍या पवित्र मुखाने अखंड हरिनाम घेण्‍यात जीवनाची सार्थकता आहे,हे जर होत नसेल तर अभद्र वाचा वापरुन पापाचीच निर्मिती करते व जीवनाचा सर्वनाश करते.श्रीमतदभागवत द्वितीय स्‍कंध अध्‍याय ३ च्‍या २४ वे श्‍लोकात श्रीशुकाचार्यांनीही अशीच भाषा वापरली आहे.
बिले बतोरुक्रमि‍वक्रमान ये न श्रृण्‍वत:कर्णपुटे परस्‍य । जिव्‍हा सती दार्दुरिकेव सूत न चोपगायत्‍युरुगायगाथा: ॥
जो मानव सर्वशक्‍तीमान परमेश्‍वराचे पराक्रम श्रवण करत नाही त्‍याचे कान म्‍हाजे केवळ दोन बिळेच आहेत,ज्‍यात सर्प इ.राहतात.तसेच जी जीभ त्‍या अतुलकीर्ती परमात्‍म्‍याच्‍या चरित्राचे गायन करत नाही, ती दुष्‍ट असुन बेडकाच्‍या जीभेसारख वृथा ओरडणारी होय. भगवान श्रीकृष्‍ण उध्‍दवास म्‍हणतात – रामनामेवीण जे तांड । तें जाणावें चर्मकुंड । भीतरी जिव्‍हा तें चामखंड । असत्‍यकाट काटली ॥ हो का हरिनामेविण जे वाणी । ते गलित कुष्‍टें जाली कोढिणी । असत्‍य कुष्‍टांचे गळे पणी । उठी पोहणी निंदेची ॥ ऐसिये वाचेसी रोकडे । पडती अधर्माचे किडे । सुळबुळीत चहूकडे । मागेपुढे वळवळीत ॥ ते वाचेची दुर्गंधी मज ही न साहावे त्रिशुध्‍दी । हे वाचां वाहे तो दुर्बुध्दि । अनर्थसिध्दि अति दु:ख ॥ संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी अ.१३ मध्‍ये सांगतल्‍याप्रमाणे – विरोधु वाद बळू । प्राणिताप ढाळू । उपहास छळू । वर्मस्‍पर्श ॥ आटु वेगु विंदाण । आशा शंका प्रतरण । म्हणजेच विरोधीभाषा वापरणे,तंटयास उत्‍तेजन देणे,प्राणिमात्रास त्रास,ताप होईल असे बोलणे,टर उडि‍वणे,टाकून बोलणे,वर्मास झोंबणारे शब्‍द वापरणे,हटट आवशे कपट आशा लावणे संशयात पाडणे,वंचना करणे,इत्‍यादि अशी भाषा बोलणारी जिव्‍हा ही स्‍परनाश करणारी असते. म्‍हणून तिला जिव्‍हा नव्‍हे काळसर्प आहे ॥ असे म्‍हणतात. दुस-या चरणात पुन्‍हा हेच सागतात अशी जी वाचातिला वाचा म्‍हणून नये ती एक लाव हडळ (एक पिशाच्‍चजात) आहे.ती तामस योनी असल्‍याने ती दिसेल त्‍याला त्रास देते. नाथभागवतात नाथमहाराज म्‍हणतात तें माझे जन्‍म नाम कीर्तन गुण । जे वाचेसी नाही पठण । ते वाचा पिशाचिका जाण । वृथालापन वटवटी ॥