माझं सद्गुरु केरोबा महाराज हे शिरुर भालगांवचे पाथर्डी तालुका जिल्हा अहमदनगर एकदा केरोबाबाबा व मी बाबांचा टांगा घेऊन कीर्तनाला चाललो होतो.बराच अंतर प्रवास केल्यावर टांग्याचा एक घोडा ठोकर लागून पडला व जागीच खलास झाला.आम्हाला तर अजुन बरच लांब जायचं होतं.बाबा म्हटले दोन कि.मी.वर एक गांव आहे.भाऊसाहेब तिथपर्यंत जर टांगा गेला तर तिथे एक शेठजी आहेत.त्यांचा मोठा तबेला पण आहे,त्यांच्याकडून तात्पुरता एक घोडा मिळेल.मी बाबांना टांग्यात बसवलं त्या घोड्याची जागा मी घेतली त्या गावापर्यंत टांगा ओढत आणला.शेठजींनी आमचं आदरातिथ्य तर केलच शिवाय माझ्या कृतीवर प्रसन्न होऊन एक अस्सल कोठेवाडी घोडा आम्हाला भेटच देऊन टाकला.मग आम्ही टांगा जुंपून पुढे गेलो.तात्पर्य जगाचा मालक सुध्दा तुमची सेवा पाहून प्रसन्न होतोच व तुम्हाला सुध्दा मदत करतोच,पण आपलं लक्ष्यच नसतं.
खरेदी विक्री संघात डयुटीवर असतानाची गोष्ट.यशवंतराव चव्हाण व्हिजीटला आले होते.रात्री आठ वाजता आले.मी गोडाऊन डघडलं.त्यांनी तपासणी केली,रजिस्टरनुसार गोडाऊन मध्ये मालं आहे का पाहीला.चहापाणी झाला.निघाल्यावर मी व्हिजीट बुक पुढं केलं.सही करायची राहीली साहेब.ते म्हणे सही नाही करणार,मी म्हटलं साहेब सही करावी लागेलं.ऑफीस टाईमच्या व्यती रिक्त मी आपापल्या गोडाऊन उघडून दिलय.ते म्हणे,ही स्पेशल चेकींग आहे.मी म्हटलं हरकत नाही.मी माझी डयुटी केली की नाही.मग नियमानुसार तुम्ही व्हिजीट बुकवर सही करा.ते म्हणे,मला ओळखलं मी कोण आहे ते.नाही सही केली तर काय करशील?मी म्हटलं,काम सरकारी अन दावा खाजगी कशाला?मी काही तुमचा नोकरी नाही कधी बी गोडाउन उघडून द्यायला.सही करा पहीली.तसं तुम्हाला जाताच येणार नाही.साहेबांनी सही केली व पाठीवर थाप मारली.अशीच कर्तव्यदक्ष माणसं आमला पाहीजेत.कधी काहीही प्रॉब्लेम आला तर मला सांगा.मी आपली परिक्षा पाहीली.मीच गल्लत काम करत नाही, तर तुस-याला कसं प्रवृत्त करीत? ते सहका-यांना सांगायचे,घोटीला माझे भाऊसाहेब नावाचे मित्र आहेत.
अकबर बादशहाच्या दरबारात जी नवरत्न होती त्यात तानसेन नावाचा गायक होता.खूप प्रसीध्द होता.मीराबाईनं त्याला आपल्या घरी मेजवानीसाठी बोलवलं.संध्याकाळच्या वेळी त्याच गायन आयोजीत केलं.दीपराग आळवला तर दिवे लागले.मेध मल्हार राग आळवला तर पाऊस पाडला.वा वा बहुत अच्छा मिराबाईनं प्रशंशा केली.
आप भी कुछ सुनाइए,तानसेन म्हटला.मीराबाईनं आपला तंबोरा घेतला.समोर कृष्णाची मूर्ती ठेवली.गायला सुरुवात केली.भाव-विभोर होऊन मीराबाई नृत्य करु लागली.तानसेनच्या गायनानं सर्वांच्या डोळ्यातून अश्रु आले होते,पण इथे तर श्रीकृष्णाची मूर्तींच रडू लागली.वा मीराबाई वा,तानसेन नतमस्तक झाला.
माझीया जातीचे मज भेटो कोणी । आवडीची धणी पुरवाया ॥
नाशिकच्या द्वारका हॉटेलजवळ मी एस.टी. मधून उतरलो.विचारातच चाललो होतो.तेवढ्यात एक आर टी ओ पोलीसवाला धावतच मागून कधी आला मला कळलंच नाही.महा त्याने घट्ट मिठी मारली व मोठमोठ्याने रडू ओरडू लागला.सगळे लोक जमा झाले,चौक होता,टॅफीक जमा झाली काय झालं जो तो पाहू लागला.
एक दुस-याला म्हणून लागला या बुवाने साहेबाला मारलं.दुसरा म्हणे,काही कळेना राव ही गोष्ट पब्लीकला कळण्याच्या पलीकडची होती.मी त्याच्या मस्तकावर हात ठेवला.त्याची अवस्था शांत झाली,सावध झाला मी म्हटलं,पहीली टॅफीक हटवा मग बोलू.पहीली डयुटी व्यवस्थीत करा.(डयुटी म्हणजे काम समजून आम्ही दिवसच भरले.काही तर रिटायर झाले तरी काम शोधतात.वर आपल्याला सांगतील,बाबाने डयुटी व्यवस्थीत करायला सांगितली म्हणून).
एक वर्षापूर्वी या साहेबाला अनुग्रह दिली होता.तशी त्याची गाठ भेट नव्हती.मला पाहील्याबरोबर त्याची ही अवस्था झाली.असो ऐसा कोठे आठवची नाही यालाच म्हणतात.आपण कुठे आहेत?काय करतो आहोत?लोक काय म्हणतील?वरीष्ठ साहेब आले तर कुणी तक्रार केली तर?कशाचाच विचार त्यावेळी नसतो.आम्हाला शिस्तीचा परमार्थ पाहीजे.खरं तर या अवस्थेनेच परीवर्तन होते व शिस्त लागते.
एका स्त्रीची कपडे शिवण काम करण्याची वस्तू सूई शिवण काम करता करता सुई हरवली.ती अल्लाला म्हणते,देख अल्ला मेरी सुई सपडेगी तो मैं तेरेकु सव्वा मण का मलीदा खिलाऊँगी.तीचा मुलगा अब्दुल्ला म्हणतो,मॉं पागल हो गयी क्या। एक मण में कितनी सुई आयेगी,वो कहती है,देख अब्दुल्ला मैं उसको थेडीच देनेवाली हूँ,मै तो उसको फसलाती हँ. म्हणजे देवाला फसवणारे सुध्दा काही कमी नाहीत.कौल किया था उस मालिक से कभी न भुलुँगा तुझे.पण झालं काय। गरभपनों में वचन दिया थां भजुंगा सीताराम बाहर आकर खुद ही भुल गया खुद का आत्माराम ॥
नामदेव महाराज म्हणतात धरणी वायु लागता । समरण विसरे तत्वता । ओळखु लागे माता-पिता । कोइं कोइं रडे ॥ त्या स्त्रीची सुई हरवली होती अंगणात व ती शोधीत होती घरात.का तर म्हणे बाहेर उजेड आहे व आत अंधार आहे.आत जरी अंधार असला तरी वसतु आतच आहे.कबीर महाराज म्हणतात,मृग नाभी में कस्तूरी वसे मृग भटकत जंगल जाय । बससे –हदय में राम बसत है पर मुर्ख न समझाए ॥ किंवा संत तुकाराम म्हणतात.
बोल अबोलणे बोल । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरात घरकुल केले ।
नेणो अंदार ना उजडले गां ॥ वासुदेव करिता फेरा । वाडीयात बाहेर दारा ।
तुमच खाते एखाद्या बँकेत असून तुमच्या खात्यावर दहा लाख रुपये आहेत.बँकेचे पासबुक तुमच्याकडे आहे.तुमची बँकेत असलेली दहा लाख रुपये शिल्लक तुमच्याजवळ असलेल्या पासबुकातही बँकेने दाखवलेली आहे.रक्कम पास बुकात आहे मग दाखवा बर.ही रक्कम तुमची तुमच्याच खात्यात आहे पण जर ती प्रत्यक्ष पाहीजे असेल तर त्यासाठी बँकत जावे लागेल पैसे काढण्याची स्लीप भरान कॅशीअर कडे जाऊन योग्य ती बँक प्रक्रीया पूर्ण झाल्यावरच तुम्हाला ती रक्कम मिळू शकते.तसेच देवाचा पत्ता ज्ञानेश्वरी,भागवत,शास्त्र,पुराण संकल संत गाथा इत्यादीमधील सांगीतलेला आहे परंतु प्रत्यक्ष वेदानेच सांगीतले की संतावीण प्राप्ती नाही । ऐसे वेद देती ग्वाही ॥ मग देवाची अनुभूती संतांना शरण गेल्याशिवाय होणार नाही.
एका गावामध्ये एकाने बँकेतुन कर्ज काढले होते.परंतु बँकेच्या कर्जाची तो परतफेड करत नव्हता.मध्यंतरीच्या काळात बँकेच्या मॅनेजरची बदली झाली डयुटीवर तो हजर झाला बँकची कागदापत्र तपासत असताना सदर सभासद बँकेचे कर्जाचे हप्ते भरत नाही असे आढळले.कागदपत्रातील त्या गृहस्थाचा नांव व पत्ता पाहत त्याचे घरी बँकेचा स्टाफ गेला.घरी जाऊन सखाराम तुकाराम कापसे आपणच का?असे परंतु ज्याचे नांव तेच आहे त्यानी सांगीतले ठिकाण बरोबर आहे पण ते गांवी गेले आहेत.रुपाची ओळख नसल्याने तो गृहस्थ भेटूनही बँकेचे काम झाले नाही.
सिंध्दांत : पहा व्यवहारात सुध्दा नुसतं नाव माहीती नसून चालत नाही,तर त्याबरोबर रुपाची सुध्दा ओळख असायला लागते अन्यथा व्यवहार सिध्द हात नाही.मग परमार्थात देवाचे नांव माहित असून रुपाची ओळख नसेल तर कसं काय चालेल.आम्ही सगळेच जण परमार्थ करत असताना आमच्या कल्पने प्रमाणे देवाचे नांवे घेत असतो.परंतु आम्हाला देवाच्या रुपाची ओळख आहे का?तर नाही मग आम्ही किती नांव घेतलं तर परमार्थ सफल होईल?
प्रमाण - १} नामरुपी जडले चित्त । दास त्याचा मी अंकित ॥ तुकाराम महाराज
एका गावात एक कुटुंब होत,ते दोघेही वकील काम करत असल्याने कोर्टातून घरी आल्यावर पती घरी आल्यावर आज कशी केस जिंकली,असं झाल,तसं झाल.परतु त्याची पत्नी म्हणायची त्यात काय मोठं केले म्हणजे होतं आणि रोज रोज असच चालल्यानंतर तो मोठ्या फुशारकीने सांगायचा व ती म्हणायची त्यात काय मोठं केलें म्हणजे होत.परंतु त्यामुळे त्याला खुप राग आला व त्या दोघात भांडण झालं दोघेही वकील असल्यामुळे कायद्याप्रमाणे ताबडतोड एकमेकाशी फारकत घेवून मोकळे झाले.मग वकील साहेब मुंबईत व वकीलीन बाई नागपरला निघून गेल्या. असे बराच काल त्या दोघांमध्ये ताटातुट झाली.एक नामंकीत सर्कसमध्ये महीला वकील सल्लागारची भरतीची जाहीरात पाहून तीने त्या सर्कसमध्ये जाऊन मुलाखत दिली व ती सर्कसमध्ये वकील सल्लागार म्हणून काम करु लागली.तीच्या अंगी चिकाटी असल्याने व आपण काहीतरी आगळ वेगळ करावे असा विचार ती सदैव करत होती.काही दिवसांनी त्या सर्कसमधील हत्तीन व्याली तीला झालेले पिल्लू ती दररोज उचलू लागली.असे करता करता बराच काल गेल्यानंतर त्या पिल्लाचा मोठा हत्ती झाला.ते हत्ती उचलण्याचे काम ती करतच राहीली,कालांतराने मोठा हत्ती ती खांद्यावर उचलून घेऊ लागली.हे एक दिवस सर्कसमधील मॅनेजरने पाहिले.आपल्या सर्कसमध्ये हा खेळ सुरु केल्यास सर्कसचा लौकीक वाढून इनकम होईल.म्हणून सर्कसची मोठी जाहीरात केली.एक महीला हत्ती उचलते हे आगळ वेगळ दृष्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली.त्या दरम्यान त्या स्त्रीचा पती काही कामानिमित्त नागपूर येथे आला असता त्याने ही जाहीरात पाहून सकर्स पहाण्यासाठी गेला.सर्कस सुरु झाली,अनेक खेळ झाल्यानंतर शेवटी महीलेचा हत्ती उचलण्याचा खेळ सुरु झाला.मोठ्या उत्सुकतेने लोक बघू लागले.त्या स्त्रीचा पती समोरच बसला होता. बाईसाहेबांनी डोळ्यावर गॉगल घातला होता आणि तोच प्रयोग सूरु झाला.बाईने हत्ती उचललेला पाहुन साहेबांनी टाळी वाजवली.अशा पद्धतीने सर्व खेळ पूर्ण झाल्यावर त्याने मॅनेजरची भेट घेऊन बाईंच अभिनंदन करायचं ठरवलं आणि मॅनेजर साहेबांना घेऊन बाईसाहेबांकडे गेला परंतु साहेबांनी बाईसाहेबांना ओळखलं नाही.साहेबांचे अभिनंदन केले असता ‘’त्यात काय अवघड केले म्हणजे होते’’असे ती म्हणाली.हे ऐकल्याबरोबर साहेब म्हटले,आमची ही बि अशीच म्हणायची आणि तेवढ्यात बाईसाहेबांनी गॉगल काढला आणि म्हणाल्या अरे तू होय.मेनेंजर साहेबांना खर कांय ते कळलं आणि दोघांनी एकमेकांची माफी मागीतली.
सिद्धांत :- केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहीजे.प्रयत्नाने अश्यक्य गोष्टी ही साध्य होतात म्हणूनच प्रयत्नच सर्वश्रेष्ट आहे.
प्रमाण - १} असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥ संत तुकाराम
एक धनगर आपल्या मेंढ्या पाळण्याचे काम करत असता एक दिवस मेंढ्या घेऊन जात असताना एक चकमणारी वस्तू त्याला दिसली ती त्यांने घेतली ती फार आवडल्याने त्याने ती घेतली व कळपातील आवडत्या मेंढीच्या गळ्यात बांधली.तो वारंवार त्या मेंढी व त्या चमकणा-या वस्तूकडे पाहून खुश व्हायचा.पण तीचे महत्व त्याला कळले नाही.एक दिवस रस्त्याने जाणा-या व्यापा-याने त्या कळपातील मेंढीच्या गळ्यातील चमकणारा हिरा पाहीला व मनात म्हणाला की, हया बिचा-याला हयाची किंमत कळलेले दिसत नाही म्हणून त्याने ती मेंढीच्या गळ्यात लटकवलेली दिसते.व्यापा-याने मेंढपाळला भेटून ती मेंढी विकत घेण्याची विनंती केली.परंतु त्या मेंढपाळाची ती मेंढी आवडती असल्याने त्याने विकण्यास नकार केला.असे बराच वेळ व्यवहार चालला,मेंढपाळ त्याची आवडती मेंढी असल्याने ती तो देणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने हि-याची विकत देण्याबाबत विचारले;तेंव्हा मेंढपाळाला कळले की व्यापा-याला ही चमकणारी वस्तू हवी आहे.या वस्तूचीही किंमत निश्चीत फार असणार हे लक्षात आल्यावर तो व्यापा-याला म्हणाला बोला तुम्ही किती किंमत देणार?धनगर बिचारा साधा भोळा असल्याने त्याला त्याने बाजारात जावून किंमत काढण्यास सांगीतले.त्याचे बाजारात जाऊन त्या वस्तूची किंमत काढली तेंव्हा त्याला कोणी एक लाख कोणी दीड लाख कोणी दोन लाख असे सांगीतले तेंव्हा ती वस्तू सामान्य नसून तो हिरा आहे व त्याची किंमत लाखाच्या पटीत असल्याचे त्याचे त्याला कळून आले.
सिध्दांत: धनगराला खरा हिरा सापडला परंतु त्याचे मुल्य त्याला कळले नाही.हे जरी सत्य आहे.तसेच आपणा सर्वांना जो नरदेह मिळाला त्याची किंमत कळते का?तर नाही.तर नरदेहाचे महत्व संत सद्गुरु भेटल्यानंतरच कळेल.
प्रमाण - १} लाल हिरे का गठरी बार बार मत खोल । जब आयेगा उसका पारखी तो वो ही करेगा मोल ॥ संत कबीर
एका स्त्रीला मोठ्या घरच्या लग्नाचे आमंत्रण होत,त्या लग्नाला त्याच उच्च कपड्यांमध्ये जाण्यासाठी तीने चांगली भरजरी पैठणी शेजारच्या स्त्रीकडून घेऊन त्या मोठ्याच्या लग्नाला गेली.पण तीचे रहाणे वागण गबाळे असल्याने ती आपला शालू व्यवस्थित घालून वागणार नाही म्हणून ज्या बाईचा तो शालू होता ती स्वत:त्या लग्नाला एक बसण्यासाठी चादर घेऊन तीच्या बरोबर गेली.ती बसेल तेथे बसण्याचे आधी चादर आंथरुन मग तीला बसण्यास सांगावयाची.असे अनेक पहात होते.त्यापैकी एका स्त्रीने विचार केला ही फार मोठ्या घरातील स्त्री असेल कारण तीला सेवेसाठी बसण्यासाठी एक स्त्री आहे.तीने राहवल नाही म्हणून विचारले त्यावेळी सेवेकरी स्त्रीने सांगीतले की,कशाची कोण अन कशाची कोण हीने घातलेली पैठणी माझी अनं तीला कोठेही कसेही बसण्याची नेहमीची सवय आहे,माझी पैठणी मळू नये खराब होऊ नये म्हणून तीच्या बरोबर मी आहे.
सिध्दांत : परमार्थात भक्त म्हणून मिरवणारे भरपूर आहेत.पण ते भक्त असतीलच असे नाही.किंवा परमार्थाला गालबोट लागेल असे वर्तन करणारे भक्त आहे.म्हणून दिसत तस नसंत म्हणून जग फसत.
प्रमाण - १} दोन्ही दिसती सारखी । वर्म जाणे तो पारखी ॥ तुकाराम महाराज.